Friday, August 18, 2017

महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 18 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 21 ऑगस्ट 2017 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
सोयाबीन, कपाशीवरील
किडीपासून संरक्षणासाठी संदेश
नांदेड, दि. 18 :- जिल्हयात  सोयाबीन, कापुस पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांसाठी किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
सोयाबीनवरील उंटअळी , पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी निबोंळी अर्क 5 टक्के  + प्रोफेनोफॉस  50 ई .सी 20 मिली  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. किंवा अळीच्या नियंत्रणासाठी इन्डोक्झीकार्ब 15.8 इ.सी. 7 मि.ली. किंवा स्पिनेटोरम 11.7 एस.सी 9 मि.ली.  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
कपाशीवरील गुलाबी  बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमनट्रप्स एकरी 5 लावावेत.  फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी सी 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी  थायमिथाक्झाम 12.6 + लॅमडा सायलोथ्रिन 9.5 झेडसी 3 ग्रॅम  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन  नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन
खेळाडू गौरवासाठी नोंदणी करावी
नांदेड दि. 18 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 29 ऑगस्ट 2017 रोजी खालसा हायस्कुल नांदेड येथे राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडुंचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडुंनी नावे नोंदविण्यासाठी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह गुरुवार 24 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.
क्रीडामय वातावरण निर्माण व्हावे, खेळाडुंना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हॉकीचे महान खेळाडू स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यातील शाळांनी क्रीडा दिन साजरा करुन शालेयस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करावे. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर व्याख्याने ठेवावीत. त्याबाबतचा अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाने केले आहे.

000000

Wednesday, August 16, 2017

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
नांदेड दि. 16 :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे माजी विद्यार्थांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे व्यासपीठ प्राचार्य पी. डी. पोपळे यांनी मिळवून दिल्याबद्दल संस्थेचे माजी विद्यार्थी तथा नांदेड पाटबंधारे विभागात अधिक्षक अभियंता या पदावर कार्यरत असलेले समाधान सब्बीनवार यांनी आभार मानले. संस्थेच्या भावी काळात माजी विद्यार्थी संघटनेच्या रुपाने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने संस्थेत वृक्षारोपन कार्यक्रम गतवर्षी राबविण्यात आला, इतकेच नव्हे तर त्यांची वर्षभरापासून निगा घेवून वाढविण्यात आल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. बी. उश्केवार यांनी सांगितले. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांने आपल्या मिळकतीतील अर्धा टक्का तरी संस्थेच्या विकास कामात दयावा, असे आवाहन श्री. उश्केवार यांनी केले. प्राचार्य पोपळे यांनी तंत्रनिकेतनमधील  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात माजी विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदू शकतात.
संस्थेच्या विकास कामात माजी विद्यार्थ्यांनी सक्रीय होण्याचे आवाहन केले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तथा शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे माजी प्राचार्य एस. एम. खासीम, सचिव ए. एम. मुद्दमवार, कोषाध्यक्ष एस. व्ही. अस्पत, सदस्य शिव सुराणा, जी. आर. मिरासे, उल्हास सुकळकर, गिरीष आरबड यांच्यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपआपल्या विभागाला भेटी दिल्या.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी  एस. पी. कुलकर्णी, के. एस. कळसकर, आर. एम. दुलेवाड, व्ही. व्ही. कुलकर्णी, एस. आर. मुधोळकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार आर. के. देवशी यांनी केले.  

000000
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीचे कामे
तपासुन पुर्ण करावीत  - पालकमंत्री खोतकर   
नांदेड दि. 16 :- पर्जन्यमान कमी असल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये, यासाठी संबंधीत यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासुन पुर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.       
जलसंपदा लघुसिंचन, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे, जलसंपदा नांदेड पाटबंधारे दक्षीण, उत्तर विभागांतर्गत  कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आढावा बैठक पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 15) जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आ. अमर राजुरकर, आ. हेमंत पाटील, आ. डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, मनपा आयुक्त गणेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सबीनवार, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.    
पालकमंत्री श्री. खोतकर पुढे म्हणाले की, टंचाई व अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाचे गेट उघडता व बंद करता आली पाहिजे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या 18 नंबर गेटची व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेट दुरुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी. प्रकल्पातील पाणी वाहुन जाणार नाही याबाबत दक्षता घेऊन दुरुस्तीची कामे पुर्ण करावीत. पुढील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाऱ्यातील साठलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी दक्ष रहावे. गेटची किरकोळ दुरुस्ती, नादुरुस्त गेटसाठी, बांधकाम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधीत विभागाकडुन किंवा आमदार निधीतून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या विभागाने कोल्हापुरी बंधारे बांधली त्यांनी बंधाऱ्याची देखभाल पुर्ण करावी. यासाठी वेळेत दखल घेऊन यंत्रणांनी सतर्क राहून त्याबाबत तयारी करावी. जिल्हाधिकारी नांदेड यांनी कोल्हापुरी बंधाऱ्यांना भेटी देऊन पाहणी करावी. त्याबाबत कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. खोतकर यांनी दिल्या.  
जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या 176 असून संकलीत गेटची संख्या 12 हजार 465 आहे. कार्यरत असलेल्या गेटची संख्या 8 हजार 671, नादुरुस्त गेटची संख्या 3 हजार 794 आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.  

000000

Tuesday, August 15, 2017

आत्महत्याग्रस्त शेतकरी व्यंकटी हाळे यांच्या 
कुटुंबियांना पालकमंत्री खोतकर यांच्या हस्ते
एक लाख रुपयांची मदत सुपुर्द
नांदेड दि. 15 :- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी शासन खंबीरपणे उभे असून समाजानेही त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.  
 लोहा तालुक्यातील बामणी येथील व्यंकटी हाळे या शेतकऱ्याने परिस्थितीमुळे असहाय्य झाल्याने आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक लाख रुपयाची मदत देण्यात आली. पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते 30 हजार रुपयाचा धनादेश त्यांच्या पत्नी जनाबाई व्यंकटी हाळे यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आला. तर उर्वरीत 70 हजार रुपये पोस्ट कार्यालयात एमआयएस योजनेत बचत करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, लोहा तहसिलदार डॉ. अशिषकुमार बिरादार, सरपंच, नागरीक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. खोतकर यांनी हाळे कुटुंबियांची आस्थेवाईक विचारपूस केली. शेतकऱ्यांनी त्रस्त होऊन आत्महत्या करु नये. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनौधैर्य कायम ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या विविध योजनेतून  हाळे कुटुंबियांना उभे करण्यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाने त्वरीत करावी. मुलांचे शिक्षण, वसतिगृह प्रवेशासाठी जिल्हा परिषदेकडून मदत करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गावातील नागरिकांशी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांनी कोणती चिंता करु नये. शासनाकडून शेतकऱ्यांना सर्व सहकार्य राहील, असे सांगितले.  
हाळे कुटुंबियांना केलेल्या मदतीबद्दल गावातील नागरिकांनी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचे आभार मानले व शासन आमच्या सोबत असल्याचे सांगितले.
000000


  संगणकीकृत सातबारा सुविधेचा
शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - पालकमंत्री खोतकर

नांदेड दि. 15 :- डिजीटल स्वाक्षरीचा संगणकीकृत सातबारा देण्याची चांगली सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
डिजीटल इंडीया भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत नांदेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा वितरणाचा कार्यक्रम नांदेड तहसिल कार्यालयातील व्हेंडिंग मशिन कक्षात किऑस्‍क सातबारा व्‍हेंडीग मशीनचे उद्घाटन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. अमर राजुरकर, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे (एनआयसी) चे  माहिती अधिकारी सुनील पोटेकर यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तहसिलदार किरण अंबेकर यांनी संगणीकृत सातबारा शेतकऱ्यांना देण्यासाठी किऑस्‍क सातबारा व्‍हेंडींग मशीन एटीएमप्रमाणे मनुष्‍य विरहीत आहे. या मशीनद्वारे 20 रुपयात सातबारा देण्‍याची सोय उपलब्‍ध असल्याची माहिती दिली.   
यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात शेतकऱ्यांना डिजीटल स्वाक्षरी सातबाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपनही करण्‍यात आले.  
सुत्रसंचालन नायब तहलिसदार विजय चव्‍हाण यांनी केले. संगणकीकृत सातबारा वितरण कार्यक्रमात उत्‍कृष्ट काम केल्‍याबद्दल नायब तहसिलदार वि. ना. पाटे, मंडळ अधिकारी श्री. जोंधळे, श्री. सहारे, तलाठी पठाण यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे संयोजन नायब तहसिलदार मुगाजी काकडे, गजानन नांदगावकर, श्री. पोकले, कुणाल जगताप, मधुकर फुलवळे, मंडळ अधिकारी नागरवाड, जोंधळे  लक्ष्‍मण नरमवार, टेभूर्णेवार, गोडबोले यांनी केले.  
000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...