Saturday, August 17, 2024

 वृत्त क्र. 731 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी

ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्ज 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मागविण्यात आली आहेत.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे (उदा :- चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-बेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी.) खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केलेली असून पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणेसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालय व कार्यालय अधिनस्त तालुकाच्या ठिकाणी कार्यरत मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे कार्यालयीन वेळेत पुढीलप्रमाणे दिलेल्या तालुकानिहाय वसतिगृह व निवासी शाळेस अर्ज सादर करावेत.

 

गुणवंत मुलाचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी तालुका नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बिलोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धर्माबाद, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देगलूर, मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मुखेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हदगाव, मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह भोकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय निवासी शाळा माहूर येथील तालुकानिहाय वसतिगृह व निवासी शाळेस अर्ज सादर करता येतील.

 

अर्जासोबतची कागदपत्रे  

दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसिलदार तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे. स्वयंघोषणापत्र CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमुद करण्यात यावे. वरील नमूद साधनांपैकी पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमुद करावी. ही कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत तालुका निहाय दिलेल्या ठिकाणी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000

 विशेष वृत्त क्र.  730 

केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा भोकर येथून थाटात शुभारंभ

 

नांदेड (भोकर), दि. 17 ऑगस्ट : केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहे, प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछेडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम, महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपल्या परंपरागत बंजारा पेहराव मध्ये आलेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात महिलांनी राज्य शासनाच्या या योजनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

यावेळी पालकमंत्री म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकारने महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना सुरू केल्या आहे. केंद्रात आलेल्या शासनाने दहा वर्षापूर्वी घरातील महिलांना स्वयंपाकाच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी उज्वला गॅस योजना सुरू केली. केंद्र सरकारने 20 कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. आम्ही राज्य सरकारने आणखी त्यामध्ये भर घातली असून आता महिलांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.महिलांना एसटी भाडे 50% माफ करण्यात आले आहे. राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. बचत गटाच्या  बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देण्यात येत असून सोळा हजार कोटींचा पतपुरवठा करण्यात आला आहे. हक्काचे घर, प्रत्येकाला घर,प्रत्येक घरात शौचालय आणि आता प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

 

यावेळी उपस्थित महिलांना संबोधतांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नसतील त्यांनाही ते मिळतील याबद्दल आश्वस्त केले.31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी असेल. त्यामुळे या संदर्भात कोणी काही गैरसमज पसरवत असेल तर त्याला बळी पडू नका, असे आवाहन केले.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा,बचत गट स्थापन करावेत असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशी उपस्थित महिला समुदायाला विचारणा केली. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्या सर्व महिलांना अर्ज करायला सांगा असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी संबोधित केले. केंद्र व राज्य शासन महिलांसाठी नवनवीन योजना आणत असून त्या सर्व योजनांचा वापर भोकर पासून तर नांदेड पर्यंत सर्वांना मिळेल याची खात्री बाळगा. आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अजित गोपछडे श्रीजया चव्हाण यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले.

000















मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा #नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला. भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा #नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला. भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला.भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला.भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 














 #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण



 #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण #LadkiBahinYojana #MajhiLadkiBahinYojana



वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...