Thursday, June 22, 2017

अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी  
  साठे विकास महामंडळाचे आवाहन
नांदेड दि. 22 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने अनुदान योजना व बीजभांडवल योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवुन महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेचे 1 हजार 150 व बीज भांडवल योजनेचे 225 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीसाठी उद्योगाचे कर्ज जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठी उद्दीष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसाय जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, प्रकल्प अहवाल, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबाबत ग्रामसेवकाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहन खरेदीसाठी लायसन्स / परमीट / बॅच , वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत असावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...