Wednesday, December 6, 2017

10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा
                                                        --- जिल्हाधिकारी
नांदेड दि. 6 :- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. या कायद्यातंर्गत दिनाक 10 डिसेंबर हा दिवस समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी व्याख्यान / भाषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
**** 
राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांचा
नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम  
नांदेड दि. 6 :- राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांचा शुक्रवार, दिनांक                       8 डिसेंबर, 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दिनांक 8 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 2-15 वाजता अहमदपूर येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4-00 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन . सांय 4-00 ते 5-00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे किमान आधारभुत किंमत खरेदी व शेतमाल तारण योजनेचा आढावा (संदर्भ जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, नांदेड श्री. पी.आर. फडणीस मो.क्र. 8275055275). सांय. 5-00 ते 6-30 वाजेपर्यंत शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे नंदिग्राम सहकारी रुग्णालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती . सांयकाळी 6-30 ते 7-00 वाजेपर्यंन्त भाग्यलक्ष्मी भवन, महावीर चौक , वजीराबाद , नांदेड येथील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी बँकेस भेट , रात्री 8-00 वाजता आनंद नगर,नांदेड येथे श्री. राम पाटील रातोळीकर , जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (संदर्भ श्री. राम पाटील रातोळीकर मो.क्र. 9921902571). रात्री 10-00 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन व राखीव .

***

Tuesday, December 5, 2017

जिल्हा नियोजन समितीच्या
7 सदस्यांसाठी पोटनिवडणुक कार्यक्रम
नांदेड दि. 5 :- नांदेड जिल्हा नियोजन समिती पोटनिवडणूक 2017 साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मोठे नागरी क्षेत्र या मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांकडून बुधवार 6 ते शनिवार 9 डिसेंबर 2017 या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार 11 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज दिली.
या पोटनिवडणुकीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील निवडून आलेल्या उमेदवारांमधून एकूण 7 सदस्य नांदेड जिल्हा नियोजन समितीवर निवडून द्यावयाचे आहेत. या सात उमेदवारांपैकी अनुसूचित जातीसाठी 1, ना.मा.प्र. 2 त्यापैकी 1 जागा ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण एकूण 4 जागा त्यापैकी महिलासाठी 2 जागा असे उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.  
मतदानासाठी एकूण 81 मतदार असून त्यापैकी 38 पुरुष व 43 स्त्री मतदार आहेत. आवश्यकता असल्यास मतदान रविवार 24 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 ते सायं 5 या कालावधीत पार पडणार असून यासाठी गुप्त मतदान पध्दतीने पसंती क्रमानुसार मतदान करण्यात येणार आहे. मतमोजणी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर नांदेड येथे मंगळवार 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वा. सुरु होणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

000000
सकारात्मक उर्जेच्या सहवासात सतत रहा
- प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड दि. 5 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नकारात्मक बाबीपासून दूर रहावे, त्यांचा आपल्या अभ्यासावर व मनावर परिणाम होऊ न देता सकारात्मक उर्जेच्या सहवासात सतत राहण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
   "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित दरमहा 5 तारखेच्या  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात आज अध्यक्षस्थानावरुन श्री. पाटील बोलत होते. पुणे येथील प्रा. सचिन ढवळे यांचे एमपीएससी सीसॅट व  शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेतील गणीत, बुध्दीमता व आकलन क्षमता या विषयावर व्याखान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांची उपस्थिती होती. 
श्री. पाटील म्हणाले की, अभ्यास करताना ताण-तणावापासून दुर राहण्यासाठी आवडीचे चांगले चित्रपट पहाणे, संगीत ऐकणे, पुस्तक वाचणे यासारख्या मन प्रफुलीत करणारे छंद जोपासण्याचा सल्ला विद्यार्थी मित्रांना दिला. प्रा. सचिन ढवळे यांनी दिवसभरातील आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सीसॅट, गणित, बुध्दीमता चाचणी व आकलनक्षमता याविषयी उदाहरणासह मागदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पद्धती व विद्यार्थ्यांनी त्यासाठी करावयाची तयारी याविषयी अभ्यासपुर्ण माहिती त्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
 विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रा. ढवळे यांचे ग्रामगिता देऊन स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात 'इतनी शक्ती हमे देना दाता' या प्रेरणा गीताने करण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे  यांनी  सुत्रसंचालन मुक्तीराम शेळके यांनी तर आभार प्रदर्शन आरती कोकुलवार  यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप सुर्यवंशी, संजय कर्वे, कोंडीबा गाडेवाड, बाळू पावडे, श्रीजी इज्जपवार, रघुवीर श्रीरामवार ,लक्ष्मण शनेवाड, सोपान यनगुलवाड, ज्ञानेश्वर शनेवाड, कृष्णा वाईकर यांचे सहकार्य लाभले.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...