Thursday, December 17, 2020

 

सुधारीत वृत्त क्र. 948

18 डिसेंबर रोजी अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस

वेबीनारद्वारे साजरा करण्यात येणार

नांदेड (जिमाका) दि. 17 :- अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव माहिती देण्यासाठी शुक्रवार 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वा. ऑनलईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत. 

संयुक्‍त राष्‍ट्रसंघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्‍ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्‍पसंख्‍याकांच्‍या हक्‍काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्‍तृत केला आहे. त्‍यानुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांची संस्‍कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्‍यादींचे संवर्धन करता यावे यादृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याबाबत राष्‍ट्रीय आयोगाने सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रत्‍येकवर्षी दि. 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस म्‍हणून राबविण्‍यात येतो. 

अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी कोविड-19 च्‍या विषाणुच्‍या संसर्गाची पार्श्‍वभूमी विचारात घेता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत देखील योग्‍य खबरदारी घेवून 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून ऑनलाईन / वेबिनार इत्‍यादी पद्धतीने साजरा करण्‍याबाबत सूचना दिल्‍या आहेत. तसेच या दिवसाच्‍यानिमित्ताने अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती करुन दिली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने दि. 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता पुढील ऑनलाईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत. 

Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/7044496169?pwd=djVOY0RISNIEUFhVQVdMTjRrcGtLQT09

Meeting ID: 7044496169

Passcode: 2uvRH8         

अल्‍पसंख्‍यांक समाजातील नागरीकांनी वरील लिंकवर जॉईन होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...