चला जाणूया नदीला या उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी
Saturday, April 1, 2023
Friday, March 31, 2023
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित गौरव करु
–खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकास अभिवादनाने शुभारंभनांदेड (जिमाका) दि. 31 :- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा जुलमी रझाकारा विरोधी दिलेला सशस्त्र लढा होता. या लढयात स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेत्वृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. शांतीच्या मार्गाने आंदोलने केली. निझामाच्या अत्याचाराची परिसीमा वाढतच गेल्याने सशस्त्र उठावही करावे लागले. यात हुतात्मा गोविंद पानसरे यांनी दिलेले योगदान व हौतात्म्य कोणीही विसरु शकत नाही. मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात ज्याचे योगदान राहीले आहे, ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला त्यांच्या प्रती शासन कृतज्ञता बाळगुन आहे. जे स्वातंत्र्य सैनिक आज ह्यात आहेत अशा सर्वाचा सन्मान व्हावा ही राज्य शासनाची भुमिका असून त्यांचा प्रातिनिधीक अभिवादन आपण आज पासून करत आहोत असे प्रतिपादन खासदार तथा समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा प्रातिनिधीक शुभारंभ आज अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, जिल्ह्यातील निमंत्रित स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार सुभाष साबणे, प्रा. एल.के.कुलकर्णी, प्रविण साले, सरपंच पंतगे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, समितीचे सदस्य प्रा. सुनिल नेरलकर, लक्ष्मण संगेवार, प्रा. निवृत्ती कौसल्ये, आनंदी विकास, यशवंत गादगे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत शासन गठीत समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य यांची उपस्थिती होती. आमदार जितेश अंतापूरकर यांनी हुतात्मा पानसरे यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
हे वर्ष आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहोत. या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी योगदान दिले त्या सर्वाचा सन्मान झाला पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान प्रत्येक विद्यार्थी, नागरिकांपर्यत गेले पाहिजे. यादृष्टीने जिल्ह्यात 1 मे रोजी 6 लाख विद्यार्थी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करतील असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
या समारंभात जिल्ह्यातील 15 स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधिक स्वरुपात शासनाच्यावतीने स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
मराठवाडा अमृत महोत्सवाच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत शासनाने समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यात येवून त्यांचा इतिहास सर्वसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे मा.आमदार गुरुनाथ कुरुडे यांनी जाहिर कौतूक केले. याबाबत शासनाचे स्वातंत्र्यसैनिक मा.आमदार गुरुनाथ कुरुडे यांनी सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्यावतीने प्रातिनिधीक आभार मानले.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ हा मराठवाडा मुक्ती संग्रामाला प्रकाशात आणण्याचा उपक्रम आहे. हा लढा सामान्य माणसानी लढला. हुतात्मा गोविंद पानसरे यांच्यासारखा बाहेर जिल्ह्यातून आलेल्या माणसाने 6 हजार शाखा उभ्या केल्या. आपल्या संघटन कौशल्यातून शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात संघटन केले. रझाकाराच्या जुलमी राजवटीला प्रत्युंतर देताना लोकामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे निजामाने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. याच कालावधीत त्यांना हौतात्म आले. त्यांच्या मृत्युनंतर 1 महिन्यांनी अर्जापूर येथे 10 हजार लोक जमा झाले होते. मराठवाडा मुक्ती संग्राम हा भारतीय मुक्ती संग्रामाचा एक भाग आहे. सन 1938 मध्ये हा लढा सुरु झाला. या संग्रामातील हजारो घटना संकलित करुन येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी श्रध्दाजंली ठरेल असे महाविद्यालयाचे इतिहास तज्ज्ञ एल.के. कुलकर्णी यांनी त्यांच्या व्याख्यानातून उपस्थितांना सांगितले.
यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्याच्या कार्याचा गौरव करुन त्यांनी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला आनंदी विकास व त्यांच्या संचाने मराठवाडा गीताचे सादरीकरण केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी क्षिरसागर यांनी तर सुत्र संचालन चौधरी सर यांनी केले.
जिल्ह्यातील 14 स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला. यात स्वातंत्र्य सैनिक तात्याराव गुणाजी मुळे, बाजीराव धोंडीबा गारोळे, राजाबाई पांडोजी क्षिरसागर, नारायण सिताराम शिंदे, सरुबाई नारायणसिंह ठाकूर, गंगाधर अमृता वडजे, माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, माधवराव गोविंद कंधारे, रामराव ज्ञानोबा पयना पल्ले, गणपतराव रामजी वडजे, रामराव नरसिंगराव जुरावार, चंदन मौनाजी देवघरे,गंगाधरराव हनुमंतराव पिंपळे, शंकर पिराजी वंचेवार, दिगंबरराव बापुराव पोतदार यांना समितीच्यावतीने स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
00000
Wednesday, March 29, 2023
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
यांच्या हस्ते
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ
31 मार्च रोजी
अर्जापूर येथे होणार मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा जागर
1 एप्रिल रोजी
बंदाघाट येथे शाहीर उमप यांच्या कार्यक्रमाने शुभारंभ
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राच्या
लोकसंस्कृतीचा जागर
नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ 1 एप्रिल रोजी बंदाघाट येथे होणार आहे. सायं. 5.30 वा. होणाऱ्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असून खासदार तथा समिती अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्राची लोकधारा आणि लोकपरंपरा यांना वृद्धींगत करणाऱ्या शाहीर नंदेश उमप आणि त्यांच्या 50 पेक्षा अधिक कलाकारांसह असलेले सादरीकरण नांदेडकरांना अनुभवण्याची अपूर्व संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. या समारंभासाठी बंदाघाट येथे गोदावरी काठावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
या समारंभास आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार हे मान्यवर यांची उपस्थिती समारंभास राहील. शुभारंभ समारंभानंतर शाहीर नंदेश उमप यांचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत शासन गठीत समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व सचिव तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. याचबरोबर समारंभास मुखेडचे माजी आमदार सुभाषराव साबणे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव जोशी, सुनील नेरलकर, प्रविण पाटील चिखलीकर, मिंलीद देशमुख, दीपक सिंह रावत, लक्ष्मण संगेवार, नाथा चितळे, शंतनु डोईफोडे, जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, विजय जोशी, प्रल्हाद उमाटे, संजय जोशी, लक्ष्मीकांत तांबोळी, रत्नाकर अपस्तंभ, श्रीमती आनंदी विकास, श्रीमती वृषाली किन्हाळकर, देविदास फुलारी, प्रभाकर देव, दिलीप ठाकूर, डॉ. श्याम तेलंग, सुरेश सांवत, डॉ. साध्वी (भरत) जेठवाणी, शाहीर रमेश गिरी, यशवंत गादगे, सुरेश गायकवाड, विजय सोनवणे, प्रभाकर घनशाम कानडखेडकर, जगदीश कदम, राजेश कपूर, चारुदत्त चौधरी, राम तुप्तेवार, प्रा. निवृत्ती कौशल्ये, गोविंद नांदेडे, शिवाजीराव कपाळे, कृष्णा पापीनवार, गजानन पिंपरखेडे, बापु दासरी यांची उपस्थिती राहणार आहे.
अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या समाधीस्थळी अभिवादन
शुक्रवार 31 मार्च रोजी अर्जापूर येथे सकाळी 10 वा. हुतात्मा गोविंद पानसरे यांचे समाधीस्थळी मराठवाडा मुक्ती संग्रामात सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. यानिमित्ताने हुतात्मा पानसरे महाविद्यालय बिलोली येथे सकाळी 10.30 वा. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जाईल. सकाळी 11.30 वा. इतिहास तज्ज्ञ प्रा. एल. के. कुलकर्णी यांचे मराठवाडा मुक्ती संग्राम यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संगीतकार आनंदी विकास आणि संच यांनी सादर केलेल्या राज्यगीत व मराठवाडा गिताने कार्यक्रमाचा शुभारंभ होईल.
00000
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नदी संवाद व गाळ
काढणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमांचा 1 एप्रिल रोजी शुभारंभ
चला जाणुया नदीला अंतर्गत विशेष उपक्रम
जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांचा पुढाकार
नांदेड (जिमाका) दि. 29 :- नदीच्याप्रती पिढीजात चालत आलेली आस्था अधिक दृढ
व्हावी, नदीच्या स्वच्छते प्रती लोकाभिमूखतेचे बळ मिळावे व
जनामनात नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशाने शासनाने हाती “चला जाणुया नदीला” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नदी संवाद
यात्रा व जलसाठ्यांना गाळातून मुक्त करण्यासाठी गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 1 एप्रिल रोजी
केला जाणार आहे. नियोजन भवन येथे दुपारी 3 वा. आयोजित केलेल्या या विशेष
समारंभास जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित राहणार
आहेत.
नांदेड जिल्ह्यात विविध संस्थांनी गोदावरी नदी व इतर नदी स्वच्छतेसाठी
लोकसहभागातून कृतीशील पुढाकार घेतला आहे. नदी स्वच्छतेचा हा उपक्रम
लोकसहभागाचा एक आदर्श मापदंड ठरला असून या चळवळीला युवकांचीही भक्कम साथ मिळाली
आहे.
या दृष्टीने मांजरा नदी समन्वयक अनिकेत लोहिया, प्रमोद
देशमुख, दीपक मोरतळे, सीता नदी समन्वयक बाळासाहेब
शेंबोलीकर, नंदन फाटक, लेंडी नदी समन्वयक कैलास येसगे, वसंत
रावणगावकर, यादव बोरगावकर, मन्याड नदी समन्वयक प्रमोद
देशमुख, शिवाजीराव देशपांडे,
दुधाना नदी समन्वयक रमाकांत कुलकर्णी, कयाधू नदी समन्वयक दयानंद कदम, जयाजी पाईकराव, आसना नदी समन्वयक तानाजी भोसले, डॉ परमेश्वर
पौळ, वरुणा नदी समन्वयक सुनील परदेशी, राहुल जोरे हे नागरिकांच्या
कृतिशील गटासोबत कार्य करीत आहेत.
नांदेड येथे नागरिकांचा कृतीगट म्हणून माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, नांदेड
प्लॉगर्स ग्रुप, भारतीय जैन संघटना, वृक्षमित्र
फाउंडेशन, गोदावरी नदी संसद, आर्य वैश्य महिला मंडळ, माहेश्वरी
महिला मंडळ, नमामी मॉ गोदावरी व इतर संस्थानचे योगदान
महत्त्वपूर्ण आहे.
चला जाणुया नदीला उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनासमवेत सांस्कृतिक संवर्धन मंडळ, नाम
फाउंडेशन, वन विभाग, कृषि विभाग व इतर संबंधित
विभागामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गाळ काढणे आणि नदी संवाद यात्रा
हा या उपक्रमातील एक भाग आहे. या समारंभास अधिकाधिक नदी, पर्यावरण
क्षेत्रातील योगदान देणाऱ्या नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन
आयोजकांनी केले आहे.
000000
वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
नांदेड, (जिमाका) दि. 29 :- रा
गुरुवार 30 मार्च 2023 रोजी चंद्रपुर येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. चंद्रकांत उत्तरवार यांच्या निवासस्थानी राखीव. स्थळ-वासवी माता भवन, सिडको रोड नांदेड. सायं.6 वाजता डॉ. बिडवई यांच्याकडील कार्यक्रमास नांदेड येथे उपस्थिती. रात्री नांदेड येथे मुक्काम.
शुक्रवार 31 मार्च 2023 रोजी सायं. 6 वा.चंद्रकांत उत्तरवार यांच्याकडील कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- वासवी माता भवन सिडको रोड नांदेड. रात्री नांदेड येथे मुक्काम करतील.
00000
लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 29 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबं
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000
दुय्यम निबंधक कार्यालय 30 मार्च रोजी सुरु राहणार
नांदेड (जिमाका) दि. 29 :- जनतेच्या सोयीसाठी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी शुक्रवार 30 मार्च रोजी श्रीराम नवमी सणाच्या निमित्ताने शासकीय सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3, हदगाव, बिलोली या कार्यालयात दस्त नोंदणी सुरु ठेवण्यात येत आहे. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी कळविले आहे.
माहे मार्च 2023 मधील कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे राज्यातील बहुतांश दुय्यम निबंधक कार्यालयात संप कालावधीत दस्त नोंदणी बंद होती. तसेच मार्च अखेर मुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे त्यामुळे 30 मार्च रोजी सुटीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरु राहील, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...




