Wednesday, October 9, 2019


श्रीनिवास कुरे वाहनचालक / मालक यांच्‍या विरुध्‍द लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम
1950 चे कलम 134 अन्‍वये वजीराबाद पोलिस स्‍टेशन येथे 336/2019 गुन्‍हा नोंदविला

नांदेड, दि. 10:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघाकरीता तन्‍वीर टूरीस्‍ट सेंटर नांदेड (अधिकृत पुरवठा धारक) यांचेकडून दिनांक 07 ऑक्टोबर, 2019 रोजी नागपूर येथून मतपत्रिका प्राप्‍त करण्‍यासाठी वाहन क्रमांक एमएच-20 बीके-7786 अधिग्रहीत करण्‍यात आले होते.
सदरील वाहन धारकास कार्यालयामार्फत 50 लिटर डिझेल देण्‍यात आले होते. परंतू वाहनचालक/मालक श्री श्रीनिवास कुरे हे विनापरवानगी जिल्‍हाधिकारी कार्यालय सोडून निघून गेले. त्‍यांना वारंवार भ्रमणध्‍वनी केला असता मी मरळक येथे खाजगी कामाकरीता आलो असून मी नागपूर येथे येवू शकत नाही असे सांगून फोन बंद केला. त्‍यामुळे वाहन उपलब्‍ध न झाल्‍यामुळे नागपूर येथे निघण्‍यास तीन ते चार तास विलंब झाला.
 त्‍यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी 86-नांदेड उत्‍तर विधानसभा यांचे आदेशान्‍वये नायब तहसिलदार नांदेड विजयकुमार पाटे यांनी श्रीनिवास कुरे वाहनचालक / मालक यांच्‍या विरुध्‍द लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1950 चे कलम 134 अन्‍वये वजीराबाद पोलिस स्‍टेशन येथे 336/2019 गुन्‍हा नोंदविला आहे.
तसेच, निवडणूकीचे कामकाजात हयगय किंवा टाळाटाळ केल्‍यास यापुढे त्‍यांचेविरूध्‍द अशाच प्रकारची कार्यवाही करण्‍यात येणार आहे, असे 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड सदाशिव पडदूणे यांनी कळविले आहे.
0000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...