Wednesday, October 9, 2019


87- नांदेड (दक्षिण) विधानसभा निवडणूक लढविण्याऱ्या
उमेदवाराचा खर्च तपासणी कार्यक्रम
            नांदेड, दि. 10:- लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 77 अन्वये प्रत्येक निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास नामनिर्देशन तारखेपासून ते निकाल लागेपर्यंत उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने केलेल्या सर्व खर्चाचे स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे अनिवार्य आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाच्या भाग-क मधील तरतूदीनुसार उमेदवार खर्चाची तपासणी निवडणूक कालावधीत तीन वेळा करण्याचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी जाहीर केला आहे.
            सदरील खर्चाचे निरीक्षण दिनांक 11ऑक्टोबर, 2019, 15 ऑक्टोबर, 2019 व 19 ऑक्टोबर, 2019 या तारखांना खर्च निरीक्षक विष्णू बजाज हे करणार आहेत. त्यांना सहायक खर्च निरीक्षक लक्ष्मण हिवरे व लेखांकन पथकाचे वर्गीस हे या कामी मदतीला असतील.
            तरी 87- नांदेड (दक्षिण) विधानसभा मतदार संघांतर्गत निवडणूक लढविणा-या प्रत्येक उमेदवाराने दिलेल्या तारखांना खर्च नोंदवही, खर्च व व्हाऊचर,बिल बँकेचे अद्ययावत पासबुक इ. सह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे.
0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...