Monday, October 26, 2020

 

रब्बी हंगामातील पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सन 2020-21 या रब्बी हंगामासाठी पिकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले असून रब्बी ज्वारीसाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 तर गहु बागायती, हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2020 ही अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्कोटोकीयो कंपनीची पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. या इफ्कोटोकीयो कंपनीच्यावतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीच्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन या मोहिमेला सुरूवात झाली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी रामराव पवार, इफ्कोटोकीयोचे जिल्हा प्रतिनीधी गौतम कदम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक श्री. गिरी, तंत्र अधिकारी प्रमोद गायके हे उपस्थित होते.

000000



Sunday, October 25, 2020

 124 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

101 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 25 :- रविवार 25 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 124 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 101 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 45 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 56 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 129 अहवालापैकी  999  अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 753 एवढी झाली असून यातील  17  हजार 219 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 905 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 33 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवार 24 ऑक्टोंबर रोजी लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 500 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 8, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 1, हदगाव कोविड केंअर सेंटर 4, माहूर कोविड केंअर सेंटर 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 2, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 65, खाजगी रुग्णालय 30 असे  124 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 36, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद 1, जालना 1, नांदेड ग्रामीण 2, लोहा 1, हिंगोली 2, यवतमाळ 1 असे एकुण 45 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 28, भोकर तालुक्यात 2, लोहा 4, माहूर 1, मुखेड 1, नायगाव 1, निजामाबाद 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 1, किनवट 13, हदगाव 1, कंधार 1, सोलापूर 1 असे एकूण 56 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 905 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 161, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 381, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 45, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 22, हदगाव कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 10, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 11, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 13,  मांडवी कोविड केअर सेंटर 14, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, मुदखेड कोविड केअर सेटर 5, माहूर कोविड केअर सेंटर 17, किनवट कोविड केअर सेंटर येथे 31, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, उमरी कोविड केअर सेंटर 7, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 13,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 121, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत.

 

रविवार 25 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 68, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 76 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 6 हजार 117

निगेटिव्ह स्वॅब- 83 हजार 979

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 753

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 219

एकूण मृत्यू संख्या- 500

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 478 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 905

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 33. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :- कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा रविवार 25 ऑक्टोंबर 2020 पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा 25 ऑक्टोंबर पासून सुरु करण्यासाठी  सोबतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमुद (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहुन परवानगी देण्यात आली आहे. 

संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट 1 मध्ये नमूद (एसओपी) मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार  त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

0000

Saturday, October 24, 2020

                                                            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 25 :-  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.

 

रविवार 25 ऑक्टोंबर 2020 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने दुपारी 12.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने माहूर जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वा. माहूर येथून परळी जि. बीडकडे प्रयाण करतील.

0000

 

189 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

76 बाधितांची भर तर एकाचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 24 :- शनिवार 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 189 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 76 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 36 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 40 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 466 अहवालापैकी  1 हजार 370  अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 652 एवढी झाली असून यातील  17  हजार 95 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 929 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे. 

या अहवालात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवार 23 ऑक्टोंबर रोजी सिडको नांदेड येथील 66 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 499 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 5, मुखेड कोविड केंअर सेंटर 2, नायगाव कोविड केंअर सेंटर 3, किनवट कोविड केंअर सेंटर 5, लोहा कोविड केंअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 6, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 127, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 5, बिलोली कोविड केंअर सेंटर 5 असे  189 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, अर्धापूर तालुक्यात 1, लोहा 2, देगलूर 1, मुखेड 5, उमरी 1, नांदेड ग्रामीण 1, मुदखेड 1, हदगाव 1, बिलोली 1, कंधार 1, परभणी 2 असे एकुण 36 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 16, भोकर तालुक्यात 2, लोहा 8, बिलोली 1, नायगाव 1, अकोला 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 3, मुखेड 5, हिंगोली 1, उत्तरप्रदेश 1 असे एकूण 40 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 929 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 158, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 425, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 46, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 31, हदगाव कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 11, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 10, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 5,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 7, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, मुदखेड कोविड केअर सेटर 5, माहूर कोविड केअर सेंटर 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 23, धर्माबाद कोविड केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 7, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 6, भोकर कोविड केअर सेंटर 13,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 114, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

शनिवार 24 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 71, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 77 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 5 हजार 131

निगेटिव्ह स्वॅब- 83 हजार 187

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 652

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 95

एकूण मृत्यू संख्या- 499

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.84

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 386 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 929 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...