Saturday, December 2, 2017

आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती
"महाडीबीटी" संकेतस्थळाद्वारे
नांदेड दि. 2 :- सन 2017-18 पासून राज्य शासनातर्फे सर्व शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसीत करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी https://mahadbt.gov.in हे आहे. संचालक माहिती तंत्रज्ञान यांचेमार्फत हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, विद्यावेतन, निर्वाह भत्ता वितरीत करावयाच्या योजनांचा समावेश या संकेस्थळात करण्यात आला आहे, अशी माहिती  किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.
अनुसूचित जमातच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा, निर्वाह भत्ता, विद्यावेतन योजना विषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरल्यापासुन ते रक्कम लाभार्थ्यांच्या बॅ खात्यात जमा करण्याची सर्व प्रकिया आता राज्यस्तरीय डिबटी पोर्टलद्वारे करणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅ खात्यावर लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सुचना महाडटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाणार आहे. त्यामुळे संबधित विद्यापिठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतन यांनी कोणत्याही अनुसूचित जमातच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळेस शिक्षण शुल्काची रक्कम मागणी करु नये अथवा घेऊ नये तसेच अनुसूचित जमातच्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणुक होणार नाहयाची योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबधित शैक्षणिक संस्थची असेल. आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना, यत्ता 1 ते 10 वी सुवर्ण महोत्सवी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आलआहे.
डीबीटी पोर्टलवर नोदणी करण्यासाठी विद्यार्थी, पालकांना पुढील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुर्वतयारी- विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे, कोअर बँकिग सुविधा असलेल्या बॅकेच्या शाखेत खाते उघडणे आवश्यक आहे. जातीचा दाखला जात, जात वैधता प्रमाणपत्र, दहावी-बारावी तसेच मागील वर्षांचे परीक्षा त्तीर्ण झालेला दाखला गुणपत्रक जन्मतारेखेचा दाखला रहिवासी, उत्पन्न प्रमाणपत्र प्रवेशित अभ्यासक्रमाची कालावधी, बॅकेच्या पासबुकची झेराक्स, आधार कार्ड, दिव्यांग असल्यास दिव्यागाचा दाखला शिधापत्रिका आदी कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी करताना Internet Exploer, Google,Mozilla firefox या कोणत्याहब्राउझरचा वापर करुन https//mahadbt.gov.in या वेबवर जाऊन नव नोदणी बटणावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांने (ज्या विद्यार्थ्यांने यापुर्वी etribal पोर्टलवर नोदणी केली होती त्यांनी सुध्दा mahadbt या पोर्टलवर नोदणी करणे अनिवार्य आहे. आधार क्रमाकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. आधार कार्ड असेल होय नसेल तर नाहवर क्लिक करावे. त्यांनतर OTP हा पर्याय निवडा. वैध आधार क्रमा टाकल्यानंतर OTP पाठवा बटन क्लिक करावे. मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला आटीपी (One time password ) टाकुन पडताळणी करावी. उपलब्ध विंडोजमध्ये नाव, जन्म दिना, मोबाई नंबर, पत्ता आधार, संलग्न बॅक खाते क्रमांक आदी माहिती आपोआप दिसेल. आधार क्रमा नसल्यास, आधार कार्ड नाही हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी कागदपत्रे अपलोड करावीत. नोदणी अर्जाच्या विंडोमधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम पासवर्ड तयार करावा. 
अर्ज कसा करताना महाडटी पोर्टलवर लॉगईन करण्यासाठी सिलेक्ट युजरमध्ये जाऊन विद्यार्थी हा पर्याय निवडा. युजर नेम पासवर्ड टाकुन लॉगईन व्हावे. लॉगीन झाल्यानंतर विडोमधील योजना तपश यावर क्लिक रुन त्यांनतर विभागावर योजना पाहु शकतो निवडु शकतो. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा  त्या योजनेच्या नावासमोर क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसु शकेल. त्यांनतर कोणत्या योजनावर मॅट्रिकपुर्व, मॅट्रिकोत्तरसाठी आपण पात्र आहात त्याची खात्री करा पर्याय क्लिक करा. (उदा. शालेय विद्यार्थ्यांनी मॅट्रिक पुर्व महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांनी मॅर्टिकोत्तर हा पर्याय निवडा.) आवश्यक ती माहिती उदा. जात प्रवर्ग महाराष्ट्राचे हिवासी पंगत्व,कौंटुबिक उत्पन्न आदी संकेतस्थळात काळजीपुर्वक भरावी. पालकाच माहिती, शाळा/ महाविद्यालय तपशिल नमुद करावा.वश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. (रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला, एस.एस.सी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र बॅक खाते क्रमांक आधार कार्ड क्रमांक आदी). अभ्यास क्रमांकाचा तपश, मागील परीक्षा त्तीर्ण झाल्याचा आदी सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेजमधील सादर या बटनावर क्लिक करायचे आहे. विद्यार्थी, पालकांना काह अडचणी असल्यास त्यांनी 1800 1025 311 या टोल फ्रवर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या इमेल आयडीवर संपर्क करावा.
महाविद्यालयासाठी ूचना- महाडिबिटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोदणी करणे अर्ज भरणे विषयी सहकार्य करावे. अनुसूचित जमातच्या पात्र विद्यार्थ्यांकड प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काची रक्कम घेवु नये. अनुसूचित जमातच्या विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे, कोअर बॅक सुविधा असलेल्या बॅकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयात मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे,अभ्यासक्रमाचा कालावधी, प्रवेश क्षमता महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश या बाबतची माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी आपआपल्या आयुक्तालयास मॅप करण्याची कार्यवाही करण्यात यावी. महाविद्यालय त्यांचा अभ्यासक्रम त्याची प्रवेश क्षमता अभ्यासक्रमाचा कालावधी शुल्क रचना आदी माहिती पोर्टलवर समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची असेल त्यासाठी ज्या प्राधिकाऱ्यानी (Authority) मान्यता दिली आहे त्यांच्याशसंपर्क साधावा.
आतापर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि शिक्षण शुल्काची रक्कम विद्यर्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाच्या खाते क्रमाकावर जमा करण्यात येत होती. परंतु आता देय होणारी वित्तीय लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यावर  जमा करण्यात येणार आहे, असेही किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. 

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...