Thursday, July 12, 2018


जिल्हा रुग्णालयात
जागतिक डेंगू दिन साजरा  
           
नांदेड, दि. 12 :- श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक डेंगू दिन व साप्ताह साजरा करण्यात आला.
या दिनाच्या अनुषंगाने विद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीपक, डॉ. सभा खान यांनी उपस्थित रुग्ण व त्यांची नातेवाईक यांना डेंगू म्हणजे काय तो कसा होतो, तो होऊ नये यासाठी प्रतीबंधात्मक उपाय कोणती याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. ए. पी. वाघमारे व बाह्य रुग्ण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000


इतर मागासवर्गीय महामंडळाच्या
बीज भांडवल योजनेबाबत आवाहन
            नांदेड, दि. 12 : - राज्य इतर  मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर  मागासवर्गीय  समाजातील  नागरिकांनी  महामंडळाच्या या कर्ज योजनेची  माहिती  घ्यावी  व  कर्ज  योजनेचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधीक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या  समोर  नांदेड  येथे संपर्क साधावा , असे  आवाहन  महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे  यांनी  केले आहे.
इतर मागासवर्गीय समाजाच्या पात्र उमेदवारांसाठी महामंडळाच्या 20 टक्के बीज भांडवल  कर्ज  योजनेसाठी  यावर्षाचे  उद्दीष्ट  प्रस्ताव संख्या 50 असून  त्याकरीता  लागणारे भागभांडवल 20 लाख रुपये आहे. या योजनेमध्ये प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत आहे. त्यामध्ये  2 लाख 50 हजारापर्यंतचे कर्ज प्रस्ताव 40 असून त्यासाठी निधी 12 लाख व त्यापेक्षा जास्त रुपये 5 लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव 10 व त्याकरीता निधी 8 लाख याप्रमाणे आहे. या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची (बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर) 20 टक्के रक्कम महामंडळाची त्यावर 6 टक्के व्याज दर राहील. पाच टक्के स्वत:चा सहभाग राहील. परतफेडीचा कालावधी हा 60 महिन्याचा आहे.
            थेट  कर्ज  योजनेअंतर्गत  छोट्या  उद्योगासाठी महामंडळामार्फत 25 हजार रुपयापर्यंत थेट कर्ज दिल्या जाते. यावर्षाचे उद्दीष्ट कर्ज प्रस्ताव 150 असून त्याकरीता भागभांडवल 37 लाख 50 हजार रुपये आहे. यामध्ये 2 टक्के व्याज आकारल्या जाते व कर्ज परतफेड ही 36 महिन्यात केली जाते.
या योजनेकरीता अर्जदार लाभार्थ्याची अर्हता पुढील प्रमाणे आहे. लाभार्थी हा इतर मागासवर्गीय असावा. तो महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा तसेच कुटंबातील सर्व सदस्याचे एकत्रीत वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येईल.
0000000

खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा
योजनेत सहभागासाठी 24 जुलै मुदत
शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 12 :- जिल्हयात खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2018 मध्ये लागू करण्यात आला आहे.  बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकऱ्यांसाठी 31 जुलै 2018 ही असुन बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2018 ही आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हयात खरीप हंगाम 2018 मध्ये ही योजना इफ्को टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पहिला मजला, आगळे मार्ग, डॉक्टर लेन, नांदेड (दूरध्वनी क्र. 02462 / 247111) यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 मध्ये नांदेड जिल्हयामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली असुन या योजनेंतर्गत रक्कम 542.752 कोटी एवढी नुकसान भरपाई शेतक-यांना मिळाली आहे. मागील वर्षी शेतक-यांना ऑनलाईन विमा भरतेवेळी तांत्रीक अडचणी आल्या होत्या. यावर्षी सदर परिस्थिती पुन्हा उद्भवणार  नाही  याकरीता शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता आतापासुनच ऑनलाईन पध्दतीने सीएससी सेंटरच्या माध्यमातुन अथवा स्वत: अर्ज भरावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एकदम शेवटच्या दिवशी विमा अर्ज भरण्यासाठी गेल्यास गर्दी होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास शेतक-यांना विम्याचा लाभ मिळणार नाही असे कृषि आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
शेतक-यांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजीटल सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत देखील सहभागी होता येणार नाही.  त्यामुळे शेतक-यांनी मुदतीपुर्वीच बँकेत किंवा आपले  सरकार सेवा केंद्रावर पिक पेऱ्याचे स्वंयघोषणा पत्र, सातबारा, 8-अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर करावेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2018 अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु./हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)/ हेक्टर
भात
37,000/-
740/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
31,500/-
630/-
मुग
18,900/-
378/-
उडीद
18,900/-
378/-
सोयाबीन
42,000/-
840/-
तीळ
23,100/-
462/-
कापुस
42,000/-
2100/-
इफको टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनी, लिमीटेड कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनीधी यांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. जिल्हा प्रतिनिधी - सचिन तांबे, मोबाईल क्र - 8454944726,  कपील दवणे, मोबाईल क्र - 9096696333 गौतम जळबाजी कदम मोबाईल क्र -8329390770, 9890846283.
जिल्हा
तालुका
तालुका प्रतिनिधी
मोबाईल क्रमांक
नांदेड
हदगाव
मारेाती भालेराव
9049493100
9284217013
अर्धापूर
अनिल जगदाळे
9527491358
9325542080
नांदेड
नितीन कोल्हे
8999598376
9970202819
मुखेड
ज्ञानेश्वर हराळे
8600408454
7410712220
लोहा
पदमाकर आवळे
9823292660
7020835815
कंधार
दिपक बेटीवार
9011114171
8888333506
नायगाव



देगलूर
सुनिल शिंदे
7066249548
7620837020
बिलोली


भोकर
दत्तात्रय खिरे
9527213665

मुदखेड


हिमायतनगर
सचिन घुले
7875063660
8329176485
किनवट


माहूर
फुले खंडु
9049673962
7887757150
धर्माबाद
नागेश जाधव
7507829920

उमरी


            ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
000000

व्यवसाय अभ्यासक्रम तुकड्यासाठी
ऑनलाईन प्रस्ताव करावीत  
नांदेड, दि. 12 :- माध्यमिक स्तरावरील पूर्व व्यवसायीक, + 2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन अधिकच्या तुकड्यांना कायम विनाअनुदानीत तत्वावर नवीन तसेच विद्यमान संस्थेत अधिकच्या तुकड्यांना परवानगी देण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यात येत आहे. यासाठी www.vti.dvet.gov.in या संकेतस्थळावरुन भरण्याबाबत संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी कळविले आहे. इच्छूक संस्थांनी या संकेतस्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 13.42 मि.मी.पाऊस
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात बुधवार 12 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 214.64 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 348.31 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 36.69 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 12 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 5.63 (402.05), मुदखेड- 10.00 (515.01), अर्धापूर- 8.33 (359.34), भोकर- 16.25 (505.00), उमरी- 8.33 (359.31), कंधार- 1.50 (330.83), लोहा- 1.33 (341.98), किनवट- 49.86 (338.84), माहूर-57.50 (430.00), हदगाव- 18.43 (485.16), हिमायतनगर- 27.00 (468.02), देगलूर- 0.67 (131.67), बिलोली- 2.40 (214.00), धर्माबाद- 3.67 (248.99), नायगाव- 2.60 (261.80), मुखेड- 1.14 (180.97). आज अखेर पावसाची सरासरी 348.31 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5572.97) मिलीमीटर आहे.  
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...