Monday, December 4, 2017

 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेडला सर्वसाधारण विजेतेपद
नांदेड, दि. 4 :- विभागीय महसूल क्रीडा सांस्‍कृतिक स्‍पर्धा 2017 दि. 30 नोव्‍हेंबर ते 2 डिसेंबर 2017 या दरम्‍यान जालना येथे पार पाडल्‍या. सदर स्‍पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद नांदेडने सलग दहाव्‍या वर्षी आपल्‍याकडे कायम ठेवले आहे.
            जालना येथे तीन दिवस झालेल्‍या क्रीडा सांस्‍कृतिक स्‍पर्धेमध्‍ये 36 क्रीडा प्रकारामध्‍ये मराठवाडयातील महसूल विभागाच्‍या खेळाडूंनी प्रदर्शन केले. नांदेडने सर्वाधिक 256 गुण मिळवीत आपले सर्वसाधारण जेतेपद  कायम ठेवले. विभागीय स्‍पर्धेमध्‍ये यश मिळविण्‍याकरीता नांदेड जिल्‍हयाने सांस्‍कृतिक स्‍पर्धेसाठी तसेच क्रीडा प्रकार निहाय वेगवेगळया समिती स्‍थापन करुन सदर समितीचे प्रमुख म्‍हणून ?पजिल्‍हाधिकारी, तहसिलदार, ना.. संवर्गातील अधिकारी यांच्‍या नेमणूका करुन सदर समिती प्रमुखांनी क्रीडा प्रकार निहाय खेळाडूंनकडून सराव करुन घेतला त्‍याचेच फलित म्‍हणून नांदेड ने सलग 10 व्‍या वेळेस सर्वसाधारण जेतेपद मिळविले आहे.
            या स्‍पर्धेमध्‍ये यश संपादन करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, यांचे मार्गदर्शन तसेच निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी  उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, जिल्‍हा पूरवठा अधिकारी संतोष वेणीकर, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी कंधार प्रभोदय मुळे, बिलोली उपविभागीय अधिकारी निवृत्‍ती गायकवाड या सर्वांच्‍या नेतृत्‍वाखाली तसेच जिल्‍हयातील सर्व तहसिलदार यांच्‍या सहकार्याने मैदानी क्रीडा प्रकारामध्‍ये अधिकारी कर्मचारी यांनी चमकदार कामगिरी केली. तसेच सांस्‍कृतिक स्‍पर्धेमध्‍ये उप विभागीय अधिकारी भोकर श्रीमती दिपाली मोतीयेळे उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य)  श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्‍या नेतृत्‍वात चांगल्‍या प्रकारे प्रदर्शन केल्‍यामुळे सात (7) वेगवेगळया कलाप्रकारामध्‍ये प्रथम पारितोषक मिळाले त्‍यामुळे विभागात सांस्‍कृतिक स्‍पर्धेमध्‍ये नांदेड जिल्‍हयाने व्दितीय क्रमांक पटकावला यामुळे नांदेड जिल्‍हयास सर्वसाधारण जेतेपदाचा बहूमान मिळाला.
            या स्‍पर्धेमध्‍ये यश मिळविल्‍यामुळे प्र. जिल्‍हाधिकारी मा. श्री संतोष पाटील , निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी तसेच विभागीय तहसिलदार ना.. संघंटनेचे अध्‍यक्ष किरण अंबेकर , विभागीय महसूल कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष श्री लक्ष्‍मण नरमवार, राज्‍य  तलाठी संघटनेचे उपाध्‍यक्ष मुगाजी काकडे, तसचे जिल्‍हा तहसिलदार ना.. संघटनेचे अध्‍यक्ष व्‍यंकटेश मुंडे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष कुणाल जगताप, तलाठी संघटनेचे अध्‍यक्ष नन्‍हू कानगुले, वाहन चालक संघटना अध्‍यक्ष मधुकर वाठोरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष शंकर मगडेवार, कोतवाल संघटनेचे अध्‍यक्ष डोईवाड यांनी सर्व अधिकारी कर्मचारी खेळाडू यांचे अभिनंदन केले   पुढील वर्षी उस्‍मानाबाद येथे होणा-या विभागीय स्‍पर्धेमध्‍ये सुध्‍दा सर्व खेळाडू विजयाची परंपरा कायम ठेवतील हा विश्‍वास व्‍यक्‍त केला.                 
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...