Tuesday, August 12, 2025

वृत्त क्रमांक 833

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 120 रुग्णांची तपासणी व औषधोपचार

नांदेड दि.१२ ऑगस्ट:– मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल, साठे चौक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिव मंदिर, चैतन्य नगर चौक येथे 10 ऑगस्ट  रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर व डॉ. संतोष मेकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टिमने 120 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले.

यावेळी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, लिपिक नारायण वाडेकर, शिव मंदिर ट्रस्टचे सचिव उदय तोरणेकर, पुजारी काशिनाथ मठपती उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जितू कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

००००






वृत्त क्रमांक 832

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १४ ऑगस्टला विभाजन विभीषीका दिवसाचे आयोजन

नांदेड दि.१२ ऑगस्ट– राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्य याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महिन्यातून एकदा सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता ‘विभाजन विभीषीका दिवस’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

००००००

Monday, August 11, 2025

वृत्त क्रमांक 831   

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन  

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगारची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून कंधार तालुक्यातील कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी येथे करण्यात आले आहे. 

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पासून कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.


अधिक माहितीसाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com संर्पक क्र. 02462-251674 योगेश यडपलवार 9860725448 संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 0000

 वृत्त क्रमांक 830 

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी संधी

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त राहिल्यास 13 ऑगस्ट रोजी अतिरिक्त प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह सकाळी 8 ते 11 यावेळेत माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेत नांदेड येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9421871893, 9766809179 वर संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 829   

जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 828   

‘हर घर तिरंगा’ अभियानात कार्यालयासह नागरिकांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

तिसऱ्या टप्पा  13 ते 15 ऑगस्ट कालावधीत  

 

नांदेड दि. 11 ऑगस्ट :- शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे “हर घर तिरंगा” हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेवटचा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात प्रत्येक घरावर, सर्व शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

 

या कालावधीत प्रत्येक घरावर, कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविणे अभिप्रेत आहे. त्या दृष्टिकोनातून संबंधित विभाग, कार्यालयांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली. या बैठकीस विविध विभागाचे तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी उपस्थित होते. 

 

“हर घर तिरंगा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत केंद्र व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात विविध कार्यक्रम, उपक्रम हाती घेऊन हे अभियान उत्साहात यशस्वी साजरा करण्याची कार्यवाही सर्व कार्यालय प्रमुखांनी करावी. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय महत्त्वाची स्थळे, पाणीसाठे आणि वारसास्थळे या ठिकाणी तिरंगा रोषणाई व स्वच्छता करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. या अभियानाची अधिक माहिती, स्वयंसेवक नोंदणी, सेल्फी अपलोड करण्यासाठी व तपशीलवार माहितीसाठी नागरिकांनी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000







 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...