Thursday, January 23, 2025

 वृत्त क्र.  91

लघु पाटबंधारे योजनेची सातवी प्रगणना

तर जलसाठ्यांच्या दुसऱ्या प्रगणनेचा कार्यक्रम 

कार्यरत प्रगणकांची माहिती सादर करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 23 जानेवारी :- केंद्र शासनाकडून राष्ट्रव्यापी लघुसिंचन योजनांची (0-2000 हेक्टर सिंचन क्षमता) सातवी प्रगणना व जलसाठ्यांची दुसरी प्रगणना करण्यात येत आहे. यात पूर्ण झालेल्या भूपृष्ठाखालील, भूपृष्ठावरील, नागरी आणि ग्रामीण भागातील जलसाठे, कृषि व मृदसंधारण विभागाकडील तसेच व भूजल सर्वेक्षण यंत्रणेसंबंधित योजनांचा समावेश होणार आहे.

 याप्रगणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णयानुसार जिल्हा व तालुका स्तरावर संनियंत्रण पुढीलप्रमाणे समिती गठित करण्याचे आदेशीत केले आहे. 

यंत्रणेतील सर्व कार्यरत प्रगणक यांची सविस्तर माहिती प्राधान्याने जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव (जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती- 7 वी प्रगणना) मृद व जलसंधारण विभाग नांदेड या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी ए. एस. कांबळे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 20 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षणातील सुचनेनुसार सदर कार्यक्रमास प्राधान्य देवून तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत.  

जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सदस्य म्हणून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी (पंचायत), जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (ल.पा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग (ग्रामीण / नागरी) न.पा/न.प. म.न.पा, नांदेड आहेत. सदस्य सचिव म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग हे राहतील.  

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामे 

राज्यस्तरावरून आलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर प्रगणनेच्या कामासाठी प्रगणकांच्या नेमणुका करणे. प्रगणनेची प्रपत्रे, सूचना संच वाटप करणे तसेच प्रगणनेचे क्षेत्रिय काम विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत आदेश, सूचना मार्गदर्शन करणे. 

प्रगणनेसाठी नियुक्त केलेल्या प्रगणक, पर्यवेक्षकांचा जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आखल्याचे संनियंत्रण करणे.

प्रत्यक्ष क्षेत्रिय काम वेळेत सुरु करा, याचे पर्यवेक्षकाकडून सुयोग्य तपासणी करुन घेणे भरलेली पत्रके जमा करून घेणे याबाबत नित्रण करणे. 

तालुकास्तरीय तक्रारीचा आढावा घेणे व निराकरण करणेसाठी मार्गदर्शन करणे. प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. सदरहू समितीच्या बैठकीचा इतिवृतांत व कामकाज आढावा वेळोवेळी महसूल विभागीय स्तरावरील संनियंत्रण समितीस व आयुक्त तथा राज्य प्रगणना आयुका कार्यालयास सादर करणे.  

तालुकास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसिलदार तर सदस्य म्हणून मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत, गटविकास अधिकारी, उपअभियंता जलसंपदा विभाग सर्व, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, (ल.पा.) जि.प., तालुका कृषी अधिकारी, उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग (ग्रामीण / नागरी) न.पा/न.प./ म.न.पा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण अधिकारी उपविभाग हे सदस्य सचिव राहतील.  

तालुकास्तरीय समितीने करावयाची कामे

प्रगणकांच्या व पर्यवेक्षकांच्या नेमणुका करणे व सुचना पत्रक व प्रपत्रे वाटप करणे. प्रगणनेच्या कामाचे तालुकास्तरावर समन्वय ठेवणे. जलसंपदा/जलसंधारण/जि.प./ कृषी यांनी त्यांच्या प्रगणनेसाठी नियुक्ती केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचा तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आखणे व त्यांचे संनियंत्रण करणे. प्रगणना 100 टक्के यशस्वी होईल यादृष्टीने प्रयत्न करणे. प्रत्यक्ष प्रगणना कालावधीमध्ये गणना सुरु झाल्याचे खात्री करणे. प्रगणक, पर्यवेक्षकांकडून सुयोग्य तपासणी होणे व भरलेलीपत्रके तालुकास्तरावर जमा करुन सनियंत्रण करणे. प्रगणना तक्रारीबाबतचा आढावा घेऊन निराकरण करणे या कामांचा यात समावेश आहे.

0000

 वृत्त क्र.  90 

प्रजासत्ताक दिनानिमित्त

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

नांदेड, दि. 23  जानेवारी :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे.

 

 राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते ध्वजवंदन होणार आहे. 

 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये,असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था,आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

00000

 वृत्त क्र. 89  

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144 

नांदेड, दि. 23 जानेवारी :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

 ​ वृत्त क्र. 88


राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन

 दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान

नांदेड दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर रवाना झाले.​ आज 23 जानेवारीला  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभ होत आहे. त्यासाठी ते नांदेड विमानतळावर आले होते. दुपारी ३ वाजता ते मुंबईला परत प्रयाण करणार आहेत.

विमानतळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,आमदार डॉ. तुषार राठोड यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
​0000

 वृत्त क्र. 89

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुंबईकडे प्रस्थान

नांदेड दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज परभणी येथील कार्यक्रम आटपून दुपारी तीनच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण केले.

सकाळी ११ वाजता त्यांचे परभणीच्या नियोजित दौऱ्यासाठी आगमन झाले होते
   
श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर निरोप देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.
000000











Wednesday, January 22, 2025

 वृत्त क्र. 87

25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन 

राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश 

नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम 25 जानेवारी रोजी राबविण्याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सर्व विभागप्रमुखांना सूचना केल्या. येत्या 25 जानेवारी रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे. 

या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांनी या दिवशी प्रतिज्ञा दिली जाते. तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र देणे, मतदारांची संख्या वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे, राज्य, जिल्हा व मतदान केंद्रस्तरावर या निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे असे या आयोजनाचे स्वरूप असते. जिल्ह्यामध्ये या दिवसाचे औचित्य साधून मतदान जनजागृती अभियान राबवावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

000

 वृत्त क्र. 86

शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमाचा

जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतला आढावा  

नांदेड दि. 22 जानेवारी :- प्रशासकीय सुधारणांसाठी मुलमंत्र ठरू पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज आढावा घेतला. महसूल विभागाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख तसेच सर्व उपविभागीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.  

यावेळी त्यांनी या मोहिमेत मागे राहिलेल्या विभागांना सक्त निर्देश देत निर्धारीत वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट केले. प्रामुख्याने वेबसाईटचे अद्यावतीकरण, इज ऑफ लिव्हिंग, स्वच्छता, तक्रार निवारण, सोईसुविधा, गुंतवणूकीस प्रोत्साहन, क्षेत्रिय भेटी या 7 सूत्रांवर त्यांनी भर दिला. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. 

0000





 वृत्त क्र. 85

राज्यपाल आज परभणी दौऱ्यावर

नांदेड विमानतळावर आगमन व प्रस्थान

नांदेड दि. 22 जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उद्या 23 जानेवारी 2025 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभासाठी येत आहेत. ते नांदेड विमानतळावरून सकाळी 11 वा. परभणीला प्रयाण करतील.  

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उद्या सकाळी 9.40 वा. मुंबई येथून नांदेडकरीता निघतील. नांदेडला सकाळी 11 वा. पोहचल्यानंतर हेलिकॉप्टरने ते परभणी विद्यापिठाच्या हेलिपॅडसाठी रवाना होतील. सकाळी 11.35 वा. विद्यापीठ हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. दुपारी 12 वा. ते दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वा. ते परभणी विद्यापीठाच्या हेलिपॅडवरून नांदेडकडे प्रयाण करतील. नांदेड विमानतळ येथे दुपारी 2.55 वा. आगमन झाल्यानंतर लगेच दुपारी 3 वाजेच्यासुमारास ते विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...