Thursday, August 16, 2018


पीपल्स कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
केंद्राचे जिल्हाधिकारी डोंगरे यांचे हस्ते उद्घाटन
नांदेड, दि. 14 :- जिल्हा प्रशासन व पीपल्स कॉलेज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या वर्ष 2018-19 साठी मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्यंकटेश काब्दे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मदाय उपायुक्त सौ. प्रणिता श्रीनिवार यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव श्यामल पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपनाथ पत्की, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक, संस्थेचे पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव  उपस्थित होते.  
राज्य शासनाने घोषित केलेल्या महाभरती व पोलीस भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पीपल्स कॉलेज येथे शैक्षणीक वर्षे 2018-19 च्या मार्गदर्शन वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. हे वर्ग विनामुल्य घेण्यात येणार आहेत. या वर्गात लेखी, शारीरिक चाचणी व मुलाखतीची तयारी करुन घेण्यात येणार आहे. गरजूनी संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संचालक प्रा. कल्पना जाधव यांनी केले आहे. जिल्हा सत्र न्यायालय भरतीमध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत तयारी करुन घेतल्या जात असून संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...