Saturday, February 10, 2024

 वृत्त क्रमांक 121

 

महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

 

·         महासंस्कृती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे होणार आयोजन 

·         महोत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- महासंस्कृती महोत्सवाचे आयोजनदिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत नांदेड येथे करण्यात येत आहे. महोत्सवाच्या सुयोग्य आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत नेमण्यात आलेल्या सर्व सदस्यांनी सुक्ष्म नियोजनावर भर देवून आपली जबाबदारी पार पाडावी असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देश दिले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदानस्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठलुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धनतसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती आदी बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज पुर्वतयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगमनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपविभागीय अधिकारी विकास मानेउपविभागीय अधिकारी अरुणा संगेवारप्रकल्प संचालक संजय तुबाकलेमहिला बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-पाटीलजिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुलेजिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडेमीना सोलापूरे व विविध विभागाचे अधिकारी व समिती सदस्य आदींची उपस्थिती होती.

 

या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नवा मोंढा येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिककलाकारमान्यवरमहिला यांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करावे. तसेच महोत्सवात प्रदर्शनीय दालने यामध्ये विविध विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचेस्थानिक खाद्य पदार्थतृणधान्याचे पदार्थबचत गटामार्फत बनविण्यात आलेल्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री याबाबीचे स्टॉल लावण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

 

तसेच या महोत्सवात 15 व 16 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे विविध मैदानी खेळाचे आयोजन क्रिडा विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 18 व 19 रोजी शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धाचे आयोजन आयटीआय नांदेड येथे तर 19 फेब्रुवारी रोजी नंदगिरी किल्ला येथे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत या महोत्सवात लोककलालोकसंगीतलोकनृत्यआदिवासी समुहाचे पारंपारिक नृत्य या सर्व कलाप्रकाराचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे. नागरिकांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. या बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

0000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1129 लोकसभेसाठी 67.81 तर विधानसभेसाठी 69.45 टक्के मतदान  विधानसभेसाठी भोकर येथे सर्वाधिक 76.33 तर नांदेड उत्तरमध्ये 60.6 सर्वात...