Saturday, December 2, 2017

धर्मादाय रुग्णालयाचे आरोग्य शिबीर
निर्धन, गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा
नांदेड, दि. 2 :- धर्मादाय रुग्णालय योजनेंतर्गत रविवार 3 डिसेंबर 2017 रोजी नांदेड येथे तीन ठिकाणी  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त निर्धन व गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईना धांडे यांनी केले आहे.  
आरोग्य शिबिराचे आयोजन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय गाडीपुरा येथे वाडेकर डॉक्टर, आंध्रा समितीच्या बाजुला गवळीपुरा येथे मोनार्क कॅन्सर हॉस्पीटल येथे भालेराव डॉक्टर तर मार्कंडेश्वर मंदिराजवळ गंगाचाळ मिलगेट परिसराजवळ रयत रुग्णालय डॉक्टर येथे करण्यात आले आहे. गरीब रुग्णांना मोफत उपचार तसेच दुर्बल लोकांना सवलतीच्या दरात उपचार देण्याची तरतूद आहे. कायद्याप्रमाणे शिबिरात गरजु लोकांना सर्व तपासण्या करुन पुढील मोफत उपचार महाराष्ट्रातील कोणत्याही धर्मादाय रुग्णालयात आजार संपुर्ण बरा होईपर्यंत देण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...