Monday, August 19, 2024

  वृत्त क्र. 737

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 19 ऑगस्ट:- नांदेड जिल्ह्यात 20 ऑगस्ट 2024 चे सकाळी 6 वाजेपासून ते 3 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 20 ऑगस्टचे सकाळी 6 वाजेपासून ते 3 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्र. 736                          

                              सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार

31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 19 ऑगस्ट : राज्य शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकतेसह जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा नि:शुल्क आहे. स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईचा https://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज 31 ऑगस्टपर्यत   mahotsav.plda@gmail.com ईमेलवर सादर करावेत.

7 सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थाच्या उत्सव स्थळाला भेट देतील आणि  जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. नांदेड जिल्ह्यातून 1 शिफारस राज्यस्तरीय परीक्षणासाठी पाठविली जाईल. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असेही प्रसिध्दीपत्रकाने कळविले आहे.

00000 

Sunday, August 18, 2024

 वृत्त क्र. 735 

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते

इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी

 

नांदेड दि. 18 :  इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात येत आहे. याअनुषंगाने भोकर येथे राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरत्या चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून 17 ऑगस्ट रोजी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थित होते.  

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीचे आवाहन यावेळी करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगिरे, समाज कल्याण निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी, माधव दौंड, अनिल कंधारे व महेश इंगेवाड हे उपस्थित होते.

00000






Saturday, August 17, 2024

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण #majhiladkibahinyojana #नांदेड






















 










 विशेष वृत्त क्र.  733 

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन

 

भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते 927 कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण

 

नांदेड दि. 17 ऑगस्ट : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती आहे. लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदार संघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

 

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकर सारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाज, जो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगर परिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

 

 या कार्यक्रमाला  पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ.अजित गोपछडे, आ. राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, रोहिदास जाधव, अॅडवोकेट रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी), दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली), श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाज भूषण, ज्येष्ठ नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केल्या जाईल. या मतदारसंघाने कायम चव्हाण कुटुंबावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन यावेळी दिले. अन्य मान्यवरांची ही यावेळी मार्गदर्शन झाले.

 

तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असून, भोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

 

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या  6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.

 

त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे  जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.

 

त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या   येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

 

त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढव, बल्लाळ तांडा, मोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणा, भोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम , उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद, भोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणा, भोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

0000





















 वृत्त क्र. 732

 

महाआयटी पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत

 

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर मिळणार स्वाधार योजनेचा लाभ

 

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अंतर्गत नांदेड शहरामध्ये मुलांची 2 आणि 2 मुलींची अशी एकूण 4 शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहातील रिक्त जागावर प्रवेश देण्यासाठी महाआयटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर रिक्त जागावर प्रवेश मिळेल, विशेष म्हणजे या पोर्टलवर वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 

वसतिगृहासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात नंबर नाही लागला तर पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही. आपोआप वसतिगृहात प्रवेश न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्याची नोंद होईल. त्यानंतर त्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती मिळेल. मात्र, त्यासाठी वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून महाआयटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर पुन्हा स्वतंत्र अर्जाची गरज नाही. महाआयटी पोर्टलवरील लिंकचा वापर करून अर्ज करा.

 

नविन पोर्टल लिंकचा वापर करून व्यावसायिक अभासक्रमाच्या विध्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी प्रवेश करणे सुरू झाले आहे. नियम, अटी व शर्ती यांची माहिती घेऊन विद्यार्थी अर्ज करू शकतात. वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्याकरिता व्यावसायिक पदाची पदविका प्रथम वर्षात, तसेच थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज करता येईल.

 

महाआयटी पोर्टलवरील लिंक

https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनसाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सदर पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या, परंतु प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.

 

अडचण वाटत असेल तर मार्गदर्शन घ्या

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी, तसेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत लिंकचा वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुख, गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत. काही अडचण आल्या तर मार्गदशन घ्या, असे समाज कल्याणचे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...