Friday, May 26, 2017

            ग्रामपंचायत निवडणुकीमुळे  
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील  लोहा तालुक्यातील घोटका व कंधार तालुक्यातील हणमंतवाडी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार 27 मे 2017 रोजी मतदान व सोमवार 29 मे 2017 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी लोहा तालुक्यातील घोटका व कंधार तालुक्यातील हणमंतवाडी येथे मद्य विक्रीच्या कोणत्याही अनुज्ञप्त्या कार्यरत नाहीत. परंतू मतमोजणीही लोहा व कंधार तहसील कार्यालयात होत असल्यामुळे सोमवार 29 मे 2017 रोजी मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी होत असलेल्या स्थानीकच्या सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल, बिआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत मद्यविक्रीस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे. 

000000

Thursday, May 25, 2017

शेतकऱ्यांनी कृषि उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन
तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 25 :- शेतकऱ्यांनी  कृषि उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शेतीला पशुसंवर्धनाची जोड दयावी. कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, बकरी पालनासारखे शेतीपुरक व्यवसाय करावेत. यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनेचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज केले.
लोहा तालुक्यातील दापशेड येथे “उन्नत शेती-समृद्ध शेतकरी” अभियान पंधरवाडयाच्या उदघाटन समारंभात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रताप पाटील चिखलीकर, लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर भातलवंडे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) डॉ. प्रविणकुमार घुले, लोहा तालुका कृषि अधिकारी विश्वंभर मंगनाळे, लोहाचे तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेश गुंडरे, गटविकास अधिकारी श्री. फांजेवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
जलसंधारणाच्यादृष्टिने जलयुक्त शिवार अभियान महत्वाचे आहे. या अभियानामधील विविध कामांमुळे शाश्वत सिंचन निर्माण होण्यास मदत होते. सिंचनाच्या उपलब्धतेमुळे शेती उत्पादनात वाढ होईल. या अभियानात शेतक-यांनी सहभाग घ्यावा. लोकसहभागातून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, फलोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्याबरोबर शेतीपुरक जोडधंदाकडेही लक्ष देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  

महाराष्ट्र शासनाचा  “उन्नत शेती-समृद्ध शेतकरी” हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असुन त्यामध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांमुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त शेतक-यांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. लोहा-कंधार तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची चांगली कामे केल्यामुळे प्रशासनाची त्यांनी स्तुती केली.
            जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे  यांनी खरीप पिकांच्या उत्पादन वाढीची सुत्रे सांगितली. घरच्या सोयाबीनाची उगवणशक्ती तपासुन ती 70 टक्याच्यावर आली तर बीजप्रक्रिया करुन घरचेच बियाणे वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कृषि यांत्रिकिकरण, पिक विमा, ठिबक सिंचन, मागेल त्याला शेततळे, गांडुळ खत, नाडेप, फलोत्पादन इत्यादी विषयांचीही त्यांनी माहिती दिली.
         
   या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लोहा तालुका कृषि अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांनी केले. या कार्यक्रमानंतर दापशेडमध्ये झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी करण्यात आली. यावेळी कृषि संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
0000000


     मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 मे 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून 26 जून 2017 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000


संस्थाचालकांना ऑनलाईन
माहिती भरण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 25 :- नोंदणीकृत संस्थाचालकांनी ज्यावर्षी नोंद झाली त्यावर्षीची व दरवर्षी आपल्या संस्थेची माहिती http://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावी. धर्मादाय संस्थेअंतर्गत येणारे सर्व कलम निहाय बदल अर्ज संकेतस्थळावर नोंद करावेत. तसेच संस्था नोंदणीचे नवीन प्रस्ताव ऑनलाईन सादर करावेत. लेखा शाखेचे हिशोबपत्रके, कलम 41 क अंतर्गत तात्पुरते वर्गणी गोळा करण्याच्या परवाण्यासाठी देखील ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन धर्मादाय उपाआयुक्त नांदेड यांनी केले आहे.  

000000

Wednesday, May 24, 2017

माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी
 केंद्रीय सैनिक बोर्डाकडून आर्थिक मदत
नांदेड, दि. 24 :- जिल्हयातील माजी सैनिक / विधवांच्या (हवालदार पदापर्यत)  दोन पाल्यांसाठी 12 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जे पाल्य सन 2016-17 या वर्षात इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांचेकडे मंगळवार 20 जुन 2017 पर्यत सादर करावे.  
ज्या माजी सैनिक / विधवांनी पेनुरी, मॅरेज मदतीसाठी अर्ज सादर केले नाहीत त्यांनीही ऑनलाईन अर्ज सादर करावे. ऑनलाईन  अर्ज www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ा आहेत. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कप्तान सुनिल गोडबोले यांनी केले आहे.

000000

Tuesday, May 23, 2017

कृषि तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
                "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवड्याचे 25 मे ते 8 जून या कालावधीत आयोजन   

नांदेड, दि. 23 :- कृषि तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती जोडव्यवसाय व विक्री तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवडा जिल्हयात गुरुवार 25 मे ते 8 जुन 2017 या कालावधीत साजरा होणार आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात त्याअनुषंगाने पंधरवडा नियोजन बैठकीत आज ते बोलत होते.   
            "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवड्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान तसेच शेती जोडव्यवसाय, प्रक्रिया, शेतमाल विक्री व्यवस्थापन याविषयी कृषि विभागाबरोबर इतर विभागाने सहभागी व्हावे, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्या. जिल्हयात पिकाची सरासरी उत्पादकता तसेच शेती जोडव्यवसायाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि संलग्न विभागांनी प्रयत्न करुन ठिबक सिंचन, पीक प्रात्यक्षिके, कृषि यांत्रिकीकरण, गुण नियंत्रण, फलोत्पादन आदी योजना शेतक-यांपर्यत पोहचविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.   
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, प्रकल्प संचालक (आत्मा)  एस. व्ही. लाडके, कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. बेग, कृषि विज्ञान केंद्राचे श्री. शिंदे व देशमुख, कृषि व कृषि संलग्न विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

000000

Monday, May 22, 2017

झारखंड राज्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे
उपाध्यक्ष गुरविंदर सिंग यांचा दौरा
नांदेड, दि. 22 :- झारखंड राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे गुरविंदर सिंग हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 23 मे 2017 रोजी पुणे येथून रेल्वेनी नांदेड येथे सकाळी 9.25 वा. आगमन. नांदेड येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम. बुधवार 24 मे 2017 रोजी सायंकाळी 5.30 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून रेल्वेनी पुणेकडे प्रयाण करतील.
000000


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...