Friday, May 13, 2022

 पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 13 :- राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे  यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शनिवार 14 मे 2022 रोजी लातूर येथून नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आगमन व खा. शरदचंद्रजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे स्वागत. स्थळ- विमानतळ नांदेड. सकाळी 10 वा. गोदावरी अर्बन सहकारी को. ऑप. सोसायटी नवीन मुख्यालयाचा उद्घाटन समारंभास खा. शरदचंद्रजी पवार यांचे समवेत उपस्थिती. स्थळ- तरोडा नाका नांदेड. सकाळी 11.45 वा. तरोडा  नाका नांदेड येथून मोटारीने वाई ता. वसमतकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. बाभुळगाव ता. वसमत येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 3.30 ते 4.30 वाजेपर्यंत शरदचंद्रजी पवार यांचेसमवेत राष्ट्रवादी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. दुपारी 4.30 वा. शरदचंद्रजी पवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. सायं 5.30 वा. कै. शामराव कदम हॉस्पिटल भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- सामाजिक न्याय भवन जवळ नांदेड. सायं 6.30 वा. कमलकिशोर कदम यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- माधसवाड इस्टेट नमस्कार चौक म्हाळजा बायपास नांदेड. रात्री 8.30 वा. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड येथे राखीव. यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. 

रविवार 15 मे 2022 रोजी शरदचंद्रजी पवार यांचेसमवेत हरिहर भोसीकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नांदेड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- शिवकृपा शाहूनगर आनंदनगर रोड नांदेड. सकाळी 10.15 वा. खा. शरद पवार पवार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाणावेळी उपस्थिती. स्थळ नांदेड विमानतळ. यानंतर ॲड. मोहम्मद खान पठाण यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- लेबर कॉलनी उमर फारुक मस्जिद जवळ नांदेड. सुरेश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- लेबर कॉलनी, उमर फारुक मस्जिद जवळ नांदेड. डॉ. उत्तम सोनकांबळे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- जगदीश कॉलनी चैतन्यनगर तरोडा बु. नांदेड. केशव घोणसे पाटील संपादक दै. गोदातीर समाचार यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- शिवाजीनगर नांदेड. सोईनुसार नांदेड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

000000

 गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 13 :- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

शनिवार 14 मे 2022 मुंबई येथुन विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 9.30 वा. आगमन. सकाळी 10 वा. तरोडानाका नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक. स्थळ- पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांचे कार्यालय सिडको रोड नांदेड. सायं. 5.30 वा. पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर नांदेड या संस्थेच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- सामाजिक न्याय भवनच्या बाजुस, नमस्कार चौक, म्हाळजा बायपास नांदेड. सायं. 6.30 वा. कमलकिशोर कदम अमृत महोत्सव स्वागत समिती नांदेड आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमकिशोर कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा. स्थळ- माधसवाड इस्टेट, नमस्कार चौक, म्हाळसा बायपास नांदेड. रात्री नांदेड येथे मुक्काम.

रविवार 15 मे 2022 रोजी सकाळी 9 वा. हरिहरराव वि.भोसीकर यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- शिवकृपा, शाहूनगर विद्युतनगर बस स्टॉप समोर आनंदनगर रोड नांदेड. सकाळी 9.30 वा. मोटारीने शाहुनगर, आनंदनगर रोड नांदेड येथून श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड कडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथुन मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

 विभागातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा

अभ्यास करण्यासाठी समितीचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- मराठवाडा विभागातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाय योजना शोधण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्यातील यंत्रमाग बहुल भागातून आठ सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली असल्याचे समिती सचिव तथा प्रादेशिक उप आयुक्त वस्त्रोद्योग, मुंबई यांनी कळविलेले आहे. सदर समिती मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील यंत्रमाग बहुल भागाचा दौरा करुन यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्याबाबत अहवाल शासन सादर करणार आहेत. त्यानुसार उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यातील खाजगी, तसेच सहकारी संस्थांची पदाधिकारी, सभासद यांनी आपल्या सदस्यांचे निवेदन, सूचना असल्यास उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे, 2022, नांदेड जिल्ह्यासाठी 20 व 21 मे 2022, तर बीड जिल्ह्यासाठी 20 मे, 2022 रोजी संबंधित जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहून निवेदन द्यावे.

*****

 सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

शनिवार 14 मे 2022 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.35 वा. नांदेड विमानतळ येथून तरोडा नाकाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. गोदावरी अर्बन सहकारसूर्य मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- सहकारसूर्य तरोडानाका नांदेड. सकाळी 11.45 वा. तरोडानाका येथून मोटारीने वाई ता. वसमतकडे प्रयाण. दुपारी 3.30 ते 4.30 यावेळेत शरदचंद्रजी पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सेाबत बैठकीला उपस्थिती स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. दुपारी 4.30 वा. शरदचंद्रजी पवार यांच्या पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस नांदेड. सायं. 5.15 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भेट नांदेड. सायं. 5.30 वा. इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर भूमिपूजन सोहळा. स्थळ- सामाजिक न्याय भवनाच्या बाजुस नमस्कार चौक नांदेड. सायं 6.30 वा. कमलकिशोर कदम एमजीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या 75 व्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. स्थळ माधवसवाड इस्टेट नमस्कार चौक नांदेड. रात्री 8.30 वा. एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राखीव. यानंतर सोयीनुसार परळी जि. बीड कडे प्रयाण करतील.

0000

 मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी समर्पित आयोग

निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय दौऱ्यावर

 

·        रविवार 22 मे रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट   

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थेत नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य हे 21 ते 28 मे 2022 या कालावधीत विभागवार भेटी देणार आहेत. यासाठी समर्पित आयोगाने विभागनिहाय भेटीचा कार्यक्रम निश्तिच केला आहे.

 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार हा कार्यक्रम जाहिर केला आहे.

 

या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना स्वत:ची मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असेही स्पष्ट केले आहे.    

 

समर्पित आयोगाचा दौरा व भेटीच्या वेळा    

 

शनिवार 21 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत. रविवार 22 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे सकाळी 9.30 ते 11.30 यावेळेत तर याच दिवशी 22 मे रोजी सायं. 5.30 ते 7.30 यावेळेत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे. बुधवार 25 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे. दुपारी 2.30 ते 4.30 या कालावधीत. शनिवार 28 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या कालावधीत  विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे तर शनिवार 28 मे 2022 रोजी सायं. 4.30 ते 6.30 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे समर्पित आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.  

0000

Thursday, May 12, 2022

 एक कोरोना बाधित तर एकाला सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 135 अहवालापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 808 एवढी झाली असून यातील 1 लाख 113 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.  

 

आरटीपीसीआर आज तपासणीद्वारे माहूर तालुक्यात 1 बाधित आढळला. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका बाधिताला बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात 1 असे एकुण 3 बाधित उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 472

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 81 हजार 434

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 808

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 113

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

000000

 प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेअंतर्गत

लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची मुदतवाढ 

नांदेड दि. 12, (जिमाका) :- राज्यातील लाभार्थी शेतक-यांस ई-पोर्टलवर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात अडी-अडचणी असल्यास महाऊर्जाच्या खालील दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वा. पर्यंत संपर्क साधावा.  तसेच योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची सुधारित अंतिम मुदत दि. 31 मे, 2022 पर्यंत वाढविण्यात येत आहे.  तरी लाभार्थ्यांने दि. 31 मे, 2022 पर्यंत लाभार्थी हिस्सा जमा करावा.

राज्यातील महाकृषी अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एस. व्दारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतक-यांनी ऑनलाईन / धनाकर्षाव्दारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा. 

तसेच असेही निदर्शनास आले आहे की, जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत.   संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकामधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी तगाता लावत आहेत.

तेव्हा सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या घटकांचा लाभार्थी म्हणून सौर कृषी पंपाची ई-पोर्टलवर चुकीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करुन नोंद केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

पीएम-कुसुम योजनेअंतर्गत 50000 सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे सद्य:स्थितीत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील उपरोक्त उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.  तसेच अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप उपलब्ध असून लाभार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर नोंदणी करावी.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B 

मुख्यालय दूरध्वनी क्रमांक - 02035000456, 020-3500045


 

 

अ.क्र.

विभागीय कार्यालयाचे नाव

कार्यक्षेत्रात समावेश असणारे जिल्हे

संपर्क दूरध्वनी क्रमांक

1.

विभागीय कार्यालय, नागपूर

नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

मो.नं. 9423113865

0712-2531602

2.

विभागीय कार्यालय, अमरावती

अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा

मो.नं. 7030927337

0721-2661610

3.

विभागीय कार्यालय, लातूर

लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद

मो.नं. 9511684703

02382-226680

4.

विभागीय कार्यालय, औरंगाबाद

औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना

मो.नं.-7030927268

0240-2653595

5.

विभागीय कार्यालय, नाशिक

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार

मो.नं.-7030927279

0253-2598685

6.

विभागीय कार्यालय, मुंबई

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड

मो.नं.- 9021219479

022-22876436

7.

विभागीय कार्यालय, कोल्हापूर

कोल्हापूर, रत्नागिरी

मो. न.  7030927301

0231-2680009

8.

विभागीय कार्यालय, पुणे

पुणे,सोलापूर, सातारा

मो.नं.-7030927255

020-35000454

 

***** 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...