Thursday, August 16, 2018


लोककला आणि पथनाट्य निवडसूचीकरिता
२० ऑगस्ट पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 15 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व  पथनाट्य  यांची निवडसूची तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक २० ऑगस्ट २०१८ पर्यंत जिल्ह्यांकरिता संबधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबई आणि मुंबई उपनगरातील पथकांनी उपसंचालक(माहिती), कोकण भवन, नवी मुंबई यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग,पोवाडे, वगनाट्य, बहुरूपी, भारुड इत्यादी ) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना निःशुल्क प्राप्त करून घ्यावा. अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत.
0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...