Friday, August 22, 2025

वृत्त क्रमांक 895

रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड

देगलूर महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

नांदेड दि. 22 ऑगस्ट :-नांदेड जिल्ह्यातील रोजगार ईच्छूक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व देगलूर महाविद्यालयाच्यावतीने 21 ऑगस्ट रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन देगलूर महाविद्यालयात करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे हे होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 11 कंपन्यांनी 464 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला असून एकूण 281 उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

00000

वृत्त क्रमांक 894

सोमवारी किनवट येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड दि. 22 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10  वा. हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाथशाह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार 9860725448 यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 893

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

नांदेड, दि. 22 ऑगस्ट :  ग्रामविकास विभागाचे सहसचिव यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी पासुन परिशिष्ट 8 (अ) व 8 (ब) मध्ये पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

प्रसिद्धीचे ठिकाण नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बोटीस बोर्डावर, जिल्हा परिषद नांदेडच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर, संबंधित तहसिल कार्यालयाच्या बोर्डावर, संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in वर सदर जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

Thursday, August 21, 2025

 वृत्त क्रमांक 892 

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा दौरा 

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

 शुक्रवार 22 ऑगस्ट 2025 रोजी हिंगोली जिल्ह्यातील गंगापुर ता. कळमनुरी येथून निघून सकाळी 11 वा. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व भेट. सकाळी 11.30 वा. मुक्रमाबाद येथून मुखेड तालुक्यातील हसनाळाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. हसनाळा येथे पुरग्रस्त भागाची पाहणी व भेट. दुपारी 12.45 वा. हसनाळा येथून मोटारीने अर्धापूर मार्गे समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

 

वृत्त क्रमांक 891

ओबीसी महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड 

करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (OTS) देण्याबाबतची सुधारीत एकरकमी योजना 31 मार्च 2026 पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहिती व संपर्कसाठी पत्ता जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड 431605 (02462) 220865 हा आहे. 

00000

वृत्त क्रमांक 890

राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडाळाच्या

योजनेच्या लाभासाठी महामंडळाच्या ऑनलाईन नोंदणी सुरू  

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत 13 उपकंपन्याची स्थापना शासनाने केली असून सदर उपकंपन्याचे कामकाज या महामंडळामार्फत सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन नोदणी करावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हाव्यवस्थापक यांनी केले आहे. 

महामंडळ राबवित असलेल्या 6 योजना आहेत. त्यापैकी दोन योजना ऑफलाईन असून त्यांचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. 1 लाखापर्यतची थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजना 4 आहेत. 

या योजनेत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, सदर कर्ज योजना या बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ज्ञान माता शाळेसमोर नांदेड फोन न. 02462-220865 येथे संपर्क साधावा असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 889

मुखेड येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उद्घाटन

नांदेड, दि. 21 ऑगस्ट : मुखेड येथील न्यायालयीन संकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदिपकुमार सी. मोरे, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमास उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल गं. वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे, असे प्रबंधक जिल्हा न्यायालय नांदेड यांनी कळविले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...