Thursday, October 12, 2023

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव

मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

गुरुवारी पारितोषिक वितरण

            मुंबई, दि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ ( मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

             या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत.

1 मुंबई 1. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

२. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ

३. निकदवरी  लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

2 मुंबई उपनगर: १. स्वप्नाक्षय मित्र मंडळ, २. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर(प) ३. बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)

3 . ठाणे : १. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे २. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि  रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३. शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे

4 . पालघर: साईनगर विकास मंडळ, पालघर

5 . रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळ, ता. महाड

6 . रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापूर

7. सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सलईवाडा, सावंतवाडी

8. पुणे : १. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट, खडकी

२. उत्कर्ष तरुण मंडळ, चिंचवडगाव

9 .सातारा:सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, ता. सातारा

10. कोल्हापूर ,:श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी

11. सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळ, माढा

13. नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळ, नाशिक

14. धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठान, देवपूर

15.जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ, जळगाव

16. नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळ, तळोदा

17 अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ

18 . छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळ, चिखलठाण

19. जालना : कारेश्वर गणेश मंडळ, देवगाव खवणे ता. मंठा, जि. जालना

20. हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एन टी सी, हिंगोली

21. परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनंदरा

22. धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव

23. नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड

24. बीड : जय किसान गणेश मंडळ, मठ गल्ली, किल्ले धारूर

25. लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लातूर

26. नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी

27. गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली

28. गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळ, बोडगाव

29. चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर

30. वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर

31.भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी, मोहाडी

32. अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ

33. बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्था, चिखली (विभागून)

34. वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम.

35. यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ

000

दीपक चव्हाण/विसंअ/

Wednesday, October 11, 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         49  रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         857 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 722

 

 नांदेड, (जिमाका) दि. 11 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 857  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 722 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 9 ऑक्टोंबर ते  10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  149  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात  7 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नवजात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 6 (पुरुष जातीचे 2, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 49 शस्त्रक्रिया झाल्या. यात 40 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 9 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 26  प्रसुती करण्यात आल्या. यात 11  सीझर होत्या तर 15 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक - उपविभागीय अधिकारी विकास माने

 बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक


-  उपविभागीय अधिकारी विकास माने

▪️आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त नांदेड तहसील येथे बालविवाह निर्मूलनाची सामूहिक शपथ

नांदेड (जिमाका) दि. 11 :- बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी बालविवाह हा मोठा अडसर असून सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवून बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी हिरीरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी जिल्हा महिला बाल‍ विकास अधिकारी आर.आर. कांगणे, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, शिक्षण विभागाच्या सविता अवातिरक, युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक अरुण कांबळे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे जगदिश राऊत यांची  उपस्थिती होती.

शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यशासन घेत आहे. 



आंतरराराष्ट्रीय बालिका दिन व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने लेक लाडकी योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखो मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. विविध योजनाच्या माध्यमातून भर देण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होवू नयेत. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशिल राहावे, असेही त्यांनी आवाहन  केले. त्यांनी उपस्थितांना बालविवाह निर्मूलनाची शपथ दिली.

00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या 2023 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

Tuesday, October 10, 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         48  रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         1 हजार 165 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 726

 

 नांदेड, (जिमाका) दि. 10 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 1 हजार 165  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 726 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 8 ऑक्टोंबर ते  9 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  100 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 10 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 48 शस्त्रक्रिया झाल्या. यात 35 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 24  प्रसुती करण्यात आल्या. यात 7  सीझर होत्या तर 17 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

 जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

·         पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :-  नांदेड शहरातील जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा.मा.256 (कि.मी 42/200 ते 75/700) व (2) नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा.247 (कि.मी.0/00 ते 4/500) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा करण्यात येत असल्यामुळे जुना मोंढा ते गोदावरी नदीवरील पुल शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करुन इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.  प्रतिबंध  करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  


पॅकेज 154 नांदेड शहरातील (1) जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यत रा.मा.256 (कि.मी 42/200 ते 75/700) व (2) नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदी वरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा.247 (कि.मी.0/00 ते 4/500) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा करण्याचे काम सुरु असल्यामुळे जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या प्रतिबंधीत मार्गाऐवजी जुना मोंढा –वजीराबाद –कौठा-रवीनगर-शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 11 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे 

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्र, गावातील कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दत

महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेततळयासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी (34x34x03 ते 15x15x03) कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. या योजनेअंतर्गत अस्तरीकरणासह (प्लास्टिक फिल्मसह) शेततळयासाठी 1 लाख 50 हजार प्रति शेततळे अनुदान देय आहे. शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील. जिल्ह्यात आज 9 ऑक्टोंबर 2023 अखेर  सन 2022-23  व 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 591 शेतकऱ्यांची निवड झाली आहे. यापैकी 650 अर्ज प्रक्रीयेत असून 362 शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत मागेल त्याला शेततळयाच्या धर्तीवर लाभार्थ्यांनी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याबरोबर त्यांना या योजनेतून पूर्व संमती मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...