Thursday, August 16, 2018


मंडप / पेंडॉल तपासणी पथक गठीत
तक्रारी असल्यास संपर्क साधावा
नांदेड दि. 16 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्‍या आदेशानुसार नांदेड जिल्‍हयातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीमधील मंडप / पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत खालील प्रमाणे पथक / पथके गठित करण्‍यात आली आहेत.
नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणा-या मंडप / पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास नमूद तपासणी पथक सदस्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड  यांनी  केले  आहे.   
या तपासणी पथकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र.
तपासणी पथक सदस्‍याचे नाव
पदनाम
कार्यालयीन दुरध्‍वनी क्र.
मोबाईल क्र.
पथक क्र.1 क्षेत्रिय कार्यालय अ (तरोडा-सांगवी)नावाशमनपा नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र.01 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
श्री संजय जाधव
पथक प्रमुख, सहा.आयूक्‍त नावाशमनपा, नांदेड
(02462) 265018
9011000939
2
श्री पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
(02462) 221100
9011320100
3
श्री अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
(02462) 261364
9923131121
4
श्री सू‍निल कोटगीरे
वसुल पर्यवेक्षक
(02462) 265018

5
श्री बी.बी.एंगडे
वसुल पर्यवेक्षक
(02462) 265018

6
श्री साहेबराव ढगे
लिपीक
(02462) 265018

पथक क्र.2 क्षेत्रिय कार्यालय ब 2 अशोकनगर कार्यक्षेत्र नावाशमनपा नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र.02 अंत.संपूर्ण क्षेत्र
1
श्री सुधीर इंगोल
पथक प्रमूख सहा आयूक्‍त,नावाशमनपा, नांदेड
(02462) 247077
9011001017
2
श्री अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
(02462) 261364
9923131121
3
श्री पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
(02462) 221100
9011320100
4
श्री एस.एम.कास्‍टेवाड
कार्या.अधिक्षक क्षेत्रीय कार्यालय 02 नांवाशमनपा नांदेड
(02462) 247077

5
श्री मल्‍हार मोरे
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड
(02462) 247077

6
श्री आर.एम.रोडे
प्र.स्‍व.निरीक्षक नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077

7
श्री अ.नईम अ.गफुर
प्र.स्‍व.निरीक्षक नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077

8
श्री रणजित नारायण पाटील
लिपीक, नांवाशमनपा, नांदेड
(02462) 247077

पथक क्र.3 क्षेत्रिय कार्यालय क्र.03 शिवाजी नगर कार्यक्षेत्र नावाशमनपा नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र.03 अंत. संपूर्ण क्षेत्र
1
श्री अविनाश अटकोरे
पथक प्रमूख, सहा.आयूक्‍त, नावाशमनपा, नांदेड

9011000940
2
श्री मच्छिंद्र सुर्वसे
पो.नि.शिवाजीनगर पो.स्‍टे.नांदेड

9823721305
3
श्री अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
(02462) 261364
9923131121
4
श्री पाशमवाड
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

9011000974
5
श्रीमती प्रियंका एंगडे
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

8308847692
6
श्री बालाजी देसाई
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

8308847691
7
श्री परसराम गाढे पाटील
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

8888801918
8
श्री ज्ञानचंद्र चामे
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

8888801930

पथक क्र.4 क्षेत्रिय कार्यालय क्र.4 वजिराबाद कार्यक्षेत्र नावाशमनपा नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र.04 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
श्री शिवाजी डहाळे
पथक प्रमूख, सहा.आयूक्‍त,नावाशमनपा ,नांदेड

9011027190
2
श्री एस.एस.शिवाळे
पो.नि.पो.स्‍टे.वजिराबाद, नांदेड
(02462) 236500
9821692261
3
श्री एस.डी.नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा, नांदेड
(02462) 236510
9561045306
4
श्री पाशमवाड
पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड


5
श्री सय्यद अझहर
पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड


6
श्री वसीम तडवी
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा, नांदेड


7
श्री सय्यद अन्‍सारी
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा, नांदेड


8
श्री संजय जगदकर
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा, नांदेड


पथक क्र.5 क्षेत्रिय कार्यालय क्र.5 ईतवारा नांदेड कार्यक्षेत्र नावाशमनपा नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र.05 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
श्री मिर्झा बेग
पथक प्रमूख, सहा.आयूक्‍त,नावाशमनपा ,नांदेड

9011000950
2
श्री एस.डी.नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा, नांदेड
(02462) 236510
9561045306
3
श्री डी.जी.चिखलीकर
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा.)
(02462) 226373
9822458411
4
श्री अब्‍दूल हबीब अ.रशीद
कर निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

8888801998
5
श्री तोटावाड जी.जी.
कर निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

9921986989
6
श्री सय्यद जाफर
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

8380046631
7
श्री द्यानंद कवले
स्‍वच्‍छता निरीक्षक नांवाशमनपा नांदेड

9011000975
पथक क्र.6 क्षेत्रिय कार्यालय क्र.ड 6 सिडको नांदेड कार्यक्षेत्र नावाशमनपा नांदेड क्षेत्रीय कार्यालय क्र.06 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
श्री पंडीत जाधव
पथक प्रमूख, सहा.आयूक्‍त,नावाशमनपा ,नांदेड

8888801932
2
श्री डी.जी.चिखलीकर
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा.)
(02462) 226373
9822458411
3
श्री एम.ए.जब्‍बार
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

9422186416
4
श्री आनंद कांबळे
वसुली पर्यवेक्षक नांवाशमनपा नांदेड

9823491153
5
श्री महेश जोंधळे
लिपीक नांवाशमनपा नांदेड


6
श्री किशन वाघमारे
प्र.स्‍व.नि.नांवाशमनपा नांदेड

8888801992
00000


20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर सामाजिक ऐक्य पंधरवडा
सद्‌भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड, दि. 16 :- केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी "सद्‌भावना दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत या सद्‌भावना दिवसाच्या अनुषंगाने दि.20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत. त्यानुसार संबंधीत विभागांनी करावयाच्या कार्यवाही व कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
20 ऑगस्ट सद्‌भावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात दि.20 ऑगस्ट 2018 रोजी सद्‌भावना दिवस साजरा करण्यात येणार असून यावेळी सर्व उपस्थितांना सद्‌भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी सद्‌भावना शर्यतही आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सद्‌भावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहेत.
महसूल विभागाच्या आयुक्तांमार्फत सद्‌भावना शर्यत आयोजित करण्यासह त्यांच्या कार्यालयातून सद्‌भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कार्यालये, जिल्ह्यांच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेणे, सर्व उपस्थितांना सद्‌भावना शपथ घेण्यास सांगणे, सद्‌भावना शर्यत आयोजित करणे, युवकांच्या सहभागाने सद्‌भावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे सूचित करण्यात आले आहे. विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यासाठीही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावेत.  सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी मानवी साखळी सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावेत. जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करुन त्यामध्ये जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सदर पंधरवड्यात जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे सूचित करण्यात आले आहे.
00000


लोककला आणि पथनाट्य निवडसूचीकरिता
२० ऑगस्ट पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व  पथनाट्य  यांची निवडसूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक २० ऑगस्ट २०१८ पर्यंत जिल्ह्यांकरिता संबधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील पथकांनी उपसंचालक(माहिती), कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग,पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी ) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना निःशुल्क प्राप्त करून घ्यावा. अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.
0000000

Wednesday, August 15, 2018

मालटेकडी रेल्वे उड्डाण पुलाचे
पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड, दि. 15 : - मालटेकडी नांदेड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले.  
या कार्यक्रमास खा. अशोकराव चव्हाण, आमदार अमर राजूरकर , आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी महापौर अब्दुल सत्तार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,  सार्वजनिक बांधकाम प्रा. वि. औरंगाबाद मुख्य अभियंता खं.तु. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सु. गो. देशपांडे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कदम उद्घाटन प्रसंगी म्हणाले की, नांदेड-मुदखेड या रेल्वे मार्गामुळे मालटेकडी रेल्वे गेट येथे ताटकळणारी वाहतुक विनाथांबा जाण्यासाठी सुविधा झाली आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, अकोला, हिंगोली, लातूर या जिल्ह्यातून व हैद्राबाद मार्गे आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यातून ये-जा करणारी अवजड व मोठ्या प्रमाणातील वाहतूक यामुळे नांदेड शहरात निर्माण होणारी वाहतूकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.  वाहतूक अंतर व वेळेत बचत होणार आहे. नांदेड शहरातील दळण-वळण सोयीसुविधेत व भौतिक वैभवात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी यावेळी केले.
माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी बोलतांना शासनाने माळटेकडी पूल निर्माण केल्यामुळे वाहतूकीसाठी  सुविधा झाली आहे, असे सांगून शासनाचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खं.तु. पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी केले.

0000






स्वातंत्र्यदिन ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ उत्साहात संपन्न
भेदभाव विसरुन प्रत्येकाला न्याय देण्यासाठी काम करु या
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 15 : भेदभाव विसरुन प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण एकजूटीने काम करु या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.   
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 71 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

या समारंभात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, समाज कल्याण सभापती श्रीमती शिलाताई निखाते, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा परिषद, महापालिकेतील पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटूंबीय, माजी सैनिक, विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शुभेच्छा संदेशात पालकमंत्री श्री. कदम म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करीत असतांना स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला अशा लाखो महामानवांचा आदर्श आपल्या समोर आहे. राज्याच्या विकासाबरोबर नागरिकांच्या मुलभूत गरजा तसेच समाजातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. लोकप्रतिनिधींनी पक्ष विसरुन जनतेच्या सेवेसाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्वांना भारतीय स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली.
कार्यक्रमात पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते विविध परिक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.
00000  
"युवा माहिती दूत" उपक्रमातून   
शासनाच्या विविध योजना दुर्गम भागातील
लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जाणार   
- पालकमंत्री रामदास कदम  
           
नांदेड, दि. 15 :- "युवा माहिती दूत" हा राज्य शासनाचा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध महत्वपूर्ण 50 शासकीय योजना दुर्गम भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.  
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच युनिसेफच्या सहकार्याने "युवा माहिती दूत" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालकमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते "युवा माहिती दूत" बोधचिन्हाचे अनावरण करुन या उपक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.    
यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैला सारंग, धोंडू पाटील, भुजंग पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.   
पालकमंत्री श्री. कदम म्हणाले, "युवा माहिती दूत" या उपक्रमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जनसंपर्क साधून शासकीय योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम केले पाहिजे. प्रत्येक गावात ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक डॉक्टर, कृषि अधिकारी असले तरी या उपक्रमातून शासन लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून त्यांना विविध योजनांची माहिती देईल व योजनांच्या अंमलबजावणीबाबत लाभार्थ्यांची मतेही जाणून घेतली जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणासोबत या उपक्रमात योगदान द्यावे. वंचित लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधावा. यातूनही राज्यात चांगले काम होऊ शकेल. येत्या काळात विविध विभागात 72 हजार पदांसाठी भरती होणार आहे. तसेच विविध विभागाने शासकीय योजनांची माहिती बेरोजगारांना दिली तर याद्वारे अनेकांना दिलासा मिळेल, असे सांगून त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.  
प्रास्ताविकात उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी निळकंठ पाचंगे यांनी महाविद्यालयातील युवकांमार्फत "युवा माहिती दूत" उपक्रम राबविला जात असून किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जाणार आहे. या युवकामार्फत किमान 50 लाख प्रस्तावित लाभार्थ्यांशी म्हणजेच 2 ते 2.50 कोटी व्यक्तीशी शासन जोडले जाईल, असे सांगितले.
सुरुवातीला "युवा माहिती दूत" उपक्रमाच्या माहितीवर आधारीत चित्रफीत दाखविण्यात आली. सुत्रसंचलन डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांनी मानले.
यावेळी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यू. गवई, प्राचार्य श्री. चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विवेक डावरे, अलका पाटील, के. आर. आरेवार, महमंद युसूफ, अंगली बालनरस्या, तसेच उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील दिपक देशपांडे, सुभाष धोंडगे आदींची उपस्थिती होती.   
000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...