Saturday, February 1, 2025

 #मुलींनामोफतशिक्षण

 



 #शासकीयसेवायोजनामहाशिबीर #महाशिबीर #किनवट #जिल्हाविधीसेवाप्राधिकरण #नांदेड





 वृत्त क्र. 137

८ फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर 

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, 

किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक 

नांदेड दि. १ फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11ः00 वाजता या महाशिबिराचे उदघाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा ,असे आवाहन मा. सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड, अभिजीत राउत, जिल्हाधिकारी, नांदेड,  श्रीमती दलजीत कौर जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे.

0000

दि. १ फेब्रुवारी 2025

 वृत्त क्र. 136

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जिल्ह्यातील हदगाव दौरा

नांदेड दि. १ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. २ फेब्रुवारीला सकाळी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्हयातील हदगाव येथील श्रीकृष्ण देवउखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळयाला ते उपस्थित राहणार आहेत.

उद्या सकाळी ते नागपूर येथून हेलिकॉप्टरने सकाळी ११.४५ ला नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे थेट हेलिकॉप्टरने पोहोचतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता हदगाव येथील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते मंदिर परिसरात पोहोचतील. मंदिर परिसरातील कार्यक्रम आटपून दुपारी एक वाजता पुन्हा हेलिकॉप्टरने ते नागपूरकडे रवाना होतील.
​0000

Friday, January 31, 2025

वृत्त क्र. 135

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 31 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारी 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक  134

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून 

नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान 

नांदेड दि. 31 : संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण देऊन तयार केले. कोषागारे कर्मचारी यांनी सुंदर असे सलामी व पथसंचलन केले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक आणले आहे. त्याबद्दल नांदेड पोलिस दलात कार्य करणारे पोलिस कर्मचारी सदानंद सपकाळे यांना जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृताल कश्यप बगाटे, बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांनी पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला व पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.

0000





केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...