Saturday, August 17, 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला.भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला.भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Friday, August 16, 2024
'महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
मुंबई दि. १६ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित 'महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे.
'महाराष्ट्र माझा' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून, तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे, मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.
स्पर्धेची नियमावली
१. छायाचित्रण स्पर्धा.
* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.
* छायाचित्राची थीम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या थीमशी सुसंगत असावी.
* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.
* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित व्हिज्युअल नसावेत.
* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.
* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.
* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.
२. रिल्स स्पर्धा.
* रील्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.
* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही
* कोणतेही कॉपीराईटचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.
* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल
* मानक रील्स स्वरूप अपेक्षित आहे.
* रील्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.
* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.
३. लघुपट स्पर्धा.
* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.
* या स्पर्धेत १८ वर्षावरील कोणीही... भाग घेऊ शकतात.
* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.
* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.
* कोणतेही कॉपीराईट उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.
* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.
* लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे याची खात्री करावी.
* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.
भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क कडे असतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.
०००००
वृत्त क्र. 729
बनावट विदेशी मद्यावर मुखेड तालुक्यातील
हिब्बट शिवार येथे धडक कारवाई
नांदेड दि. 16 ऑगस्ट :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांची बनावट विदेशी मद्यावर मुखेड तालुक्यातील हिब्बट शिवार येथे धडक कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या टोल क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२४६२- २८७६१६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (अं व द) सुनिल चव्हाण, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त व्ही. एच.तडवी, अधीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेड यांच्या पथकाने मुखेड तालुक्यातील बोरगाव फाटा ते एकलारा रोड, हिब्बट शिवार येथे अवैधपणे बनावट मद्याची चोरटी वाहतुक, विक्री केली जात असल्याची नुकतीच माहिती मिळाली होती.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नांदेड जिल्हा व त्यांच्या पथकाने बोरगाव फाटा ते एकलारा रोड, मौ. हिब्बट शिवार ता. मुखेड येथे सापळा रचून आरोपी प्रशांत लक्ष्मण श्रीरामे व गंगाधर भोसले (फरार) यांना बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना तपासणी केली. यावेळी यांचे ताब्यातील एक दुचाकी व एक चार वाहनात 180 मि.ली. क्षमतेचे मॅकडॉल नं.-1 व्हिस्कीच्या या विदेशी दारुचे 6 सिलबंद बाटल्या, 180 मि.ली. क्षमतेचे रॉयल स्टॅग व्हिस्की बनावट विदेशी दारुचे 414 सिलबंद बाटल्या, बनावट हॅपेरियर ब्ल्यु व्हिस्की नावाचे विदेशी मद्याच्या 156 सिलबंद बाटल्या असा मुद्देमाल जप्त करून आरोपी प्रशांत लक्ष्मण श्रीरामे याला अटक केली. परंतू मुळ सुत्रधार गंगाधर भोसले हा घटनास्थळावरून फरार झाला.
या गुन्ह्यातील ठिकाणाहून एक ह्युंदाई कंपनी निर्मित पांढऱ्या Verna चार चाकी वाहन, एक होंडा कंपनी निर्मित दुचाकी वाहन, बनावट विदेशी दारुच्या 576 सीलबंद बॉटल्या असा एकुण रूपये ५,००,३८० इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवान गिरीधर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुय्यम निरीक्षक एस.टी. कुबडे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(A),(B),(D),(E) ८०,८१,८३,९०,१०३ भारतीय न्याय संहिता चे कलम 123 अन्वये गुन्हा नोंद केला असून ज्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रा एस. टी. कुबडे हे करीत आहेत. या ठिकाणाहून 1 आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्ह्यांतील अटक आरोपींस 16 ऑगस्ट पर्यंतची एक्साईज कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत अधीक्षक गणेश पाटील यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत उपअधीक्षक मुपडे, देगलुर विभाग निरीक्षक ए. महिंद्रकर, एस. बोरुडे, सचिन शेटे, अमित वालेकर,एस. टी कुबडे, बी. बी. ईथ्थर सर्व दुय्यम निरीक्षक तसेच बालाजी पवार, मो. रफिक, शिवाजी कोरनुळे, सर्व स.दू. नि व जवान सर्वश्री विकास नागमवाड, गणेश रेनके, मुरलीधर आनकाडे, गिरीधर भालेराव, आर बी. फाळके, श्रीनिवास वजिराबादे, मारोती सुरनर, प्रवीण इंगोले, शिदास नंदगावे व जवान निवा. चा. रावसाहेब बोदमवाड एफ. के. खतीब, एस. जी. संगेवार तसेच महिला जवान श्रीमती ए. जी. घुगे यांचा सहभाग होता.
00000
वृत्त क्र. 728
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 16 ऑगस्ट :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र या समाजासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहेत. या मंडळातर्गत उपकंपन्या तसेच महाज्योती, अमृत यासारख्या संस्थामार्फत देखील अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे आयोजित केले आहेत.
दिनांक 17 ऑगस्ट रोजी भोकर आश्रमशाळेत, 18 ऑगस्ट आश्रमशाळा पळसा, हदगाव , 19 ऑगस्ट आश्रमशाळा हिमायतनगर, 20 ऑगस्टला आश्रम शाळा दहेली तांडा, किनवट, 21 ऑगस्ट आश्रमशाळा कुटूंरतांडा नायगाव, 22 ऑगस्ट आश्रमशाळा दगडापूर बिलोली, 23 ऑगस्ट आश्रम शाळा भुतन हिप्परगा देगलूर, 24 ऑगस्टला आश्रम शाळा कुंडलवाडी तालुका बिलोली, 26 ऑगस्ट आश्रमशाळा कमळेवाडी ता. मुखेड, 27 ऑगस्ट आश्रम शाळा नेहरुनगर नागलगाव तांडा, कंधार, 27 ऑगस्ट आश्रम शाळा विठ्ठलनगर लोहा, 28 ऑगस्टला आश्रमशाळा, मुदखेड, 29 ऑगस्टला आश्रम शाळा उमरी, 30 ऑगस्टला आश्रमशाळा पळशी तांडा किनवट येथे मेळावे आयोजित केले आहेत.
या मेळाव्यासाठी नोडल अधिकारी म्हणून समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांची नियुक्ती केली आहे. हे मेळावे त्या- त्या तालुक्याच्या आश्रमशाळेत आयोजित केले आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी व या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक बी.एस. दासरी यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...






.jpeg)


.jpeg)







