विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेडचे
सर्वसाधारण विजेतेपद दहाव्यावर्षी कायम

या स्पर्धेत 36 क्रीडा
प्रकारामध्ये मराठवाडयातील महसूल विभागाच्या खेळाडूंनी प्रदर्शन केले होते. नांदेडने
सर्वाधिक 256 गुण मिळवीत आपले सर्वसाधारण विजेतेपद कायम
ठेवले. विभागीय स्पर्धेमध्ये यश मिळविण्यासाठी नांदेड जिल्ह्याने सांस्कृतिक स्पर्धेसाठी
तसेच क्रीडा प्रकार निहाय वेगवेगळी समिती स्थापन करुन या समितीचे प्रमुख म्हणून
उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब
तहसिलदार संवर्गातील अधिकारी यांच्या नेमणूका करुन क्रीडा प्रकार निहाय खेळाडूचा
सराव करुन घेतला. त्याचे फलित म्हणून नांदेडने सलग 10 व्या
वेळेस सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे.
या स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे, अपर जिल्हाधिकारी संतोष
पाटील, यांचे मार्गदर्शन तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज
कारभारी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) महेश वडदकर, जिल्हा पुरवठा
अधिकारी संतोष वेणीकर, नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदीप
कुलकर्णी, कंधारचे उपविभागीय अधिकारी प्रमोद मुळे, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड या सर्वांच्या नेतृत्वाखाली
तसेच जिल्हयातील सर्व तहसिलदार यांच्या सहकार्याने मैदानी क्रीडा प्रकारामध्ये अधिकारी
व कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केली. तसेच सांस्कृतिक स्पर्धेत भोकर उपविभागीय
अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे व उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा
ढालकरी यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे प्रदर्शन केल्यामुळे 7 वेगवेगळया
कलाप्रकारामध्ये प्रथम पारितोषक मिळाले व त्यामुळे विभागात सांस्कृतिक स्पर्धेत नांदेड
जिल्हयाने व्दितीय क्रमांक पटकावला. यामुळे नांदेड जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा
बहुमान मिळाला.
या स्पर्धेतील यशाबद्दल प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच विभागीय तहसिलदार
ना. त. संघटनेचे अध्यक किरण अंबेकर, विभागीय महसूल कर्मचारी
संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, राज्य तलाठी संघटनेचे
उपाध्यक्ष मुगाजी काकडे, जिल्हा तहसिलदार ना.त. संघटनेचे
अध्यक्ष व्यंकटेश मुंडे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष
कुणाल जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष नन्हू कानगुले, वाहन चालक संघटना अध्यक्ष मधुकर वाठोरे, चतुर्थश्रेणी
कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर मगडेवार, कोतवाल संघटनेचे
अध्यक्ष श्री डोईवाड यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी खेळाडुचे अभिनंदन केले व पुढीलवर्षी
उस्मानाबाद येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतसुद्धा सर्व खेळाडू विजयाची परंपरा कायम
ठेवतील हा विश्वास व्यक्त केला.
00000
No comments:
Post a Comment