Wednesday, October 9, 2019


श्रीनिवास कुरे वाहनचालक / मालक यांच्‍या विरुध्‍द लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम
1950 चे कलम 134 अन्‍वये वजीराबाद पोलिस स्‍टेशन येथे 336/2019 गुन्‍हा नोंदविला

नांदेड, दि. 10:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघाकरीता तन्‍वीर टूरीस्‍ट सेंटर नांदेड (अधिकृत पुरवठा धारक) यांचेकडून दिनांक 07 ऑक्टोबर, 2019 रोजी नागपूर येथून मतपत्रिका प्राप्‍त करण्‍यासाठी वाहन क्रमांक एमएच-20 बीके-7786 अधिग्रहीत करण्‍यात आले होते.
सदरील वाहन धारकास कार्यालयामार्फत 50 लिटर डिझेल देण्‍यात आले होते. परंतू वाहनचालक/मालक श्री श्रीनिवास कुरे हे विनापरवानगी जिल्‍हाधिकारी कार्यालय सोडून निघून गेले. त्‍यांना वारंवार भ्रमणध्‍वनी केला असता मी मरळक येथे खाजगी कामाकरीता आलो असून मी नागपूर येथे येवू शकत नाही असे सांगून फोन बंद केला. त्‍यामुळे वाहन उपलब्‍ध न झाल्‍यामुळे नागपूर येथे निघण्‍यास तीन ते चार तास विलंब झाला.
 त्‍यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा यांचे आदेशान्‍वये नायब तहसिलदार नांदेड विजयकुमार पाटे यांनी श्रीनिवास कुरे वाहनचालक / मालक यांच्‍या विरुध्‍द लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 चे कलम 134 अन्‍वये वजीराबाद पोलिस स्‍टेशन येथे 336/2019 गुन्‍हा नोंदविला आहे.
तसेच, निवडणूकीचे कामकाजात हयगय किंवा टाळाटाळ केल्‍यास यापुढे त्‍यांचेविरूध्‍द अशाच प्रकारची कार्यवाही करण्‍यात येणार आहे, असे 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड सदाशिव पडदूणे यांनी कळविले आहे.
0000




87- नांदेड (दक्षिण) विधानसभा निवडणूक लढविण्याऱ्या
उमेदवाराचा खर्च तपासणी कार्यक्रम
            नांदेड, दि. 10:- लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 77 अन्वये प्रत्येक निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास नामनिर्देशन तारखेपासून ते निकाल लागेपर्यंत उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने केलेल्या सर्व खर्चाचे स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे अनिवार्य आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाच्या भाग-क मधील तरतूदीनुसार उमेदवार खर्चाची तपासणी निवडणूक कालावधीत तीन वेळा करण्याचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी जाहीर केला आहे.
            सदरील खर्चाचे निरीक्षण दिनांक 11ऑक्टोबर, 2019, 15 ऑक्टोबर, 2019 व 19 ऑक्टोबर, 2019 या तारखांना खर्च निरीक्षक विष्णू बजाज हे करणार आहेत. त्यांना सहायक खर्च निरीक्षक लक्ष्मण हिवरे व लेखांकन पथकाचे वर्गीस हे या कामी मदतीला असतील.
            तरी 87- नांदेड (दक्षिण) विधानसभा मतदार संघांतर्गत निवडणूक लढविणा-या प्रत्येक उमेदवाराने दिलेल्या तारखांना खर्च नोंदवही, खर्च व व्हाऊचर,बिल बँकेचे अद्ययावत पासबुक इ. सह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे.
0000


रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्यांची साखर उपलब्ध
नांदेड, दि. 9 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2019 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 219 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. नांदेड 162.5 , हदगाव -198.5, किनवट -459.5, भोकर-78.5, बिलोली-143, देगलूर-135, मुखेड-194, कंधार-88.5, लोहा-133.5, अर्धापूर-38, हिमायतनगर-92, माहूर-202.5, उमरी-66, धर्माबाद-75.5, नायगाव-115.5, मुदखेड-36.5 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

Monday, October 7, 2019



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
निवडणूक निरिक्षक (जनरल) दाखल
तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
            नांदेड,‍दि. 7 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 च्‍या निवडणूकीचा कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सप्‍टेंबर 2019 च्‍या प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये घोषित केला आहे. नांदेड जिल्‍हयातील 09 विधानसभा मतदारसंघाच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा. निवडणूक निरिक्षक (जनरल) हे नांदेड जिल्‍हयात दाखल झाले असून त्‍यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र
मा.निवडणूक निरिक्षक(जनरल) यांचे नांव 
विधानसभा मतदारसंघ्‍
भ्रमणध्‍वनी क्रमांक
स्‍थानिक पत्ता
1
मा.श्री.अभय राज
83 – किनवट,    
84 - हदगाव
8605651850
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.2,  शासकिय विश्रामगृह, नांदेड
2
मा.श्री.भूवनेश कुमार
85 – भोकर,      
86 – नांदेड उत्‍त्‍र
7820849941
मिनी सह्याद्री,  सी. एम. सुट, शासकिय विश्रामगृह, नांदेड
3
मा.श्री.मोहिंदर पाल
87– नांदेड दक्षिण,
88 – लोहा
7820860019
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.3,  शासकिय विश्रामगृह, नांदेड
4
मा.श्री. महेश चंद्र चौधरी
89–नायगाव,
90–देगलूर,
91–मुखेड
9011400989
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.1,  शासकिय विश्रामगृह, नांदेड
              तरी नांदेड जिल्‍हयातील नागरीकांना कळविण्‍यात येते की, आपली काही गा-हाणी, तक्रार किंवा हरकत असल्‍यास त्‍यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मा. निवडणूक निरिक्षक (जनरल) यांचेशी संपर्क साधावा असे जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने आवाहन करण्‍यात येत आहे.
000000


शाळा, महाविद्यालयाकडून
प्रोफाईल भरण्याचा कालावधीस मुदतवाढ
नांदेड दि. 7 :-  माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रोफाईल भरुन घेण्याचा कालावधीत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 हा देण्यात आला होता. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्याप प्रोफाईल भरण्याची कार्यवाही केली नाही अथवा प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याकरीता मुदतवाढीचा  कालावधी 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर 2019 पर्यंत राहील. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
0000


पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार याद्या
नव्‍याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
नांदेड दि. 7 :- दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत पदवीधर व शिक्षक संघाच्‍या मतदार यादया नव्‍याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
नांदेड तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्‍या मतदार यादी नव्‍याने तयार करणेसाठी मा. भारत निवडणूक आयोग यांनी खालील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.  
पुनरिक्षणाचे टप्‍पे
कालावधी
नमूना 18 किंवा 19 व्‍दारे दावे व हरकती स्‍वीकारण्‍यांचा अंतिम
दिनांक 06 नोव्‍हेबर 2019 (बुधवार)
हस्‍तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार यादंयाची छपाई
दिनांक 19 नोव्‍हेंबर 2019 (मंगळवार)
प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्‍दी
दिनांक 23 नोव्‍हेंबर 2019 (शनिवार) ते 09 डिसेंबर 2019 (सोमवार)
दावे व हरकती निकाली काढण्‍यांचा दिनांक व पुरवणी
दिनांक 26 डिसेंबर 2019 (गुरुवार)
मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी
दिनांक 30 डिसेंबर 2019 (सोमवार)
मा. भारत निवडणूक आयोगाने च्‍या सुचनेनुसार नांदेड तालुक्‍यातील पदवीधर व शिक्षक  मतदारांना मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्‍वये पदवीधर व शिक्षक संघाच्‍या मतदार यादया नव्‍याने तयार करणेसाठी जाहीर सूचना प्रसिध्‍द करण्‍यांत येत आहे. या प्रसिध्‍दी पत्रकात नमूद दिनांकापर्यंत सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले फॉर्म तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
00000



वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...