Thursday, January 22, 2026

 श्री #गुरुतेगबहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांचे आवाहन

🗓️
दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६
⏱️
वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!



 "हिंद दी चादर" महोत्सव - केवल ३ दिन शेष !

महाराष्ट्र शासन और अल्पसंख्यक विकास विभाग द्वारा आयोजित, "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के ३५०वें शहीदी समागम और श्री गुरु गोबिंद सिंह जी के ३५०वें गुरतागद्दी शताब्दी समागम में अब बस ३ दिन बचे हैं।
🙏
इस ऐतिहासिक क्षण का साक्षी बनने के लिए आप सभी सादर आमंत्रित हैं।
📍
स्थान: मोदी मैदान, वाघाला - नांदेड़, महाराष्ट्र
⏳
समय कम है, तैयारी पूरी है!



वृत्त क्रमांक 82

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सुधारित नांदेड दौरा कार्यक्रम

नांदेड, दि. 22 जानेवारी :- पंजाब राज्याचे मुख्यमंत्री श्री. भगवंत मान हे जानेवारी 2026 मध्ये नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा सुधारित तपशील जाहीर करण्यात आला आहे.

शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री श्री. भगवंत मान हे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 11.50 वाजता विमानाने प्रयाण करून दुपारी 12.40 वाजता नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन करतील. आगमनानंतर ते नांदेड येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर दुपारी 4.00 वाजता मुख्यमंत्री श्री. भगवंत मान हे नांदेड येथील गुरु गोविंद सिंगजी विमानतळावरून विमानाने एस.ए.एस. नगर (पंजाब) कडे प्रयाण करतील.

000000



वृत्त क्रमांक 81

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

लाखो भाविकांसाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब व लंगर साहिब गुरुद्वारांकडून मोफत भोजन सेवा

नांदेड, दि. २२ जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ व २५ जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी नांदेडमध्ये दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजनासाठी १२ भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली असून, ही सेवा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वारा यांच्या वतीने पुरविण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग स्थळांपासून रेल्वे स्थानक, बसस्थानक व विमानतळ परिसरात विविध ठिकाणी मोफत सेवा स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. याशिवाय तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा तसेच गुरुद्वारा लंगर साहिब येथेही भाविकांसाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच या दोन गुरुद्वारांद्वारे भव्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मोफत लंगर सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 80 

“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून आढावा

नांदेड, दि. 22 जानेवारी :- तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथे आयोजित “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आतपर्यंतच्या कामकाजाचा  आज लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी एकत्र येत आढावा घेतला.

जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उप जिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, नांदेडसह राज्याच्या वैभवात भर घालणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक येणार आहेत. कार्यक्रमासाठी आपली सेवा महत्त्वाची ठरणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आयोजन समिती यांच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वी करूया. प्रत्येकाने या ऐतिहासिक सोहळयात आपला सहभाग नोंदवावा.असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नागपूर, नांदेड व मुंबई येथे ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम साजरा होत आहे. नांदेड येथील २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले,  ५२ एकर परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती, महालंगर, अत्याधुनिक प्रदर्शन केंद्र, ३५० हून अधिक स्टॉल्स, आरोग्य शिबिरे, सुव्यवस्थित पार्किंग व वाहतूक आराखडा उभारण्यात येत आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, हाच प्रशासनाचा संकल्प आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.

000000









Wednesday, January 21, 2026

हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक गीताच्या माध्यमातून श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या धर्मरक्षण, त्याग व बलिदानाला भावपूर्ण उजाळा दिला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी हात जोडून “नवमे गुरु पैदा हुए गुरु के महल में” हे गीत सादर केले. त्यानंतर “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल”, “हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर”, “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आला आहे. या माध्यमातून गुरुंचा ऐतिहासिक त्याग, समर्पण व बलिदानाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांनी सहभागी शालेय विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. तसेच दि. २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.




 

वृत्त क्रमांक 79

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने 

जिल्हाधिकाऱ्यांची कार्यक्रमस्थळी पाहणी

तयारी अंतिम टप्यात

नांदेड, दि. २१ जानेवारी :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 

भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत  पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व यंत्रणा सज्ज असून, कार्यक्रमपूर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००







वृत्त   निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...