Saturday, December 2, 2017

सोयाबीन अनुदान वितरणाबाबत  
जिल्हा उपनिबंधकाचे आवाहन  
नांदेड , दि. 2 :- खरीप हंगाम सन 2016-17 मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेले सोयाबीन अनुदान वितरण करण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांनी बँक खात्याचा तपशील दिला नसल्याने रक्कम बचत खात्यात जमा करण्यास अडचण येत आहे. बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक खात्याचा तपशीलासह संबंधीत तालुका सहाय्यक निबंधक यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
राज्यातील खरीप हंगाम सन 2016-17 मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्यादृष्टीने 1 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये तर जास्तीतजास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजुर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक, पात्र लाभार्थी संख्या 10 हजार 630 असून 3 कोटी 85 लाख 29 हजार 206 रुपये शासनामार्फत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड कार्यालयास प्राप्त झालेली आहे. हे अनुदान पात्र लाभार्थ्यांचे बचत खाती वर्ग करण्यासाठी संबंधीत तालुका कार्यालयास वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँकेच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे. परंतु काही लाभार्थ्यांनी बँक खात्याचा तपशील दिला नाही त्यामुळे मुदतीत बँक खात्याचा तपशील सादर न केल्यास सदर रक्कम शासनाकडे परत केली जाईल, असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रात नमुद केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...