Friday, May 19, 2023

 जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त सायकल रॅली संपन्न

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- सातवा युएन जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह-2023 हा 15 ते 21 मे 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व प्रजापिता ब्रह्माकुमारी वसंतनगरच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन आज 19 मे रोजी सकाळी 6.30 वा. करण्यात आले होते. या सायकल रॅलीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या श्रीमती स्वाती बहनजी, श्रीमती अनिता बहनजी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. 

 

यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे, प्रा. डॉ. परमेश्वर पौळ, संतोष मुगटकर, राजेंद्र मंडी, प्रल्हाद हिंगोले, गणेश साखरे, डॉ. सुरेश दागडीया, क्षीरसागर, मोटार वाहन निरिक्षक मंगेश इंगळे, पंकज यादव, गणेश तपकिरे आदींची उपस्थिती होती. 

 

वाहनाच्या इंधनामुळे प्रदुषणात होत असून यामुळे उष्णतेची पातळी वाढत आहे. आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांनी सार्वजनिक वाहनाचा व सायकलचा वापर केल्यास प्रदुषण रोखण्यास आपली मदत होईल, असे प्रतिपादन  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले. ही सायकल रॅली नांदेड शहरातील जुनामोंढा येथून निघुन महावीर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदीर, शिवाजीनगर, आयटीआय येथून विसावा उद्यान येथे रॅलीचा समारोप झाला. या सायकल रॅलीत जवळपास शंभर सायकल स्वारांनी सहभाग घेतला होता.

00000

 केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा सुधारीत दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार 20 मे 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

शनिवार 20 मे 2023 रोजी नागपूर येथून वाहनाने सकाळी 8.30 वा. श्री रेणुका देवी मंदीर येथे आगमन. सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत दर्शन व राखीव. सकाळी 10.40 ते 11.50 वा. पर्यंत श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुकादेवी मंदीर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगण. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत प्रस्तावित वनविभागाच्या विश्रामगृहाच्या सादरीकरणाचे अवलोकन स्थळ- सा. बां. विभागाचे शासकीय विश्रामगृह माहूर. दुपारी 12.30 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. शासकीय विश्रामगृह माहूर येथून दुपारी 2.30 वा. वाहनाने हिवरा (संगम) ता. महागाव जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.  

000000    

Thursday, May 18, 2023

 केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार 20 मे 2023 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शनिवार 20 मे 2023 रोजी नागपूर येथून वाहनाने सकाळी 8.30 वा. श्री रेणुका देवी मंदीर येथे आगमन. सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत दर्शन व राखीव. सकाळी 10.40 ते 11.50 वा. पर्यंत श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुकादेवी मंदीर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगण. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत प्रस्तावित वनविभागाच्या विश्रामगृहाच्या सादरीकरणाचे अवलोकन स्थळ- माहूरगड. दुपारी 12.30 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 2.30 वा. वाहनाने वर्धाकडे प्रयाण करतील.  

000000    

 श्री रेणुका देवीचे दर्शन सुकर व्हावे यासाठी लिफ्टसह स्कायवॉकच्या कामाचे 20 मे रोजी भूमिपूजन

▪️केंद्रीय रस्ते व वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

▪️18 महिन्यात होणार काम पूर्ण

▪️50 कोटी 60 लाख रुपयाची तांत्रिक मान्यता 

नांदेड, (जिमाका) दि. 18 :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा अवघ्या 18 महिन्यात भक्तांना उपलब्ध होणार आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, भक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते शनिवार 20 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगणात सकाळी 10 वा. होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर हे राहतील. 

या समारंभास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आ. भिमराव केराम, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माहूर गडावरील या महत्वपूर्ण सुविधेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात रेणुका भक्तांना आश्वासीत केले होते. 

अशी आहेत प्रकल्पाची ठळक वैशिष्टे

स्काय वॉकची लांबी 70 मीटर तर रुंदी 15 मीटर असेल.

लोवर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 25 मीटर असून एकुण 4 लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.

अपर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 23 मीटर असून एकुण 4 लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.

या प्रकल्पाची वाहतूक क्षमता एकावेळेस 80 प्रवासी चढणे व उतरण्याची असेल.

या प्रकल्पामध्ये एकुण 32 दुकान गाळे, प्रसाधन गृह, सुरक्षा कर्मचारी कक्ष, उपहार गृह उपलब्ध असतील.

मंदिर प्रशासनासाठी स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय राहील. दर्शनीय लॉबी, भविष्यातील गरजेनुसार ट्रॅव्हेलेटरचे प्रयोजनासह राहील.

सोलार सिस्टीम प्लांट, भूमिगत पाणी टाकीची क्षमता 2 लाख लिटरची असेल.

याचबरोबर घनकचरा निर्मुलन व्यवस्था, प्रतीक्षालये, वृद्ध व दिव्यांगासाठी स्वतंत्र दर्शन रांग, सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था, हिरकणी कक्ष व दोन स्वतंत्र कक्ष राहतील.

याचबरोबर इतर अनुषंगिक सुविधेचा यात समावेश करण्यात आला आहे.

श्री रेणुका देवी मंदिर माहूरगडसाठी लिफ्टसह स्काय वॉकचे बांधकाम करण्यास केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एकुण 51.03 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. स्थापत्य व विद्युतसाठी 50.60 कोटी रुपयास तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाचा कालावधी हा 18 महिने असून प्रकल्प हाताळणे व देखभाल, दुरूस्तीसाठी 10 वर्षाचा कालावधी राहील. कामाची अंदाजित किंमत ही 39 कोटी 91 लाख रुपये वस्तू व सेवाकर वगळून आहे. प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मे. व्यापकॉस ली. गुरूग्राम आहे. मे. डी. सी. गुरूबक्षानी नागपूर यांना हे काम देण्यात आले आहे.

00000







Wednesday, May 17, 2023

 शेतकऱ्यांना पिकांचे किड व रोगाबाबत

गाव पातळीवर मार्गदर्शन करावे

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- "जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिकांचे लागवड तंत्रज्ञान, किड/रोग व्यवस्थापन व उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित खरीप हंगाम पूर्व अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणात ते बोलत होते.

 

कार्यशाळेत विविध मोहिमांची माहिती पुस्तिका, खरीप हंगाम पुर्व जणजागृती मोहीम-2023 कृषि मार्गदर्शिका आदीचे सर्व कृषी सहाय्यकांपर्यंत वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग  योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

 

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, खत बचत मोहीम, जैविक खतांचा वापर, बीज प्रक्रिया आदी मोहिमेद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी.चलवदे यांनी सांगितले. डॉ. अरव‍िंद पांडागळे यांनी कापुस, सोयाबीन व तुर लागवडीतील तंत्रज्ञान, किटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे यांनी खरीप हंगामातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन व रोग शास्त्रज्ञ डॉ. पवन  ढोके यांनी प्रमुख रोगांचे व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

 

यावेळी कृषि उपसंचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी व इतर कर्मचारी आदींची उपस्थित होती.

000000







 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत

अशासकीय संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  शासनाच्यावतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थानी पुढील नमुद केलेल्या कार्यालयाशी संपर्क करुन मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारित जलसाठ्यांची माहिती घ्यावी व संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव सोबत सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, पाटबंधारे वसाहत, चैतन्यनगर, नांदेड-05 (दु.क्र. 02462-260813 व ई-मेल eessiwcnanded@gmail.com) येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग नांदेड यांनी केले आहे.

 

राज्यात 6 मे 2017 पासून 31 मार्च 2020 अखेर पर्यंत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. शासन निर्णय 20 एप्रिल 2023 अन्वये सदर योजना पुन्हा सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामुग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित आहे. अल्प व अत्यल्पभुधारक, विधवा, दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकिय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधनासाठी 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35 रुपये 65 पैसे प्रति घनमीटर प्रमाणे 15 हजार रुपयांच्या मर्यादा व 2.5 एकर (37 हजार 500 रुपयांपर्यंत) अनुदान दिले जाणार आहे.

 

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मृद व जलसंधारण विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच शासन निर्णय क्र.: गामुध 2023/प्र.क्र.22/जल-13 दि. 04.05.2023 अन्वये संस्था निवडीचे निकष आणि दिलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणे बंधनकारक आहे व त्यानंतरच अशासकीय संस्थांना पात्र ठरविण्यात येईल.

 

तालुकास्तरावर संपर्कासाठी तालुकास्तरीय अध्यक्ष यांचे मुख्यालय, समाविष्ट तालुके, संपर्काचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. नांदेड मुख्यालयात नांदेड, हदगाव, हिमायतनगर तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी नांदेड यांचा मो. क्र. 8007262021 व ई-मेल sdwconed@gmail.com याप्रमाणे आहे. मुखेड मुख्यालयात मुखेड तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी, मुखेड  यांचा मो. क्र. 9423347886 व ई-मेल sdwcomukhed@gmail.com याप्रमाणे आहे. नायगाव मुख्यालयातर्गत नायगाव, धर्माबाद, उमरी या तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी, नायगाव यांचा मो. क्र. 9421084530 व ई-मेल sdwconaigaon@gmail.com असा आहे. भोकर मुख्यालयातर्गत भोकर, मुदखेड, अर्धापुर या तालुक्यांचा समावेश असून संपर्कासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उप विभाग भोकर यांचा मो. क्र.7350276165 व ई-मेल  sdwcobhokar@gmail.com याप्रमाणे आहे. कंधार तालुकास्तरीय मुख्यालयातर्गत कंधार, लोहा तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी कंधार यांचा मो.क्र. 9049888753 व ई-मेल sugm@rediffmail.com याप्रमाणे आहे. किनवट तालुकास्तरीय मुख्यालयातर्गत किनवट, माहुर तालुक्याचा समावेश असून उप विभागीय जलसंधारण अधिकारी, किनवट यांचा मो. क्र. 7276167441 व ई-मेल sdossiwc.kinwat@gmail.com याप्रमाणे आहे. देगलूर मुख्यालयातर्गत देगलूर, बिलोली तालुक्याचा समावेश असून संपर्कासाठी उप विभागीय जलसंधारण अधिकारी, देगलुर यांचा मो. क्र. 9421321402 ई-मेल dwco.swcsddeglurg@gmail.com याप्रमाणे आहे.

00000

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 20 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...