Thursday, October 12, 2023

एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 एनएमएमएस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (एनएमएमएस) व 'दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी  असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती' या योजनेसाठी अर्ज करण्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य -

सन  २०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी ( एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( एनएसपी ) (www.scholarships.gov.in ) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबर पासून सुरवात झाली आहे. नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 आहे.

 जिल्ह्यामध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद  पुणे यांच्यामार्फत एनएमएमएस परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड  झालेल्या जिल्ह्यातील  सर्व  विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून इ. 9 वी, 10 वी , 11 वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना स्वतःची नोंदणी आधारनुसार करावी. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना  शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी 10 वी, 11 वी आणि 12 वी साठी नुतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नुतनीकरण करावे.

केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) द्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ( इ. ९ वी  आणि १० वी ) शिष्यवृत्ती लागू केली आहे. एनएसपी २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. या योजनचे तपशील ( www.depwd.gov.in ) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( www.scholarships.gov.in ) वर उपलब्ध आहेत.

एनएमएमएस साठी पात्रतेचे निकष

पालकाचे उत्पन्न ३ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे . उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदानासह ) शाळेतील विद्यार्थांना  ही योजना लागू आहे .

केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र /राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल .

इयत्ता 10 वी मध्ये सर्वसाधारण ( जनरल ) विद्यार्थ्यास 60 टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास 5 टक्के सुट) इयत्ता 9 वी मधून 10 वी मध्ये गेलेले विद्यार्थी व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे .

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे . शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .

दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेल्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी  पात्रतेचे निकष 

अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रि - मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्व चे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे. एकाच पालकांच्या २ पेक्षा अधिक अक्षम ( दिव्यांग ) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागु नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. ही शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.

जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची ( लाभदायी ) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडुन पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.

शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे .

शिष्यवृत्ती रक्कम-

एनएमएमएसएस साठी वार्षिक 12 हजार रुपये, दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक 9 हजार ते 14 हजार 600 रुपये आहे.

वेळापत्रक-

एनएमएमएसएस व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर 2023 पर्यत आहे. शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत 15 डिसेंबर 2023 असून जिल्हा स्तर अर्ज पडताळणीसाठी अंतिम मुदत 30 डिसेंबर 2023 आहे.

एनएसपी पोर्टलवरील सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. याबाबतच्या सविस्तर सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर देण्यात येणार आहेत. दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद  नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

  

“राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS)” साठी

30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन  अर्ज भरावेत

          लातूर, दि.12 (विमाका) : केंद्रीय  शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या सन  2023-24 वर्षासाठी "राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती(NMMSS)"  www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास 01 ऑक्टोबर, 2023 पासून सुरवात झाली आहे. नोंदणी  आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2023 असून पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन पुणे येथील शिक्षण संचालनालय(योजना)चे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या शिष्यवृत्ती  योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांची ऑनलाईन नोंदणी  करता येणार आहे. राज्य शिक्षण परिषदेने  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती  योजनेमध्ये  ज्या विद्यार्थ्यांची 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये निवड झाली आहे. तसेच इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनी  नवीन अर्जदार म्हणून आधार कार्डनुसार स्वत:ची नोंदणी करावी. यापुर्वी  शिष्यवृत्ती  घेत असलेल्या विद्यार्थांनी  शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःची नोंदणी करून नूतनीकरण करून घ्यावे.

NMMSS साठी पात्रतेचे निकष :

1. पालकांचे  उत्पन्न रु . 3,50,000 / - पेक्षा जास्त नसावे . उत्पन्नाचा दाखला हा सक्षम    

     प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे .

2. शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह ) शाळेतील       

    विद्यार्थांना  सदर योजना लागू आहे .

3. केंद्रीय विद्यालय , जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र, राज्य शासनाकडून वसतिगृहाची   

    सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील , खाजगी    

    अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थी  शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत .

4. इयत्ता 10 वी नंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश   

     घेतल्यास शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल .

5.  इयत्ता 1० वी मध्ये सर्वसाधारण ( जनरल ) विद्यार्थ्यास 60 टक्के पेक्षा अधिक गुण

    (अनुसूचित जाती , जमातीच्या विद्यार्थ्यास 05 टक्के सुट . ) इयत्ता 9 वी मधून 10 वी      

     मध्ये गेलेले विद्यार्थी  व 11 वी मधून 12 वी मध्ये गेलेले विद्यार्थी  प्रथम प्रयत्नात पास    

    होणे आवश्यक आहे .

6. शिष्यवृत्ती  पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे,     

    संयुक्त खाते नसावे .

7. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार   

     कार्ड संलग्न असावे .

8. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा

     व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी  (NMMSS) वार्षिक 12,000 रुपये इतकी   शिष्यवृत्ती  देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर शाळास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर,2023 तर  जिल्हास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 30 डिसेंबर,2023 असणार आहे, असे शिक्षण संचालक श्री. पालकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या 020-26123515 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

*******

 “दिव्यांग  विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती” साठी

 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन  अर्ज भरण्याचे आवाहन

          लातूर, दि.12 (विमाका) :  केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागा(DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती  पोर्टल (NSP) द्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ( इयत्ता 9 वी  आणि 10 वी ) शिष्यवृत्ती योजना राबविली  जाते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती  पोर्टल (NSP) -2.0 पोर्टलवर (www.scholarships.gov.in) विद्यार्थ्यांची नोंदणी 01 ऑक्टोबर, 2023 पासून सुरवात झाली आहे. नोंदणी  आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2023 असून पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन पुणे येथील शिक्षण संचालनालय(योजना)चे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी  पात्रतेचे निकष :

1 . अनुदानित शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ( CwDs ) प्री -  

     मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.

२. सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के किंवा जास्त असावे. सक्षम  

   अधिकाऱ्याचे  दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम-2016    

     मधील निकषांनुसार असावे.

३. एकाच पाल्यांच्या २ पेक्षा अधिक अक्षम ( दिव्यांग ) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू  नाही .   

   मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल.

4.  सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागु राहील . विद्यार्थ्याने तीच

    इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.

5. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या  

   सोयीनुसार लाभाची ( लाभदायी ) शिष्यवृत्ती  स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ   

   कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी . मात्र विद्यार्थी निवास , निवासासाठी देय अनुदान ,  

   किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक   

   साहित्य खरेदीसाठी  प्राप्त मदत स्विकारु शकतात.

6.  शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर  

   प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील.

7. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रु.2,50,000 पेक्षा जास्त  

     नसावे.

शिष्यवृत्ती रक्कम :  दिव्यांग विद्यार्थांसाठी  वार्षिक  9,000 ते 14,600 रुपये प्री-मॅट्रिक  शिष्यवृत्ती  देण्यात येते.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर शाळास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर,2023 तर  जिल्हास्तर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 30 डिसेंबर, 2023 असणार आहे. या योजनचे तपशील  विभागाच्या संकेतस्थळावर (www.depwd.gov.in) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarships.gov.in) वर उपलब्ध आहेत, असे शिक्षण संचालक श्री. पालकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या 020-26123515 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

*******

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव

मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते

गुरुवारी पारितोषिक वितरण

            मुंबई, दि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ ( मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

             या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत.

1 मुंबई 1. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

२. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ

३. निकदवरी  लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

2 मुंबई उपनगर: १. स्वप्नाक्षय मित्र मंडळ, २. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर(प) ३. बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)

3 . ठाणे : १. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे २. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि  रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३. शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे

4 . पालघर: साईनगर विकास मंडळ, पालघर

5 . रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळ, ता. महाड

6 . रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापूर

7. सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सलईवाडा, सावंतवाडी

8. पुणे : १. नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट, खडकी

२. उत्कर्ष तरुण मंडळ, चिंचवडगाव

9 .सातारा:सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, ता. सातारा

10. कोल्हापूर ,:श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी

11. सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळ, माढा

13. नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळ, नाशिक

14. धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठान, देवपूर

15.जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ, जळगाव

16. नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळ, तळोदा

17 अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ

18 . छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळ, चिखलठाण

19. जालना : कारेश्वर गणेश मंडळ, देवगाव खवणे ता. मंठा, जि. जालना

20. हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एन टी सी, हिंगोली

21. परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनंदरा

22. धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव

23. नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड

24. बीड : जय किसान गणेश मंडळ, मठ गल्ली, किल्ले धारूर

25. लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लातूर

26. नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी

27. गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली

28. गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळ, बोडगाव

29. चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर

30. वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर

31.भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी, मोहाडी

32. अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ

33. बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्था, चिखली (विभागून)

34. वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम.

35. यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ

000

दीपक चव्हाण/विसंअ/

Wednesday, October 11, 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         49  रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         857 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 722

 

 नांदेड, (जिमाका) दि. 11 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 857  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 722 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 9 ऑक्टोंबर ते  10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  149  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात  7 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नवजात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 6 (पुरुष जातीचे 2, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 49 शस्त्रक्रिया झाल्या. यात 40 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 9 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 26  प्रसुती करण्यात आल्या. यात 11  सीझर होत्या तर 15 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक - उपविभागीय अधिकारी विकास माने

 बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक


-  उपविभागीय अधिकारी विकास माने

▪️आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त नांदेड तहसील येथे बालविवाह निर्मूलनाची सामूहिक शपथ

नांदेड (जिमाका) दि. 11 :- बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी बालविवाह हा मोठा अडसर असून सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवून बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी हिरीरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी जिल्हा महिला बाल‍ विकास अधिकारी आर.आर. कांगणे, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, शिक्षण विभागाच्या सविता अवातिरक, युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक अरुण कांबळे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे जगदिश राऊत यांची  उपस्थिती होती.

शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यशासन घेत आहे. 



आंतरराराष्ट्रीय बालिका दिन व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने लेक लाडकी योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखो मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. विविध योजनाच्या माध्यमातून भर देण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होवू नयेत. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशिल राहावे, असेही त्यांनी आवाहन  केले. त्यांनी उपस्थितांना बालविवाह निर्मूलनाची शपथ दिली.

00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या 2023 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...