Monday, December 4, 2017

गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन शक्य
शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन
            नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसुन येत आहे. गुलाबी बोंडअळीचा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे अशा शेतकऱ्यांनी आपली तक्रार कृषी विभागाच्या "जी फार्म"मध्ये तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्राप्त तक्रारीची तपासणी जिल्हा व तालुका स्तरावर सुरु असून यासंदर्भात पुढील हंगामात प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना घेण्याचे अवाहन कृषी विभाग व कापूस संशोधन केंद्र नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
            नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांश क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड केली जाते. पुढील हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आत्तापासूनच एकात्मीक किड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये थोड्या आर्थिक लाभासाठी कापूस पिकाची फरदड घेतली जाते. त्यामुळे गुलाबी बोंडअळीला  जीवनक्रम पुर्ण करण्यासाठी सततचे खाद्य मिळते. त्यामुळे पुढील हंगामात तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे फरदड न घेता वेचणी पुर्ण झालेल्या शेतातील पऱ्हाट्या उपटून त्या नष्ट करणे गरजेचे आहे. उपटून टाकलेल्या पऱ्हाट्यांच्या नख्यांमध्ये सुध्दा शेंदरी बोंडअळी सूप्त अवस्थेत राहते. त्यामुळे अशा पऱ्हाट्या व शेतात पडलेली बोंड व नख्या वेचून कंपोष्ट खड्डयामध्ये गाडावे. पुढील हंगामातील कापसाच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा महिण्याचे अंतर आवश्यक आहे.  चालु हंगामातील गुलाबी बोंडअळीचे कोष जमिनीमध्ये सूप्त अवस्थेत राहात असल्यामुळे शेताची खोल नांगरट करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोष पृष्ठभागावर आल्यामुळे पक्षी ते खाऊन नष्ट करतात. कापूस पिकाची वेचणी पुर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात जनावरे, गुरे व शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडावी. गुरे चरण्यास सोडण्यापुर्वी  पीकावर किमान एक महिण्यापुर्वी फवारणी झालेली नाही याची खाञी करावी. कापसातील बियाण्यास गुलाबी बोंडअळी खात असल्यामुळे जिनींग व प्रेसिंग मिल परिसरात गुलाबी बोंडअळीचे कोष, पतंग इत्यादी आढळून येतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावणे आवश्यक आहे. जिनींग प्रेसिंग मिलमधील किडग्रस्त सरकी वेगळी करुण बाजुला काढल्या जातात. अशा सरकी जिनींग मिल व्यवस्थापनाने उघड्यावर न ठेवता नष्ट करणे आवश्यक आहे.पुढील हंगामातील कापूस पिकात फुले लागण्याच्या वेळी कामगंध सापळ्यांचा वापर करणे आवश्यक आहे. चालु हंगामातील पीक काढल्यानंतर त्या पीकावर प्रादुर्भाव झालेल्या कीडींचे कोष जमिनीमध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील हंगामात तेच पीक त्याच जमिनीवर घेतल्यासकीडींचा प्रादुर्भात मोठया प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे जमिनीवर पीकांची फेरपालट करणे नितांत आवश्यक आहे. एकाच जमिनीवर पुन:पुन्हा एकच पीक घेऊ नये. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीचे प्रतिबंधक एकात्मीक उपाययोजना अवलंबल्यास गुलाबी बोंडअळीचे नियंञण करणे करणे सोपे होईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000
विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेडचे
सर्वसाधारण विजेतेपद दहाव्यावर्षी कायम
नांदेड, दि. 4 :- विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2017 या कालावधीत जालना येथे पार पाडली. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नांदेडने सलग दहाव्यावर्षी आपल्याकडे कायम ठेवले आहे.
या स्पर्धेत 36 क्रीडा प्रकारामध्ये मराठवाडयातील महसूल विभागाच्या खेळाडूंनी प्रदर्शन केले होते. नांदेडने सर्वाधिक 256 गुण मिळवीत आपले सर्वसाधारण विजेतेपद कायम ठेवले. विभागीय स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी नांदेड जिल्ह्याने सांस्कृतिक स्पर्धेसाठी तसेच क्रीडा प्रकार निहाय वेगवेगळी समिती स्थापन करुन या समितीचे प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांच्या नेमणूका करुन क्रीडा प्रकार निहाय खेळाडूचा सराव करुन घेतला. त्याचे फलित म्हणून नांदेडने सलग 10 व्या वेळेस सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे.
या स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, यांचे मार्गदर्शन तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रमोद मुळे, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड या सर्वांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हयातील सर्व तहसिलदार यांच्या सहकार्याने मैदानी क्रीडा प्रकारामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केली. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत भोकर उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे व उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे प्रदर्शन केल्यामुळे 7 वेगवेगळया कलाप्रकारामध्ये प्रथम पारितोषक मिळाले व त्या‍मुळे विभागात सांस्कृतिक स्पर्धेत नांदेड जिल्हयाने व्दितीय क्रमांक पटकावला. यामुळे नांदेड जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळाला.
या स्पर्धेतील यशाबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हा‍धिकारी जयराज कारभारी तसेच विभागीय तहसिलदार ना. त. संघटनेचे अध्यक किरण अंबेकर, विभागीय महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, राज्य तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष मुगाजी काकडे, जिल्हा तहसिलदार ना.त. संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश मुंडे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्य‍क्ष कुणाल जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष नन्हू कानगुले, वाहन चालक संघटना अध्यक्ष मधुकर वाठोरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर मगडेवार, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष श्री डोईवाड यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी खेळाडुचे अभिनंदन केले व पुढीलवर्षी उस्मानाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतसुद्धा सर्व खेळाडू विजयाची परंपरा कायम ठेवतील हा विश्वास व्यक्त केला.

00000
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेडला सर्वसाधारण विजेतेपद
नांदेड, दि. 4 :- विभागीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धा 2017 दि. 30 नोव्‍हेंबर ते 2 डिसेंबर 2017 या दरम्‍यान जालना येथे पार पाडल्‍या. सदर स्‍पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नांदेडने सलग दहाव्‍या वर्षी आपल्‍याकडे कायम ठेवले आहे.
            जालना येथे तीन दिवस झालेल्‍या क्रीडा व सांस्‍कृतिक स्‍पर्धेमध्‍ये 36 क्रीडा प्रकारामध्‍ये मराठवाडयातील महसूल विभागाच्‍या खेळाडूंनी प्रदर्शन केले. नांदेडने सर्वाधिक 256 गुण मिळवीत आपले सर्वसाधारण जेतेपद  कायम ठेवले. विभागीय स्‍पर्धेमध्‍ये यश मिळविण्‍याकरीता नांदेड जिल्‍हयाने सांस्‍कृतिक स्‍पर्धेसाठी तसेच क्रीडा प्रकार निहाय वेगवेगळया समिती स्‍थापन करुन सदर समितीचे प्रमुख म्‍हणून उ?पजिल्‍हाधिकारी, तहसिलदार, ना.त. संवर्गातील अधिकारी यांच्‍या नेमणूका करुन सदर समिती प्रमुखांनी क्रीडा प्रकार निहाय खेळाडूंनकडून सराव करुन घेतला व त्‍याचेच फलित म्‍हणून नांदेड ने सलग 10 व्‍या वेळेस सर्वसाधारण जेतेपद मिळविले आहे.
            या स्‍पर्धेमध्‍ये यश संपादन करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, यांचे मार्गदर्शन तसेच निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी  उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, जिल्‍हा पूरवठा अधिकारी संतोष वेणीकर, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी कंधार प्रभोदय मुळे, बिलोली उपविभागीय अधिकारी निवृत्‍ती गायकवाड या सर्वांच्‍या नेतृत्‍वाखाली तसेच जिल्‍हयातील सर्व तहसिलदार यांच्‍या सहकार्याने मैदानी क्रीडा प्रकारामध्‍ये अधिकारी व कर्मचारी यांनी चमकदार कामगिरी केली. तसेच सांस्‍कृतिक स्‍पर्धेमध्‍ये उप विभागीय अधिकारी भोकर श्रीमती दिपाली मोतीयेळे व उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य)  श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्‍या नेतृत्‍वात चांगल्‍या प्रकारे प्रदर्शन केल्‍यामुळे सात (7) वेगवेगळया कलाप्रकारामध्‍ये प्रथम पारितोषक मिळाले व त्‍यामुळे विभागात सांस्‍कृतिक स्‍पर्धेमध्‍ये नांदेड जिल्‍हयाने व्दितीय क्रमांक पटकावला यामुळे नांदेड जिल्‍हयास सर्वसाधारण जेतेपदाचा बहूमान मिळाला.
            या स्‍पर्धेमध्‍ये यश मिळविल्‍यामुळे प्र. जिल्‍हाधिकारी मा. श्री संतोष पाटील , निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी तसेच विभागीय तहसिलदार ना.त. संघंटनेचे अध्‍यक्ष किरण अंबेकर , विभागीय महसूल कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष श्री लक्ष्‍मण नरमवार, राज्‍य  तलाठी संघटनेचे उपाध्‍यक्ष मुगाजी काकडे, तसचे जिल्‍हा तहसिलदार ना.त. संघटनेचे अध्‍यक्ष व्‍यंकटेश मुंडे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष कुणाल जगताप, तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष नन्‍हू कानगुले, वाहन चालक संघटना अध्‍यक्ष मधुकर वाठोरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष शंकर मगडेवार, कोतवाल संघटनेचे अध्‍यक्ष डोईवाड यांनी सर्व अधिकारी कर्मचारी खेळाडू यांचे अभिनंदन केले व  पुढील वर्षी उस्‍मानाबाद येथे होणा-या विभागीय स्‍पर्धेमध्‍ये सुध्‍दा सर्व खेळाडू विजयाची परंपरा कायम ठेवतील हा विश्‍वास व्‍यक्‍त केला.                 
00000


Saturday, December 2, 2017

धर्मादाय रुग्णालयाचे आरोग्य शिबीर
निर्धन, गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा
नांदेड, दि. 2 :- धर्मादाय रुग्णालय योजनेंतर्गत रविवार 3 डिसेंबर 2017 रोजी नांदेड येथे तीन ठिकाणी  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त निर्धन व गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईना धांडे यांनी केले आहे.  
आरोग्य शिबिराचे आयोजन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय गाडीपुरा येथे वाडेकर डॉक्टर, आंध्रा समितीच्या बाजुला गवळीपुरा येथे मोनार्क कॅन्सर हॉस्पीटल येथे भालेराव डॉक्टर तर मार्कंडेश्वर मंदिराजवळ गंगाचाळ मिलगेट परिसराजवळ रयत रुग्णालय डॉक्टर येथे करण्यात आले आहे. गरीब रुग्णांना मोफत उपचार तसेच दुर्बल लोकांना सवलतीच्या दरात उपचार देण्याची तरतूद आहे. कायद्याप्रमाणे शिबिरात गरजु लोकांना सर्व तपासण्या करुन पुढील मोफत उपचार महाराष्ट्रातील कोणत्याही धर्मादाय रुग्णालयात आजार संपुर्ण बरा होईपर्यंत देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

00000
मतदार नोंदणी, दावे, हरकती
स्विकारण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 2 :- भारत निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यीत नाव नोंदणी, दावे व हरकती स्विकारणे तसेच बीएलओ यांनी घरोघरी भेटी देण्याच्या कार्यक्रमास शुक्रवार 15 डिसेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणीबाबत नागरिकांनी बीएलओ यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
यापुर्वी भारत निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीसाठी छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला होता. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली असून नाव नोंदणी संदर्भात दावे व हरकती स्विकारण्यात आल्या होत्या, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

000000
सोयाबीन अनुदान वितरणाबाबत  
जिल्हा उपनिबंधकाचे आवाहन  
नांदेड , दि. 2 :- खरीप हंगाम सन 2016-17 मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेले सोयाबीन अनुदान वितरण करण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांनी बँक खात्याचा तपशील दिला नसल्याने रक्कम बचत खात्यात जमा करण्यास अडचण येत आहे. बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक खात्याचा तपशीलासह संबंधीत तालुका सहाय्यक निबंधक यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील खरीप हंगाम सन 2016-17 मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्यादृष्टीने 1 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये तर जास्तीतजास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजुर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक, पात्र लाभार्थी संख्या 10 हजार 630 असून 3 कोटी 85 लाख 29 हजार 206 रुपये शासनामार्फत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड कार्यालयास प्राप्त झालेली आहे. हे अनुदान पात्र लाभार्थ्यांचे बचत खाती वर्ग करण्यासाठी संबंधीत तालुका कार्यालयास वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँकेच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे. परंतु काही लाभार्थ्यांनी बँक खात्याचा तपशील दिला नाही त्यामुळे मुदतीत बँक खात्याचा तपशील सादर न केल्यास सदर रक्कम शासनाकडे परत केली जाईल, असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रात नमुद केले आहे.

000000
कापुस, तुर पिक
संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड , दि. 2 :- कृषि विभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच तालुक्यामध्ये तूर, कापूस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पातंर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनवेलेरेट 20 इसी 8 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर शेंग माशीच्या नियंत्रणासाठी क्यनॉलफॉस 25 इसी 30 मिली प्रति 10 लिटर पाणी, एनएसई (निबोंळीतेल ) 5 टक्के फवारणी करावी. हरभरा पिकांवरील मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी 1 टक्क डब्ल्यु पी 9 ग्रॅम प्रति किलो बियाणे बिजप्रक्रिया करावे, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही.व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...