Saturday, February 26, 2022

 नांदेडच्या सांस्कृतिक वैभवासाठी 

दिलेल्या वचनाच्या पूर्तीचा आनंद

-         पालकमंत्री अशोक चव्हाण  

 

 नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेडच्या सर्वांगिण विकासामध्ये पायाभूत सुविधांसह कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातही नवी पिढी घडावी यासाठी आपण सारे दक्ष आहोत. येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेसाठी स्वत:च्या कार्यालयांना जी जागा आणि सुविधा आवश्यक होती त्याबाबत मी शब्द दिला होता. आज या दोन्ही कार्यालयाच्या दिलेल्या वचनाच्या पूर्तीचा मला अधिक आनंद असल्याची भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

आज नांदेड येथील स्व. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह संकुल परिसरातील या दोन्ही संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अपर्णा नेरलकर, देविदास फुलारी, डॉ. जगदीश कदम, डॉ. भगवान अंजनीकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, निर्मलकुमार सूर्यवंशी, दिगांबर कदम, आशा पैठणे, स्वाती कानेगावकर, गजानन पिंपरखेडे, महेश मोरे, नाथा चितळे, अशोक कुबडे, दत्ता डांगे आदी साहित्यीक उपस्थित होते.

 

नांदेड महानगराच्या गरजा आता वाढत आहेत. वाढत्या गरजेनुसार भविष्यातील नियोजनही करणे आवश्यक आहे. यादृष्टिकोणातून विचार करून संपूर्ण प्रशासकीय कार्यालये एकाच संकुलात जर राहिले तर जनतेच्यादृष्टिने ते अधिक सोयीचे राहील. यादृष्टिने आपण कौठा येथे सुमारे 100 एकर जागेवर एक स्वतंत्र संकुल लवकरच विकसित करत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. नांदेडला कोणत्याही प्रकारची उणीव राहता कामा नये हा माझा पहिल्यापासूनच आग्रह आहे. त्यादृष्टिने आपण विविध कामांचे नियोजनही करून यातील बरीच विकास कामे पूर्णही करून दाखविले असल्याचे त्यांनी सांगितले.

000000

 युक्रेन-रशिया युद्धात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांशी

संवाद साधून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला धीर     

 

 नांदेड (जिमाका) दि. 26 :- रशिया आणि युक्रेनच्या युद्धात महाराष्ट्रातील काही नागरिकांसमवेत विद्यार्थीही अडकून पडले आहेत. यात नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र असलेले तब्बल 30 विद्यार्थी आहेत. उच्च शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील किव्हमध्ये विविध शैक्षणिक संस्थात प्रवेश घेतला आहे. या आठवड्याच्या प्रारंभी रशियाने युद्धाची घोषणा केल्यानंतर आणि युक्रेनवर विशेषत: किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर स्वाभाविकच तेथील महाराष्ट्रयीन, विद्यार्थी हे भयभीत झाले आहेत. या विद्यार्थ्यांशी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे प्रत्यक्ष संवाद साधून धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांनी जी परिस्थिती ओढावली आहे त्याची हकीकत आपल्या बोलण्यातून सांगितली. परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक जी काही मदत आहे ती पोहचण्याबाबत मी स्वत: संपर्क साधून आपल्याला सुखरूप भारतात कसे परता येईल याबाबत प्रयत्नरत असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिली. जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही केंद्र सरकारला एक स्वतंत्र मदतीचे पत्र तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तेथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक दिले असून तेही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत.

0000000

लेख,

 लेख,

नांदेड : वाटचाल सुसज्ज शैक्षणिक ‘हब’ होण्याच्या दिशेने 

कधीकाळी पाणी, उद्योग आणि शैक्षणिक सुविधांचा दुष्काळ असलेला मराठवाडा आता झपाट्याने बदलतो आहे. विविध सिंचन योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याच्या शिवारात पाणी आले, पाणी आहे म्हणून उद्योग आले आणि उद्योग आहे म्हणून त्या उद्योगांची कुशल, शिक्षित-प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी शिक्षणाच्याही सुविधाही उपलब्ध होत गेल्या. आज औरंगाबाद, नांदेड, लातूर सारखी शहरे महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावरील प्रमुख ठिकाणे बनली आहेत.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्राबाबत दाखवलेली दूरदृष्टी किती लाख मोलाची होती, याचा प्रत्यय आपण आज घेत आहोत. 

 मराठवाड्यातील क्रमांक दोनचे शहर असलेल्या नांदेडला शिक्षणाच्या अधिकाधिक सुविधा असाव्यात यासाठी त्यांच्यासह जुन्या पीढीतील अनेक नेत्यांनी परिश्रम घेतले. येथील पिपल्स कॉलेज, यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेज यांनी जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर केला. या भागातील मुले आज अखिल भारतीय पातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आहेत. नीट, सीईटी, जेईई सारख्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नांदेडचा आवर्जून व सन्मानाने उल्लेख केला जातो. आजमितीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी नांदेडला शिक्षणासाठी येऊ लागले आहेत, यातूनच सारे काही स्पष्ट होते.

सव्वा दोन वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर नांदेडच्या शैक्षणिक विकासाला अधिक गती मिळाली आहे. यापूर्वीही राज्याच्या मंत्रिमंडळात नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना त्यांनी सूक्ष्म नियोजन करून विविध शैक्षणिक सुविधा खेचून आणल्या होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, अलिकडेच मंजूर झालेले नर्सिंग कॉलेज आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे.  

येथील शैक्षणिक गरजा ओळखून नवीन सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झाले होते. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी भक्कम साथ दिली. या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडत आहे. 

 

सोमवारी 28 फेब्रुवारी 2022 रोजी विविध शैक्षणिक सुविधांचे लोकार्पण असून, त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाचा समावेश आहे. या संकुलासाठी सुमारे 44 कोटी 72 लाख रूपयांचा भरीव निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात प्रशासकीय विभाग, ग्रंथालय व अभ्यासिका, शंभर मुलांचे व मुलींचे वसतीगृह, स्वयंपाक व भोजन कक्ष, फर्निचर आणि जमीन सुशोभीकरणाचा यात अंतर्भाव आहे. ग्रंथालय व प्रशासकीय इमारत ही तळमजला अधिक एक मजला असे हे बांधकाम असेल.

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी नवी देखणी वास्तू उभी केली जाणार आहे. यासाठी सुमारे 14 कोटी 41 लाख रूपयांचा निधी उपलब्ध देण्यात आला आहे. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या वास्तुमध्ये सात वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, प्राचार्य कक्ष, कार्यालय, प्रसाधन गृह, स्टॉप रुम, ग्रंथालय व वाचन कक्ष, फर्निचर असे याचे स्वरुप आहे. 

 

विद्यापीठामध्ये शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचेही बांधकाम केले जात आहे. सुमारे 8 कोटी 21 लक्ष एवढा निधी यासाठी उपलब्ध केला आहे. तळमजला अधिक एक अशा स्वरूपाच्या इमारतीमध्ये एकूण 25 खोल्यांमध्ये शंभर मुलांची व्यवस्था यात आहे. वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये स्वच्छता गृहाची सुविधा असणार आहे. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे देखील याच दिवशी भूमिपूजन होईल. या वसतीगृहाची दोनशे विद्यार्थ्यांची क्षमता आहे. यासाठी 19 कोटी 35 लाख रुपये अंदाजीत खर्च आहे. तळमजला अधिक तीन मजले असे या इमारतीचे स्वरुप असून एकूण 50 खोल्या त्यात स्वच्छता गृहाच्या सुविधेसह असणार आहेत. याचबरोबर स्वयंपाक गृह, भोजन कक्ष, जीमन्याशियम हॉल, ग्रंथालय व वाचन कक्ष, बहुउद्देशीय हॉल, वसतीगृह अधिक्षकांचे निवासस्थान, फर्निचर व इतर कामांचा यात समावेश आहे. 

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रशासकीय इमारत व ग्रंथालय इमारतीमध्ये फर्निचरची उपलब्धी करून दिल्याने आता ही इमारत परीपूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे 17 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून यात मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रशासकीय विभाग, कम्युनिटी मेडिसीन विभाग, फॉरेन्सिक मेडिसीन विभाग, दोन वर्ग खोल्या, बायोकेमिस्ट्री विभाग, मायक्रोबायोलाजी विभाग, पॅथॉलॉजी विभाग, क्लासरूम 2, फार्माकॉलॉजी विभाग, फिजीऑलॉजी विभाग, एनॉटॉनी विभाग, परीक्षा कक्षात कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे, ग्रंथालय इमारतीमध्ये कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे, रुग्णालय इमारतीमध्ये विविध विभागामध्ये फर्निचर पुरवठा करणे या कामांचा समावेश आहे.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वातानुकुलीत यंत्रणा, बाग-बगीचा, सीसीटिव्ही, लिफ्ट, रॅम्प आदी कामांसाठी 15 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या नवीन वास्तु नांदेड जिल्ह्याच्या वाढत्या शैक्षणिक गरजानुरूप आणि नांदेडला एक सुसज्ज असे शैक्षणिक ‘हब’ निर्माण कऱण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे म्हणता येईल. 

 

- विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

00000

Friday, February 25, 2022

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  

 

शनिवार 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वा. धनेगाव मळा येथे समाधी दर्शनासाठी राखीव. सकाळी 9.30 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण पुतळ्यास पुष्पहार अर्पण. सकाळी 10 वा. विष्णुनगर येथील मनपा शाळेच्या प्रांगणात सिंथेटीक बास्केट बॉल ग्राउंडच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. स्थळ- विष्णुनगर नांदेड. सकाळी 10.30 वा. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा नांदेड व मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड. सायंकाळी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह देगलूर इमारतीच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग 1 अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामाच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. सार्वजनिक बांधकाम विभाग वर्ग 2 अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामाच्या लोकार्पण समारंभास उपस्थिती. स्थळ देगलूर.

 

रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वा. धनेगाव मळा येथे समाधी दर्शनासाठी राखीव. सकाळी 9.45 वा. ज्येष्ठ साहित्यिक कै. नरहर कुरुंदकर यांच्या भाग्यनगर येथील पुतळा परीसराच्या सुशोभीकरण व उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. जिल्हा परिषद नांदेड आयोजित विविध गौरव पुरस्कार समारंभास उपस्थिती स्थळ – कुसूम सभागृह नांदेड.

 

सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाच्या बांधकामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परिसरामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयीन इमारतीच्या बांधकामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परिसरामध्ये शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींच्या वसतीगृह इमारतीच्या बांधकामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या धनगरवाडी जि. नांदेड येथील इमारतीच्या बांधकामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व इतर सोईसुविधा कामांच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ नांदेड.

000000

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 21 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 840 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 751 एवढी झाली असून यातील 1 लाख 18 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 43 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे किनवट 1, कंधार 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 असे एकुण 4 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 21, असे एकुण 21 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 26, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 43 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 73 हजार 983

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 54 हजार 321

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 751

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 18

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-43

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 क्षेत्रिय कार्यालय निहाय मंडप तपासणी पथक गठीत    

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण /उत्‍सव/समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्या आदेशानूसार नांदेड जिल्‍हयातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीमधील मंडप/पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत पथके गठित करण्‍यात आलेले आहे. या तपासणी पथकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 

पथक क्र. 1 क्षेत्रीय कार्यालय,कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय तरोडा सांगवी अंतर्गत संपुर्ण क्षेत्रा दरम्यान तपासणी पथक सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्र.मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. 

क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव मो.क्र. 9011000939, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड एस.एन.ननवरे दु.क्र. 02462-221100,मो.क्र. 8805186113, पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे दु.क्र. 02462-261364, मो.क्र.9552082544, प्र.कार्यालय अधिक्षक संतोष जिंतुरकर 8888801958, वसुली पर्यवेक्षक साहेबराव ढगे मो.क्र 8888801975, वसुली पर्यवेक्षक विठठल तिडके मो.क्र 8888801951, लिपीक म.मकसूद अहमद मो.क्र 8766869099, स्‍वच्‍छता निरीक्षक आनंदा गायकवाड मो.क्र 9881533444, स्‍वच्‍छता निरीक्षक विश्‍वनाथ बी.कल्‍याणकर मो.क्र 9011000969, स्‍वच्‍छता निरीक्षक श्रीमती प्रियंका यंगडे मो.क्र 8308847692 याप्रमाणे आहेत. 

पथक क्र.2 क्षेत्रीय कार्यालय क्र.2 कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय (अशोकनगर) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील  सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्र., मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी मीर्झा फरहत उल्‍ला बेग मो.क्र. 9011000950, पो.नि.पो.स्‍टे. भाग्‍यनगर  नांदेड सुधाकर आडे दु.क्र. 02462-261364, मो.क्र. 9552082544, पो.नि.पो.स्‍टे. विमानतळ नांदेड एस.एन.ननवरे दु.क्र. 02462-221100,मो.क्र.8805186113, प्र.कार्यालय अधिक्षक राजेश जाधव (पाटील) मो.क्र. 9421851033, प्र.वसुली पर्यवेक्षक वसंत कल्‍याणकर मो.क्र. 8888801943, वसुली पर्यवेक्षक रणजित पाटील मो.क्र.9011001005, परशुराम गाडे मो.क्र. 8888801943, स्‍वच्‍छता निरीक्षक गणेश मुदीराज मो.क्र. 8308847695, विजय वाघमारे मो.क्र. 9011027263, शेख नईम शे.गफुर मो.क्र.  9822202081, सतिश मुक्‍कपल्‍ले मो.क्र. 7774977737 याप्रमाणे आहेत.

 पथक क्र.3 क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय (शिवाजीनगर) अंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्‍याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्‍वनी क्र. मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी रमेश चौरे मो.क्र. 9011000994, पो.नि.पो.स्‍टे. शिवाजी नगर नांदेड ए.एन. नरुटे दु.क्र. 02462-256520, मो.क्र.9823802677 , पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड सुधाकर आडे दु.क्र. 02462-261364 मो.क्र.9552082544, प्र.कार्यालय अधिक्षक राजेश कऱ्हाळे मो.क्र. 8087141064, प्र.वसुली पर्यवेक्षक पुरुषोत्‍तम कमतगीकर मो.क्र. 9970472524, राहुलसिंह चौधरी मो.क्र. 7558333322, रामदास हांडे मो.क्र. 8888801929, स्‍वच्‍छता निरीक्षक संजय जगतकर मो.क्र. 8380046629, प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक बाळासाहेब देसाई मो.क्र. 8308847691, किशन तारु मो.क्र. 9970262853 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र.4 क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र.4(वजिराबाद) अंतर्गत संपुर्ण क्षेत्राअंतर्गत तपासणी पथकातील सदस्याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी डॉ. मोहम्मद रईसोद्दीन, 8888892 जगदीश भंडरवार पो.नि.पो.स्टे . वजिराबाद नांदेड दु.क्र. 02462-236500 मो.क्र. 9923696860, पो.नि.पो.स्टे. इतवारा नांदेड साहेबराव नरवाडे दु.क्र. 02462-236510, मो.क्र. 9561045306, प्र.कार्यालय अधिक्षक गौतम कवडे मो.क्र. 9011000981, प्र.वसुली पर्यवेक्षक रमेश वाघमारे 8888801985, प्र.वसुली पर्यवेक्षक स.किरणसिंघ गगनसिंघ मो.क्र.8888801987, प्र.वसुली पर्यवेक्षक अजहरअली जुल्फेोकार अली मो.क्र.8888801988, स्वच्छता निरीक्षक वसीम हुसेन तडवी मो.क्र. 8888847122, एम.ए.समी एम.ए.सत्तार मो.क्र. 9011000978, अन्साकरी अतिक अहमद मो.क्र. 9011000973, प्र.स्वच्छता निरीक्षक मोहन लांडगे मो.क्र. 9370373846 याप्रमाणे आहेत.

 

पथक क्र.5 क्षेत्रीय कार्यालय, कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय (इतवारा) अंतर्गत संपुर्ण क्षेत्राअंतर्गत संपुर्ण क्षेत्रातर्गंत तपासणी पथकातील सदस्याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे मो.क्र. 8888801961, पो.नि.पो.स्टे.इतवारा नांदेड साहेबराव नरवाडे दु.क्र. 02462-236510 मो.क्र. 9561045306, पो.नि.पो.स्टे.नांदेड (ग्रा) अशोक घोरबांड दु.क्र. 02462-226373 मो.क्र. 9823333377, प्र.कार्यालय अधिक्षक गोपाळ तोटावाड मो.क्र. 9921008620, वसुली पर्यवेक्षक अब्दुल हबीब अ.रशीद मो.क्र. 8888801998, वसुली पर्यवेक्षक असीफ खान शेर खान मो.क्र. 8888847119, खदीर शेख महेबुब मो.क्र. 7038232993, लिपीक गणेश कोंडावार 8087315765, प्र.स्वच्छता निरीक्षक दयानंद गोपाल कवले मो.क्र. 9011000975, सय्यद जाफर सनबी मो. क्र. 8380046631, रुपेश विठ्ठलराव सरोदे मो.क्र.9823666374, विजेंद्र जोंधळे मो.क्र. 9923154142 याप्रमाणे आहेत.

 

 पथक क्र.6 क्षेत्रीय कार्यालय, कार्यक्षेत्र नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय (सिडको-वाघाळा) अंतर्गत संपुर्ण क्षेत्राअंतर्गत तपासणी पथकातील सदस्याचे नाव, पदनाम, कार्यालयीन दुरध्वनी क्र., मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. सहाय्यक आयुक्त अविनाश अटकोरे मो.क्र. 9011000940, पो.नि.पो.स्टे‍. नांदेड (ग्रा) अशोक घोरबांड दु.क्र. 02462-226373 मो.क्र. 9823333377, प्र.कार्यालय अधिक्षक विलास गजभारे मो.क्र. 9890327546, वसुली पर्यवेक्षक दिपक पाटील मो.क्र. 8888802012, सुधीरसिंह बैस मो.क्र. 7775956400, लिपीक प्रभु गिराम 9921038641, प्र.स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे मो.क्र. 8888801992, अर्जुन बागडी मो.क्र. 8888588067 अशी आहेत.

 

जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास नमूद क्षेत्रीय कार्यालयातर्गत तपासणी पथकातील सदस्‍याशी संपर्क साधावा, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार 25 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी 7 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन होईल.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...