कृषि
तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
"उन्नत
शेती-समृद्ध शेतकरी" पंधरवड्याचे 25 मे ते 8 जून या कालावधीत आयोजन
नांदेड, दि. 23 :- कृषि तंत्रज्ञानाचा
वापर करुन शेती जोडव्यवसाय व
विक्री तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे ,
असे प्रतिपादन
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. "उन्नत शेती-समृद्ध
शेतकरी" पंधरवडा जिल्हयात गुरुवार 25 मे ते
8 जुन 2017 या कालावधीत साजरा होणार
आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याअनुषंगाने
पंधरवडा नियोजन बैठकीत आज
ते बोलत
होते.
"उन्नत शेती-समृद्ध
शेतकरी" पंधरवड्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावात पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान
तसेच शेती जोडव्यवसाय, प्रक्रिया, शेतमाल
विक्री व्यवस्थापन याविषयी कृषि विभागाबरोबर इतर विभागाने सहभागी व्हावे, अशा सुचना
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिल्या. जिल्हयात पिकाची सरासरी उत्पादकता तसेच शेती
जोडव्यवसायाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि संलग्न
विभागांनी प्रयत्न करुन ठिबक सिंचन, पीक प्रात्यक्षिके,
कृषि यांत्रिकीकरण, गुण नियंत्रण, फलोत्पादन आदी योजना शेतक-यांपर्यत पोहचविण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी
श्री. डोंगरे यांनी दिले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी
संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे,
प्रकल्प संचालक (आत्मा) एस. व्ही. लाडके, कापुस संशोधन केंद्राचे प्रमुख
डॉ. बेग, कृषि विज्ञान केंद्राचे श्री. शिंदे व देशमुख,
कृषि व कृषि संलग्न विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment