Thursday, June 22, 2017

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा
 हप्ता भरण्यास 31 जुलै पर्यंत मुदत

नांदेड, दि. 22 :- राज्यात खरीप हंगाम 2017 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयात भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पक विमा उतरवण्याची अंतिम मुदत सोमवार 31 जुलै 2017 पर्यत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंव जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
 या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान त्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक अस, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाच्छिक आहे. जिल्हयात खरीप हंगाम 2017 मध्ये ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लिमीटेड नवन स्टॉक एक्सेंज बिल्डींग, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, ुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु. / हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
भात
39,000/-
780/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
30,000/-
600/-
मुग
18,000/-
360/-
उडीद
18,000/-
360/-
सोयाबीन
40,000/-
800/-
तीळ
22,000/-
440/-
कापुस
40,000/-
2,000/-

0000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...