Tuesday, July 13, 2021

 

महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. अशानी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. सद्यस्थितीत विभागाने महाडीबीटी फार्मर या नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे यांनी केले आहे. 

कृषि यांत्रिकीकरण घटकातर्गत विविध योजनेतून तसेच सुक्ष्म सिंचन या घटकातर्गत विविध योजनेतून   महाडीबीटी पोर्टलवर जिल्हयातील 9 हजार 722 लाभार्थींची निवड झालेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना लघु संदेश पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 3 हजार 391 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी यांत्रिकीकरण घटकासाठी  आवश्यक असलेली कागदपत्रे सातबारा उतारा, 8 अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन व तपासणी अहवाल, अनुसूचित जाती,  अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक असलेली असलेली कागदपत्रे सातबारा उतारा, 8 अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती, अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. 

ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यांना कागदपत्रे तपासून पूर्व संमती देण्यात आलेली आहे. सुक्ष्म सिंचन या घटकातर्गंत ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळूनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुनच देयके अपलोड करावीत. मुदत देऊन विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

सुधारित वृत्त

 

दारातील कोविड लसीकरणामुळे जेव्हा सारे किन्नर भावूक होतात ! 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 13:- मला जन्म कुणी दिला हे माहित नाही. माझी गुरु सांगते तुला आमच्यापाशी कुणीतरी आणून टाकले. तिचीच सेवा करत मी मोठी झाले. लहानपणी स्वाभाविकच मलाही खेळायचे प्रचंड वेड होते. सोबतची मुले कधी मला गोल्या म्हणायचे, कोणी मामू म्हणायचे तर कोणी खूप काही. मला काही त्यांचे त्यावेळी वाईट वाटायचे नाही. मी त्यांचे कधी वाईट वाटून घेतलेही नाही. माझ्यातल्याच गुरुने मला मोठे केले. माझे नाव विचाराल तर तसे मलाही नक्की सांगता येणार नाही. प्रत्येक माणसाने मला वेगळे नाव दिले आहे. 

मला विविध सणांसह गणपतीची खूप आवड. एक छोटा गणपती मी असाच एका दुकानदाराकडून मागून घेतला. विकत नाही. आम्ही थोडीच काही विकत घेतो ? या गणपतीमुळे मला कुणीतरी गौरी असे नाव दिले. मलाही हे नाव सगळया नावापेक्षा जास्त भावले. तेंव्हापासून मग मी गौरी झाले. कोरोना लसीकरणाच्या निमित्ताने समाज आणि किन्नर यातील एक-एक पदर गौरी उलगडून दाखवत होती. 

माझ्यासारख्या अनेक गौरी आणि त्यांचे दु:ख सारखेच आहे. हे पाहून आम्हाला आता याचे कुणालाच काही वाटत नाही. समाज आम्हाला काही कमी करतो अशातला भाग नाही. आमच्या वेदना घेवून आम्ही जगतो. एकमेकींचे मन आम्ही एकमेकीना बिनधास्त लाखोळी वाहूनही हलके करुन घेतो. समाज जे काही म्हणायचे आहे ते आम्हाला म्हणत राहतो, त्यामूळे आम्ही त्यांची फारशी पर्वाही करत नाही. वारंवार शल्य मात्र एकाच गोष्टीचे राहते ते म्हणजे सरकार दप्तरी आवश्यक असणारी आमची ओळख !

आधार काढायला जावे तर नाव लागेल. नाव सांगायला जावे तर तलाठी किंवा ग्रामपंचायत अशा ठिकाणच्या नोंदी लागतील. वय सांगायला जावे तर जन्माचा दाखला किंवा टीसी लागेल. न आम्ही या कागदात मोडतो न त्या कागदात. आमची ही व्यथा जवळपास सर्वच गावात सारखी आहे. अनेक वर्षे झेललेल्या या व्यथेला आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्गंत एक अश्वासक चित्र आम्ही पाहत आहोत. इथले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या साऱ्या व्यथा आम्ही घेवून भेटलो. राहण्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यतचे आमचे प्रश्न त्यांनी शांततेत ऐकून घेतले. साधी कोरोनाची लस घ्यावी तर पुन्हा हा सरकारी दप्तरात आवश्यक असणारा ओळखीचा कागद अर्थात आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र देणे आवश्यक होते. 

शासनाने तृतीयपंथी तक्रार निवारण समिती नेमल्यामूळे आम्हाला आमच्या भावना मांडता आल्या. याचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्याशी थेट संपर्क झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात अत्यंत प्रगल्भ अशी भूमिका निभावून लसीकरणाचा हा लाभ आमच्या वसतीत येवून दिला. याबद्दल गौरी विशेष आभार मानायला विसरली नाही. 

याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त अजितपालसिंह संधु, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व त्यांची टिम, तत्परतेने पुढे झाल्याबद्दल गौरी शानुर बकश यांनी कृतज्ञतेने आभार मानले. यावेळी किन्नराची वरिष्ठ गुरु शानुर बाबु बकश यांची विशेष उपस्थिती होती. या लसीकरण कॅम्पच्या यशस्वीतेसाठी अर्चना शानूर बकश, रेश्मा बकश, शेजल बकश, दिपा बकश, कमल फाउडेशनचे अध्यक्ष अमरदिप दिगंबर गोधने, समाजकल्याण विभागाचे दिनेश दवणे, कैलास राठोड यांनी प्रयत्न केले.





0000

 

जिल्ह्यातील 62 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 62 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 14 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात कोविशील्ड लसीचे 100 डोस तर शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 80 डोस तर शहरी दवाखाना शिवाजीनगर व सिडको 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 8 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर या 4 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 23 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 12 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 89 हजार 836 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 13 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 53 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 32 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे                                  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 728 अहवालापैकी  7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 339 एवढी झाली असून यातील 88 हजार 781 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 54 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, कंधार तालुक्यांतर्गत 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नायगाव तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात लोहा तालुक्यांतर्गत 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 54 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12,  किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 22, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 11, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 136 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 33 हजार 445

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 30 हजार 324

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 339

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 781

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-71

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-54

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1                       

00000

 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 19.6 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात मंगळवार 13 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 19.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 156.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात मंगळवार 13 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 41.6 (205.7), बिलोली- 5.7 (166.1), मुखेड- 13.8 (139.0), कंधार- 13.7 (127.1), लोहा- 8.0 (129.7), हदगाव-9.0 (176.6), भोकर- 19.6 (153.0), देगलूर- 5.0 (116.1), किनवट- 24.0 (168.7), मुदखेड- 51.5 (197.8), हिमायतनगर-7.4 (122.9), माहूर-4.7 (127.6), धर्माबाद-10.7 (192.3), उमरी- 56.0 (236.8), अर्धापूर-48.9 (215.3), नायगाव- 19.2 (160.4) मिलीमीटर आहे.

0000

 

 

सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे सहकार, कृषि, समाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

बुधवार 14 जुलै 2021 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने धनेगावकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. धनेगाव येथे आगमन व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वा. नांदेड जिल्हा, शहर कॉग्रेस कमिटी व दैनिक लोकमततर्फे आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट स्थळ- भक्ती लॉन्स नांदेड. सकाळी 11.20 कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यात पुष्पांजली अर्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरीयल नांदेड. सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंती निमित्त दैनिक सत्यप्रभातर्फे आयोजित समारोह तथा सत्कार समारोह कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कुसूम सभागृह नांदेड. दुपारी 1.45 ते 2.15 वाजेपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरीयल नांदेड येथे राखीव. दुपारी 2.30 ते 4 वाजेपर्यंत उर्दू घर उद्घाटन समारोहाला उपस्थिती. स्थळ- देगलूर नाका नांदेड. सायं. 4 वा. वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 5 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.  

*****  

 

अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

बुधवार 14 जुलै 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने धनेगावकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. धनेगाव येथे आगमन व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- धनेगाव नांदेड. सकाळी 10.30 ते 12.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष ॲड मोहम्मद खान पठाण यांच्याकडे राखीव स्थळ- हाऊस नं. 231 ब्लॉक नं. 31 लेबर कॉलनी नांदेड. दुपारी 2.30 वा. उर्दू घर इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती स्थळ- उर्दू घर मदिना तुल उलूम शाळेजवळ देगलूर नाका नांदेड. सायं. 4 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 5 वा. नांदेड येथून खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण.

****

वृत्त   दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केंद्रीय पथकाकडून...