Thursday, May 12, 2022

 वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी नांदेड शहरात पर्यायी मार्ग 

·         14 मे रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत असेल बदल

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड शहरात शनिवार 14 मे 2022 रोजी गोदावरी अर्बन बँकेचा उद्घाटन सोहळा तसेच भगीरथनगर येथील जाहीर सभेच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी मार्गावरील वाहतुकीस वळण देऊन बदल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 14 मे 2022 रोजी सकाळी ते दुपारी वाजेपर्यंत लागू राहिल.

 

शेतकरी चौकदिपनगरछत्रपती चौकाकडे जाण्या-येण्याचा रस्ता हा पूर्णपणे बंद राहिल. या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शेतकरी चौक- कॅनाल रोड- छत्रपती चौक तसेच शासकीय विश्रामगृह- पावडेवाडी चौक- मोर चौक- छत्रपती चौक पर्यंतछत्रपती चौक- मौर चौक- पावडेवाडी नाका हा राहिल. शनिवार 14 मे रोजी वाहुकीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची ही अधिसुचना निर्गमीत करण्यात आली आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...