Wednesday, August 15, 2018

मालटेकडी रेल्वे उड्डाण पुलाचे
पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड, दि. 15 : - मालटेकडी नांदेड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले.  
या कार्यक्रमास खा. अशोकराव चव्हाण, आमदार अमर राजूरकर , आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी महापौर अब्दुल सत्तार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील,  सार्वजनिक बांधकाम प्रा. वि. औरंगाबाद मुख्य अभियंता खं.तु. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सु. गो. देशपांडे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कदम उद्घाटन प्रसंगी म्हणाले की, नांदेड-मुदखेड या रेल्वे मार्गामुळे मालटेकडी रेल्वे गेट येथे ताटकळणारी वाहतुक विनाथांबा जाण्यासाठी सुविधा झाली आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, अकोला, हिंगोली, लातूर या जिल्ह्यातून व हैद्राबाद मार्गे आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यातून ये-जा करणारी अवजड व मोठ्या प्रमाणातील वाहतूक यामुळे नांदेड शहरात निर्माण होणारी वाहतूकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.  वाहतूक अंतर व वेळेत बचत होणार आहे. नांदेड शहरातील दळण-वळण सोयीसुविधेत व भौतिक वैभवात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी यावेळी केले.
माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी बोलतांना शासनाने माळटेकडी पूल निर्माण केल्यामुळे वाहतूकीसाठी  सुविधा झाली आहे, असे सांगून शासनाचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खं.तु. पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी केले.

0000






No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...