Thursday, June 22, 2017

खते, बी-बियाणे खरेदीची काळजी घेण्याचे
कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड, दि. 22 :- जिल्हयाच्या बहुतांश भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांना वेग दिला आहे. पेरणीच्या घाईत बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करताना फसवणूक होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्यांसाठी बियाणे, अधिकृत परवानाधारक  विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. गावात फिरुन वाहनांतून खते व बियाणांची विक्री करणाऱ्यांकडून खरेदी करु नये. अशा व्यक्ती कमी भावात खते व बियाणांची विक्री करत असल्या तरी यातून बनावट खते व बियाणांची विक्री होऊन फसवणूक होऊ शकते. असे प्रकार शेतकऱ्यांनी तातडीने कृषि विभागाच्या निदर्शनास आणून दयावेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह बियाणे व खते खरेदी करा. पावतीवर शेतकरी व विक्रेता या दोघांच्या स्वाक्षरी असावी. खरेदी केलेल्या बियाणांचे आवरण (वेष्टन) पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावेत. बनावट व भेसळयुक्त बियाणांची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करा.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाची व छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे व खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करणे आवश्यक असल्याचे  श्री. पंडीत मोरे यांनी सांगितले. किटकनाशकांच्या बाबतीत ते अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशकांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वणी, ई-मेल व एस.एम.एस. द्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 व (02462) 230123 व भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वणी क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने केले आहे.

000000
अनाधिकृत खत विक्री करणाऱ्या कृषि केंद्रावर गुन्हा दाखल
 अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खत खरेदी करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 22 :-  मुखेड तालुक्यातील कैलास कृषि सेवा केंद्र बाऱ्हाळी येथे शेतकऱ्यांना कच्ची पावती देवून रासायनिक खताची अनाधिकृत विक्री करण्यात येत होती. याबाबत तालुकास्तरीय पंचायत समिती पथकाने खत विक्री केंद्रास भेट देवून रासायनिक खताची कच्ची पावतीने विक्री करत असताना वसंत महाजन यांच्या विरुध्द खत नियंतत्रण आदेश 1985 अन्वये व अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 कलम 3 (7) अन्वये पोलीस स्टेशन मुक्रामाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला. डीएपी 54 बॅग व युरिया 194 बॅगाची किंमत 1 लाख 17 हजार  600 रुपयाच्या खत विक्रीचा बंद आदेशही देण्यात आला. जिल्हयातील शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्यासाठी बियाणे, खत अधिकृत परवानाधारक  विक्रेत्यांकडून खरेदी करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले. 
मुखेड तालुक्यात बाऱ्हाळी येथील कैलास कृषि सेवा केंद्र येथे कच्ची पावती देवून खत विक्री करीत असल्याबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुका कृषि अधिकारी श्री. नरनाळे, कृषि अधिकारी ए. व्ही.अंचलवाड यांच्या पथकाने या प्रकरणी मुक्रामाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केल आहे.   अशाच प्रकारे अनाधिकृत आर.आर.बी.टी.-3 कापूस बियाणे अनाधिकृत विक्री होत असल्या प्रकरणी पोलीस स्टेशन इस्लापूर येथे व अनाधिकृत पिक वाढ संजिवके तयार करत असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशन नायगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावात फिरुन वाहनातून खते व बियाणाची विक्री करणाऱ्याकडून खरेदी करु नये. अशा व्यक्ती कमी भावात खते व बियाणाची विक्री करत असल्या तरी यातून बनावट खते व बियाणाची विक्री होऊन फसवणूक होऊ शकते. असे प्रकार शेतकऱ्यांनी तातडीने कृषि विभागाच्या निदर्शनास आणून दयावेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्की पावतीसह बियाणे व खते खरेदी करावी. पावतीवर शेतकरी व विक्रेता या दोघाची स्वाक्षरी असावी. खरेदी केलेल्या बियाणाचे आवरण (वेष्टन) पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावेत. बनावट व भेसळयुक्त बियाणांची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पॉकिटे सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करा.
बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाची व छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने बियाणे व खतांची विक्री होत असल्यास जादा दराने तसेच कच्ची पावतीद्वारे बियाणे खताची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागाची संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मोहीम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क करणे आवश्यक असल्याचे कृषि विकास अधिकारी श्री  मोरे यांनी सांगितले. किटकनाशकांच्याबाबतीत ते अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशकांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल व एसएमएसद्वारे तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 व (02462) 230123 व भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.

000000

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
 हप्ता भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदत

नांदेड, दि. 22 :- राज्यात खरीप हंगाम 2017 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयात भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याची अंतिम मुदत सोमवार 31 जुलै 2017 पर्यत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छिक आहे. जिल्हयात खरीप हंगाम 2017 मध्ये ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लिमीटेड नवीन स्टॉक एक्सेंज बिल्डींग, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु. / हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
भात
39,000/-
780/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
30,000/-
600/-
मुग
18,000/-
360/-
उडीद
18,000/-
360/-
सोयाबीन
40,000/-
800/-
तीळ
22,000/-
440/-
कापुस
40,000/-
2,000/-

0000000
स्टेट बँक विमा कंपनीकडून
दोन लाखाचा धनादेश वितरीत
नांदेड दि. 22 :-  स्टेट बँक ऑफ इंडिया जनरल विमा कंपनीकडून दोन लाख रुपये अपघात विम्याचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया गुरुद्वारा चौक शाखेत मयत शिवाजी बरोले यांच्या आईस बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक राजेंद्र पत्की यांच्या हस्ते आज देण्यात आला.
शिवाजी बरोले (20 वर्षे) हा तरुण स्टेट बँक ऑफ पटियाला येथे रोजंदारीवर काम करत होता. कर्तव्य बजावण्यासाठी घरुन निघाले असता वाटेत त्यांचा मालवाहू ट्रकच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला. भारतीय स्टेट बँकेने सुरु केलेल्या अपघात विमा योजनेंतर्गत शिवाजी बरोले यांनी शंभर रुपये भरुन विमा काढला होता. अपघाती मृत्यू नंतर त्याचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना झाला आहे.
यावेळी स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक विजय खेडकर, संघटनेचे प्रतिनिधी जसबीरसिंघ तुटेजा, शाखा प्रबंधक मनदीपसिंघ, इन्शोरन्स कंपनीचे विजय राठोड, रामेश्वर जाधव यांची उपस्थिती होती.

0000000
अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी
10 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 :- अण्णा भाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रक व पुढील वर्गात प्रवेश घेतल्याच्या पुराव्यासह सोमवार 10 जुलै 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदवीव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी आभ्यासक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने 80 टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुणक्रमानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णाभाऊ साठे गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.  
अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी देण्यात यावीत. सोमवार 10 जुलै नंतर अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत, असेही आवाहन महामंडळाने केले आहे.  

000000
अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी  
  साठे विकास महामंडळाचे आवाहन
नांदेड दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने अनुदान योजना व बीजभांडवल योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवुन महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेचे 1 हजार 150 व बीज भांडवल योजनेचे 225 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीसाठी उद्योगाचे कर्ज जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठी उद्दीष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसाय जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबाबत ग्रामसेवकाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहन खरेदीसाठी लायसन्स / परमीट / बॅच , वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत असावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी संपर्क साधावा.

000000
व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी  
अपंग प्रशिक्षण केंद्रात अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 22 :- व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत शासन मान्यता अभ्यासक्रमासाठी 15 ते 35 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक अपंग मुला-मुलींनी, पालकांनी शुक्रवार 30 जुन 2017 पर्यंत तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र शिवनेरीनगर रामपूर रोड देगलूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन देगलूर तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण संस्थेच प्राचार्य यांनी केले आहे.  
प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण ( सीसीईन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॅम्प्युटर टायपिंग), वेल्डर आणि सीट मेटल, शिवण व कर्तनकला आणि सीसीईन सौंदर्यशास्त्र, सीसीईन वायरमन आणि प्लंबर, सीटीसी आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत.
संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रवेशानंतर निवास, वैद्यकीय औषधोपचार व प्रशिक्षण साहित्य व विद्यावेतन दिले जाणार आहे.

0000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...