एक कोरोना बाधित तर एकाला सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 135 अहवालापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 808 एवढी झाली असून यातील 1 लाख 113 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.
आरटीपीसीआर आज तपासणीद्वारे माहूर तालुक्यात 1 बाधित आढळला. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका बाधिताला बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात 1 असे एकुण 3 बाधित उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 472
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 81 हजार 434
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 808
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 113
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1
000000
No comments:
Post a Comment