Monday, November 18, 2024
फोटो कॅप्शन : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार माहिती चिठ्ठी वाटप सुरू आहे. यासाठी मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ पोहोचत आहे. ज्यांना ऑनलाइन मतदान माहिती चिट्ठी काढायची आहे. त्यांनी वोटर हेल्पलाइन हा ॲप डाऊनलोड करावा. या ॲपवर वोटर सर्विस या विभागात गेल्यावर आपल्या बीएलओचा नंबर सुद्धा मिळतो. नागरिकांनी आपली मतदान माहिती चिट्ठी हस्तगत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.
वृत्त क्र. 1119
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व ६ विधानसभांची मतमोजणी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात
ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती
फक्त किनवट, हदगाव, लोहा विधानसभेची मोजणी त्या त्या ठिकाणी
नांदेड, दिनांक १८ :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6 व विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी मात्र त्या-त्या ठिकाणी होणार आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच वेळेस येत असल्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देखील नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात होणार आहे. अन्य वेळी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशीच विधानसभेची मतमोजणी शहरात होत होती. मात्र यावेळी दोन्ही निवडणुका सोबत असल्यामुळे भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या लोकसभा क्षेत्रातील विधानसभेची मतमोजणी देखील विद्यापिठामध्ये होणार आहे. यासाठी 12 स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकसभेतील 6 मतदारसंघातील मतपेट्या तसेच 6 विधानसभा क्षेत्रातील मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत.
20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी असल्यामुळे केवळ 20 रोजीच्या रात्री पर्यंत पोलिंग पार्टी नांदेडला पोहचतील. 21 व 22 रोजी मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये असेल. 23 नोव्हेंबरच्या पहाटे निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार स्ट्राँग रूममधून मतपेटीतून उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हिएम बाहेर काढल्या जातील. त्यानंतर मतमोजणी होईल. त्यामुळे विद्यापिठाच्या उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये काही अंशिक बदल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील लोहा, हदगाव, किनवट या मतदारसंघातील मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. लोहा विधानसभेसाठी महसूल हॉल तहसिल कार्यालय लोहा येथे तर हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण भवन येथे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय वसतिगृह तामसा रोड हदगाव येथे होणार आहे. किनवट विधानसभेसाठी येथील आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे.
0000
वृत्त क्र. 1118
पूर्ण दिवस सुटी अथवा किमान 2 तास मतदानाला वेळ द्या !
कामगार, मजूर, वेटरपासून ते मेकॅनिकपर्यंत सर्वांना 20 नोव्हेंबरला सवलतीचे आदेश
20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस
नांदेड, दि. 18 नोव्हेंबर- नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. नांदेड विधानसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांसना निवडणुकीच्यां दिवशी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क् बजावण्या्साठी भरपगारी सुट्टी देण्यावबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.
ही सुट्टी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यारदीना लागू राहील. उदा. राज्या शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्याट या मधील आस्थाथपना, सर्व दुकाने व इतर आस्था्पना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्या्पार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिग सेंटर, मॉल्सय,रिटेलर इ. अपवादात्म क परिस्थीपतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यासदीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्यट नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्कस बजावण्याकसाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.
मात्र त्यालबाबत त्यां नी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्या्ही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थासपना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
सर्व आस्थांपना,कारखाने, दुकाने इत्यायदींच्याग मालकांनी , व्य वस्थाापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्या ने मतदान करणे शक्या न झाल्यावबाबची तक्रार आल्यामस , त्यांसच्याल विरुध्दळ योग्यम ती कारवाई करण्याशत येईल .
00000
वृत्त केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...



.jpeg)




