Tuesday, November 5, 2024

 विधानसभा निवडणूक २०२४

 वृत्त क्र. 1037

नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह

मानवनिर्मित वस्तू उडविण्यास मनाई 

नांदेड दि. 5 नोव्हेंबर :- नांदेड जिल्‍ह्यात व शहरात तसेच श्री गुरुगोविंदसिंहजी विमानतळ परिसर, गुरुद्वारा परिसर व मोदी ग्राऊंड मामा चौक या परिसरात ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्‍य वस्‍तु  व हवेत उडविल्‍या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्‍तू उडविण्‍यावर 7 ते 9 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रतिबंध मनाई करण्यात आले आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे  कलम 163 (1) अन्‍वये प्राप्‍त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत. 

हा आदेश 7 नोव्हेंबर रोजीचे 00.00 ते 9 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंतच्या कालावधीत नांदेड जिल्‍ह्यात व शहरात तसेच श्री गुरुगोविंदसिंहजी विमानतळ परिसर, गुरुद्वारा परिसर, मोदी ग्राउंड मामा चौक या परिसरात  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे  कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्‍य वस्‍तु  व हवेत उडविल्‍या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्‍तू उडविण्‍याकरीता या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्‍यात आले आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्‍यांचे म्‍हणने ऐकूण घेण्‍यास पुरेसा अवधी नसल्‍याने आणीबाणीच्‍या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे  कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश 5 नोव्हेंबर रोजी निर्गमीत करण्‍यात आले आहेत.

00000

 वृत्त क्र. 1036

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 5 लाख रुपयांचे मद्य जप्त

 वृत्त क्र. 1035 

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध पर्यायांचा उपयोग करावा

-निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ 

नांदेड, दि. 5 नोव्हेंबर: निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान प्रक्रिया अधिक सक्षम,प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी विविध चार पर्याय निवडणूक आयोगाने दिले असून, त्याचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी केले आहे. 

त्या चार पर्यायांची माहिती पुढील प्रमाणे आहे. 

आचारसंहिता नियंत्रण कक्ष

हा कक्ष तहसील कार्यालय, नांदेड येथे पहिल्या मजल्यावर स्थित असून पंचायत समितीच्या सभागृहात चोवीस तास या कक्षाचे कार्य अविरतपणे चालू आहे. 

आचारसंहितेचे काही उल्लंघन आढळल्यास अथवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी या कक्षात प्रत्यक्ष येवून आपली तक्रार नोंदवू शकतात. प्रत्यक्ष येणे अशक्य असल्यास modelcodeofconductofficer@gmail.com या मेल आयडीवर सुध्दा आँनलाईन आपली तक्रार नोंदवू शकतात.

सिव्हिजील सिटिझन अँप

सदरील अँप प्ले-स्टोरवरुन डाऊनलोड करुन यावर आपली आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार नोंदवू शकतात. अत्यंत जलदगतीने व तत्काळ तक्रारीचे निराकरण केले जाते. 

एस.एस.टी.स्थिर पथक 

सदरील पथक नांदेड दक्षिण मतदारसंघात तीन ठिकाणी चोवीस तास नेमून दिलेल्या स्थळी चौकसपणे कार्यरत आहे. डेरला पाटी, नांदेड लोहा रोड,बोंढार तर्फे हवेली-नांदेड-मुदखेड रोड,काकांडी-नांदेड-नायगाव रोड  अशा तीन स्थानी हे पथक कार्यरत आहे. दक्षिण नांदेड मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची हे पथक अत्यंत बारकाईने तपासणी करतात. प्रमाणापेक्षा जास्त रोकड,मौल्यवान वस्तू आणि आचारसंहिता कायद्याने प्रतिबंधित बाबींची काटेकोरपणे तपासणी केल्या जात आहे. आक्षेपार्ह बाबी जप्त केल्या जातात.

एफ.एस.टी.फिरते पथक

सदरील पथक चोवीस तास नांदेड दक्षिण मतदार क्षेत्रात फिरत असून यावेळी आचारसंहिता भंग होत असलेल्या बाबींवर कटाक्षाने लक्ष ठेवते. अशा बाबी आढळल्यास त्यावर तात्काळ आचारसंहिता कायद्यानुसार कार्यवाही केली जाते. निवडणूका निरपेक्षपणे व आचारसंहितेचा भंग न होवू देता पार पाडण्याची मोलाची जबाबदारी या चार मार्गाने केली जात आहे. सर्वांनी या चार मार्गांचा योग्य उपयोग करुन आचारसंहिता भंग न होवू देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहननिवडणूक अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी केले.

०००००

वृत्त क्र. 1034 

स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम

नांदेड दि. 5 नोव्हेंबर:- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेतले जात आहेत. भोकरमध्ये स्वीप अंतर्गत  तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

 

भोकरमध्ये मतदार जागृतीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आणि मतदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

 

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी या विषयी माहिती दिली. यावेळी सुमन गोणारकर यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

या कार्यक्रमाने तृतीयपंथी मतदारामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.  यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जकियोद्यीन शेखमिलिंद जाधवसुधांशु कांबळे आदींची उपस्थिती होती.

०००००

                





                                                     



 

  वृत्त क्र. 1033

लोकसभा पोट निवडणूक अनुषंगाने 

7 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी

नांदेड दि. 5 नोव्हेंबर : लोकसभा पोट निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 16- नांदेड मतदारसंघातील उमेदवारांची  खर्च निरीक्षकासमोर प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ती स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.

तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

00000

 वृत्त क्र. 1032

नांदेड दक्षिण मतदार संघासाठी टोल फ्री क्रमांक

नांदेड दि. 5 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 87 नांदेड दक्षिण मतदार संघासाठी नागरिकांना आचारसंहिता भंग न होण्याच्या संदर्भात किंवा इतर तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१२९ दिला आहे.

तरी नागरिकांनी आचारसंहिता भंग न होण्याच्या संदर्भात काही  तक्रार असल्यास 24 तास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक‍ निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...