Thursday, May 12, 2022

 व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र

दाखल करण्यास 31 मे पर्यत मुदत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र पीटीआरसी धारकांनी ई-विवरणपत्रके 31 मे 2022 रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या www.mahagst.gov.in संकेतस्थळावर करावेतअसे आवाहन व्यवसायकर अधिकारी गौ. म. स्वामी यांनी केले आहे. 

महाराष्ट्र व्यवसायकर कायदा-1975 अंतर्गत व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र पीटीआरसी धारकांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या स्वयंचलित पध्दतीतील तांत्रिक अडचणीमुळे नियोक्त्यांना व्यवसायकराचा भरणा किंवा विवरण दाखल (अपलोड) करता आले नाही. मार्च-2022 पर्यंतच्या कोणत्याही कालावधीचे विवरणविनिर्दिष्ट केलेल्या विवरणावर देय असणारे संपूर्ण विलंब शुल्कात सुट देण्यात आली आहे. तसेच अंतर्गत व्याजाचा भरणा विवरण दाखल करण्यापूर्वी करावा, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...