Monday, June 19, 2017

पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
           नांदेड, दि. 19 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
            मंगळवार 20 जुन 2017 रोजी जालना येथून मोटारीने सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड येथील नवीन शाखेचे उद्घाटन. स्थळ - प्लॉट न. 180, वसंतनगर, शारदानगर बसस्टॉपजवळ नांदेड. सकाळी 10.45 वा. दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या नांदेड येथील नवीन शाखेचे उद्घाटनासंबंधीत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- हॉटेल सिटी प्राईड, नमस्कार चौक, विमानतळ रोड, नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांची बैठक. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 6 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.   

00000
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
           नांदेड, दि. 19 :-  राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार 30 जुन 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 30 जुन 2017 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 9 वा. आयपीडीएस योजनेअंतर्गत तरोडा नाका ता. नांदेड , लोहा, कंधार, बिलोली व DDUJY योजनेअंतर्गत 33 केव्ही उपकेंद्र अमराबाद (बारसगाव) ता. अर्धापूर, हळदा ता. कंधार, कासारखेडा ता. नांदेड, चंडोला, जांब ता. मुखेड, लोहगाव ता. बिलोली, ढोलउमरी ता. उमरी, घोगरी ता. हदगाव, मालबोरगाव ता. किनवट, पोटा ता. हिमायतनगर व येताळा ता. धर्माबादचे भुमीपुजन. स्थळ- अधीक्षक अभियंता, महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण.  दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यास्तव राखीव वेळ. स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत लोकप्रतिनिधी समवेत बैठक स्थळ- अधीक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयातील सभागृह. दुपारी 4 वा. पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. नांदेड येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

Sunday, June 18, 2017

 जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 11.54 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 18 - जिल्ह्यात रविवार 18 जुन 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 11.54 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 184.68  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 115.89 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 12.34 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 18 जुन रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 28.38 (165.77), मुदखेड- 17.00 (144.00), अर्धापूर- 6.00 (123.33) , भोकर- 24.00  (145.75) , उमरी- 18.67 (76.67), कंधार-18.17 (137.34), लोहा-16.50 (122.50), किनवट- 2.57 (116.29), माहूर- निरंक (119.38), हदगाव- 8.86 (160.47), हिमायतनगर- 15.33 (79.15), देगलूर- 2.33  (72.00), बिलोली- 4.40 (89.80), धर्माबाद- 3.67 (105.34), नायगाव- 10.80  (91.86), मुखेड- 8.00 (104.57) आज  अखेर  पावसाची सरासरी 115.89 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1854.22) मिलीमीटर आहे.
00000



Saturday, June 17, 2017

जप्त रेतीसाठ्याचा दुसऱ्या फेरीचा
तहसिल कार्यालयात सोमवारी लिलाव
 नांदेड दि. 17 -  नांदेड तालुक्यातील विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून गंगाबेट, वाहेगाव, म्हाळजा, वांगी, नागपुर या ठिकाणचा अंदाजे 3 हजार 115 ब्रास रेतीसाठा , या रेती साठ्याचा दुसऱ्या फेरीचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली सोमवार 19 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाणी रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जुन रोजी
श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन
 नांदेड दि. 17  :- आयुष संचालनालयाच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बुधवार 21 जुन 2017 रोजी सकाळी 6.30 ते 8 या कालावधीत नांदेड शहरात मध्यवर्ती कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन यात्री निवास नांदेड येथे केले आहे. जिल्ह्यातील योगसाधक व नागरिकांनी या शिबिरात सहभाग होण्याचे आवाहन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एच. श्यामकुवर व योग समन्वय समितीचे समन्वयक डॉ. वाय. आर. पाटील यांनी केले आहे.
याठिकाणी साधारणता 1 हजार योग साधक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहर व नांदेड जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमियोपॅथिक महाविद्यालये, इतर आरोग्य विज्ञान संस्था, योग व सामाजिक संस्था यांचे संयुक्तरित्या योग प्रात्यक्षिक वर्ग घेवून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. योगाच्या या मध्यवर्ती कार्यक्रमास सहभागी होण्यास इच्छुक संस्था व साधकांनी योग समन्वयक समितीचे डॉ. वाय. आर. पाटील यांना भ्रमणध्वनी 9370456057, 9158885511 वर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000000
जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा 
तहसिल कार्यालयात मंगळवारी लिलाव
 नांदेड दि. 17 -  नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 19 ठिकाणचा अंदाजे 11 हजार 680 ब्रास रेतीसाठा , या रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली मंगळवार 20 जुन 2017 रोजी दुपारी 12 वा. तहलिस कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी नांदेड तालुक्यातील रहाटी मंडळ अंतर्गत रेती साठ्याचे ठिकाणी रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Friday, June 16, 2017

जमीन महसूल अधिनियम
1966 मध्ये सुधारणा 

                औरंगाबाद, दि. 16:-  महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42  ब मध्ये सुधारणा केली असून, त्यानुसार ज्या ठिकाणी अंतीम विकास आराखडा प्रसिध्द झाला असेल त्या ठिकाणी विविध  प्रयोजनासाठी नमूद केलेल्या जमीनींचा त्या प्रयोजनासाठी वापर करण्यासाठी बिगर शेतीची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही. अशा जमीनी संबंधात तहसीलदार यांच्याकडे रुपांतरीत कर, अकृषीक आकार व जमीन वर्ग-2 ची असल्यास निर्धारीत केलेला नजराणा भरणा केल्यास अशी जमीन आपोआप त्या विकास आराखड्यातील मंजूर प्रयोजनासाठी अकृषीक झाली आहे, असे समजण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी दिली.
                      या अधिनियमातील कलम 42 (क) मध्ये झालेल्या दुरुस्तीनुसार ज्या ठिकाणी प्रादेशीक विकास योजना मंजूर असेल किंवा प्रारुप आराखडा प्रसिध्द केला असेल अशा ठिकाणीसुध्दा अशा आराखड्यातील मंजूर प्रयोजनासाठी  वरील प्रमाणे रक्कमेचा भरणा केल्यास अशी जमीन आपोआप अकृषीक झाली असे समजण्यात येईल व त्याच प्रयोजनाबाबत जमीनीचे अभिलेख्यात बदल करण्यात येईल, त्यामुळे या पुढे अशा विकास योजनेत किंवा प्रादेशिक विकास योजनेस समाविष्ट असलेल्या जमिनींमुळे अकृषीक परवानगीची आवश्यकता असणार नाही.
                      अशा मंजूर विकास योजनेमध्ये / अथवा प्रादेशिक विकास योजनेमध्ये ज्या धारकांच्या जमिनी असतील त्यांना संबंधित तहसीदारांमार्फत लवकरच नोटीसा पाठविण्यात येतील. तसेच जमीनधारकांनी स्वत: संपर्क साधून अर्ज केल्यास अशी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करुन त्यांना  जमिनी अकृषीक झाल्याबद्दल सनद प्रदान करण्यात येईल.    या सुधारीत तरतुदीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबंधित नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही डॉ. भापकर यांनी केले आहे.

                                                            -*-*-*-*-*

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...