Monday, February 12, 2024

 वृत्त क्र. 126 

जिल्हा माहिती अधिकारी पदाचा प्रवीण टाके यांच्याकडे पदभार

 

नांदेड ( जिमाका ) दि. 12 : नांदेडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा सोमवारी प्रवीण टाके यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण टाके हे नागपूर येथून नांदेड येथे या पदावर रुजू झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या बदली आदेशानंतर यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे नागपूर येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रवीण टाके यांनी आज पदभार सांभाळला. प्रवीण टाके यांनी यापूर्वी नवी दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी व समकक्ष पदावर काम केले आहे. यापूर्वी लोकमत, सामना तरुण भारत, नागपूर पत्रिका आदि वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले प्रवीण टाके एक प्रतिभावान कवी,लेखक असून त्यांची फकीर ही कादंबरी प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले आहे.

000000






वृत्त क्र. 125

 

महासंस्कृती महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी 

·         महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन 

·         महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन दिनांक 15 ते 19 फेब्रुवारीला नांदेड येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रशासन सज्ज झाले असून यानिमित्ताने होणाऱ्या विविध आणखी कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्तरावरील बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे.

 

या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात नवा मोंढा येथे करण्यात आले आहे. महोत्सवात लक्षणीय कार्यक्रमांसोबतच प्रदर्शनीय दालने यामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे, स्थानिक खाद्य पदार्थ, तृणधान्याचे पदार्थ, बचत गटामार्फत बनविण्यात आलेल्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री याबाबीचे स्टॉल लावण्यात येणार आहे.

 

या महोत्सवात 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे विविध मैदानी खेळाचे आयोजन क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 रोजी शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धाचे आयोजन आयटीआय नांदेड येथे तर 19 फेब्रुवारी रोजी नंदगिरी किल्ला येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत या महोत्सवात लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, आदिवासी समुहाचे पारंपारिक नृत्य या सर्व कलाप्रकाराचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

0000

 वृत्त क्रमांक 124

नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढीसाठी

इच्छूक संस्थानी 22 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत  

- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर बी गणबीर

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थाकडून /व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची जाहिरात www.msbsvet.edu.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रवेश सत्र 2024-25 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थाना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवाढ सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छूक संस्थानी मंडळाचे संकेतस्थळावर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांचेकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती 22 फेब्रुवारी 2024 पर्यत सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर बी गणबीर यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 123

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं. 9423777789, एस.जी.आरसुलवाड (व.लि) मो.क्र. 7767825495 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर एस.एल.राठोड (क.लि) मो.क्र. 8830298158, ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. 7620166354 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 122

जिल्हाधिकारी कार्यालयात 13 फेब्रुवारी रोजी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

Saturday, February 10, 2024

 वृत्त क्रमांक 121

 

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

·         महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे होणार आयोजन 

·         महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- महासंस्कृती महोत्सवाचे आयोजनदिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नांदेड येथे करण्यात येत आहे. महोत्सवाच्या सुयोग्य आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत नेमण्यात आलेल्या सर्व सदस्यांनी सुक्ष्म नियोजनावर भर देवून आपली जबाबदारी पार पाडावी असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देश दिले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज पुर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, महिला बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, मीना सोलापूरे व विविध विभागाचे अधिकारी व समिती सदस्य आदींची उपस्थिती होती.

 

या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिक, कलाकार, मान्यवर, महिला यांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे. तसेच महोत्सवात प्रदर्शनीय दालने यामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे, स्थानिक खाद्य पदार्थ, तृणधान्याचे पदार्थ, बचत गटामार्फत बनविण्यात आलेल्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री याबाबीचे स्टॉल लावण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

 

तसेच या महोत्सवात 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे विविध मैदानी खेळाचे आयोजन क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 रोजी शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धाचे आयोजन आयटीआय नांदेड येथे तर 19 फेब्रुवारी रोजी नंदगिरी किल्ला येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत या महोत्सवात लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, आदिवासी समुहाचे पारंपारिक नृत्य या सर्व कलाप्रकाराचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. या बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

0000




 वृत्त क्रमांक 120

 

ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या

128 बालकांची टुडी ईको तपासणी

 

·   ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र 27 बालकांवर लवकरच मुंबई येथे उपचार  

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतीच करण्यात आली. या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकूण 128 बालकांची तपासणी करण्यात आली असून बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र एकूण 27 बालकांना लवकरच संदर्भित करून उपचार केले जाणार आहेत.

 

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. हे शिबीर बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे डॉ. प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या उपस्थितीत पार पडले.

 

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.

 

हृदयरोग तपासणी, नेत्ररोग, आकडी/फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजित करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमांचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.

 

तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. या शिबिरासाठी RBSK जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, DEIC चे व्यवस्थापक विठ्ठल तावडे,राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0000000




वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...