Sunday, June 7, 2020

वृत्त क्र. 524


कोरोना बाधितांमध्ये नवीन व्यक्ती नाही ;
दोन बाधित बरे झाल्याने दिली सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 7 :-  कोरोना बाधितांमध्ये आज नवीन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नसून पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील दोन व्यक्ती बऱ्या झाल्याने आज रविवार 7 जून रोजी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोना बाधित व्यक्तींची संख्या नियंत्रीत ठेवण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधित व्यक्तींपैकी 131 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रविवार 7 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 32 अहवालापैकी 27 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तर उर्वरित 51 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे. उपचार घेत असलेले तीन बाधितांची प्रकृती गंभीर असून एक 65 वर्षाची स्त्री तर दोन पुरुष 65 व 74 वर्षांचे आहेत.
आतापर्यंत एकूण 190 बाधितांपैकी 8 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 51 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 38, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. रविवार 7 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 956, घेतलेले स्वॅब 4 हजार 453, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 942, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या एकही नाही, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 190, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 174, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 81, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 131, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 51, स्वॅब तपासणी चालू असलेली 59 एवढी संख्या आहे.
जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

Saturday, June 6, 2020

वृत्त क्र. 523



इतवारा परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह
कोरोनावर एकुण 129 व्यक्तींनी केली मात
नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोरोना बाधितामध्ये नांदेड येथील इतवारा परिसरातील 65 वर्षाचा एका पुरुष व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधित व्यक्तींपैकी 129 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरित 53 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.
जिल्ह्यात शनिवार 6 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 117 अहवालांपैकी 90 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 1 व मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथील 2 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार घेत असलेले तीन बाधितांची प्रकृती गंभीर असून यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.
आतापर्यंत एकूण 190 बाधितांपैकी 8 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 53 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 40, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. शनिवार 6 जून रोजी 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 845, घेतलेले स्वॅब 4 हजार 380, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 884, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 1, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 190, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 172, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-78, मृत्यू संख्या- 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 129, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 53, स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 19 एवढी संख्या आहे.
जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 522


आरोग्यासाठी पर्यावरण मोलाचे
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 5 :-  निसर्गाचे आणि आरोग्याचे खूप जवळचे नाते आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगले पर्यावरणही असले पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध प्रजातीच्या झाडाचे रोप लावण्यात आले. यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदुणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलिक, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्याही हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तहसिलदार वैशाली पाटील, ए. बी. बिरादार, विधि अधिकारी आंनद माळाकोळीकर, नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, वन विभागातिल वनअधिकारी, जिल्हा एमआयएस समन्वयक रुपेश झंवर, गणेश नरहिरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रसाद डुबूकवाड, अदि अधिकारी उपस्थित होते.
000000


वृत्त क्र. 521


न्यायालयीन कामकाज सोमवार पासून दोन सत्रात   
            नांदेड, दि. 5 :- जिल्हा न्यायीक विभागातील निम्या न्यायालयांचे मर्यादित कामकाज सोमवार 8 जून 2020 पासून सकाळी 10.30 ते 1.30 वाजेपर्यंत व निम्या न्यायालयात दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत दोन सत्रात सुरु होणार आहे. कोवीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाबाबत व न्यायालयात प्रवेशाबाबत विहित केलेले निर्देश विचारात घेऊन नांदेड येथील न्यायालय संकुलात प्रवेश व न्यायालयीन कामकाजाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया यांनी निर्देश दिले आहेत.
            या निर्देशानुसार नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड व दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर नांदेड यांच्याकडे दाखल होणारी सर्व प्रकरणे (दोषारोपपत्र वगळून) कामकाजाच्या दिवशी फक्त सकाळी 10.30 ते 1.30 यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये दाखल करुन घेण्यात येतील. तसेच एक वकील एकावेळी दहापेक्षा जास्त प्रकरणे दाखल करु शकणार नाही. जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणातील शपथपत्रांची पडताळणी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये केली जाईल. संबंधीत वकीलांनी आपआपली प्रकरणे निर्दिष्ट जागी उपलब्ध करुन दिलेल्या बॉक्समध्ये टाकावीत. कोणत्याही वकीलास कामकाजावेळी न्यायालयातील संचिका प्रत्यक्ष हाताळता येणार नाही. सर्व वकीलांनी शक्यतोवर आपआपल्या प्रकरणातील युक्तीवाद लेखी स्वरुपात सादर करावा.
न्यायालयातील प्रवेश व संचाराबाबतचे निर्देश, न्यायालयातील दैनिक बोर्डवर असणाऱ्या व पक्षकाराच्या अनुपस्थितीत घेता येणाऱ्या फक्त युक्तीवाद व अंतरिम युक्तीवाद असलेल्या प्रकरणात वकिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या समोरच्या कार्यालयामधून न्यायालयातील प्रवेशाबाबतचे प्रवेशपत्र / पास अदा केल्या जातील. ज्या वकिलांकडे प्रवेशपत्र आहे, त्यानांच न्यायालयाच्या मुख्य इमारतीत  प्रवेश दिला जाईल. जेष्ठ वकिलांच्या सोबत त्यांच्या सहकारी कनिष्ठ वकीलास न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही पक्षकारास न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही.
न्यायालय परिसरात प्रवेश करतांना सर्वाची थर्मल तापमापक संयंत्राद्वारे तपासणी केली जाईल. 38 अंश से. पेक्षा अधीक तापमान असलेल्या किंवा सर्दी, पडसे इत्यादी कोवीड-19 ची अन्य लक्षणे असलेल्या किंवा घोषित केलेल्या प्रतिबंधक क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीस न्यायालयात किंवा न्यायालयाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
अभिवक्ता संघाची सर्व दालने बंद ठेवण्यात येतील याची नोंद घ्यावी. सर्व विधीज्ञ आणि पक्षकारांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोवीड-19 पासून बचाव करण्याच्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन न्यायालयातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे. 
00000

Friday, June 5, 2020

वृत्त क्र. 520



खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी
बिबिएफ प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न
            नांदेड, दि. 5 :-  खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीसाठी मुदखेड तालुक्यातील मेंडका येथे बिबिएफ प्रात्यक्षिक प्रशिक्षण गंगाधर चंदलवाड यांच्या शेतात आज आयोजीत करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाला मुदखेड तालुका कृषि अधिकारी आर. एन. शर्मा, कृषि पर्यवेक्षक जी. पी. वाघोळे, कृषिताई श्रीमती गंगासागर बालाजी आक्कमवाड, कृषि सहाय्यक श्रीमती ए. एस. मोरे, तालुका तंत्र व्यस्थापक (आत्मा) व्ही. बी. गिते व शेतकरी उपस्थित होते.
            तालुका कृषि अधिकारी आर. एन. शर्मा म्हणाले, बिबिएफ तंत्राच्या सहाय्याने पेरणी केल्यास एकरी बियाणे मात्रा 18 ते 22 किलो पर्यंत लागते. तसेच पाऊस अधिक झाल्यास सरीवाटे अतिरिक्त पाणी निघुन जाते. पावसात खंड पडल्यास सरीत मुरलेले पाणी पिकाला उपलब्ध होते. या तंत्रामुळे हवा खेळती राहुन पिकाची वाढ जोमदार होते. फवारणीच्या वेळेस रिकाम्या जागेचा वापर होतो, असेही त्यांनी सांगितले.  
यावेळी बियाण्यांची पेरणी करतांना बिज प्रक्रीया करुन करावी. यामध्ये थमरोलचा वापर करावा. प्रथम बुरशी नाशक नंतर किटक नाशक व शेवटी रायझोबिएम कल्चरचा वापर करावा, असे मार्गदर्शन श्री. वाघोळे यांनी केले.
या प्रात्यक्षिकाला उपस्थीत शेतकऱ्यांपैकी होस्ट फार्मर चंदलवाड यांनी सदर तंत्रज्ञान वापरणार असल्याचे सांगून इतरांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सुत्रसंचलन कृषि सहाय्यक  श्रीमती ए.एस.मोरे यांनी केले तर आभार दत्ता आन्नमवाड यांनी मानले.
000000


वृत्त क्र. 519



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात बुधवार 17 जून 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 6 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 17 जून 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

वृत्त क्र. 518


जिल्ह्यात कोरोना बाधितामध्ये 7 व्यक्तींची भर
आजपर्यत 126 बाधितांनी केली कोरोनावर मात
नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोरोना बाधिताच्या संख्येत आज 7 बाधित व्यक्तींची भर झाली असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 7 बाधितामध्ये माहूर तालुक्यातील पलाईगुडा गावातील 33 वर्षे वयाचा एक पुरुष, तर नांदेड येथील नईआबादी शिवाजीनगर  व खय्युम फ्लॅाट परिसरातील 6 बाधित व्यक्ती आहेत. त्यापैकी 3 पुरुष अनुक्रमे वय वर्षे 26, 50, 50 आणि 3 स्त्री अनुक्रमे वय वर्षे 13, 23, 42 आहे. आतापर्यंत बरे झालेली व्यक्तींची संख्या 126 आहे.  
नांदेड जिल्ह्यातील एकुण बाधित संख्या आता 189 झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवार 5 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 48 अहवालापैकी 37 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. सद्यस्थितीत रुग्णालयात 55 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 बाधिताची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री बाधित तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.
आतापर्यंत एकूण 189 बाधितापैकी 8 बाधितांचा मृत्यू झाला असून 126 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 55 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 बाधित , एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 42 बाधित, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 4 बाधित तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर एका बाधितांवर  उपचार सुरु आहेत.  
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 349, घेतलेले स्वॅब 4 हजार 316, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 825, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 7, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 189, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 171, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 55, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 126, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 55, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 71 एवढी आहे.
दिनांक 4 जून रोजी प्रलंबित असलेल्या 73 स्वॅब तपासणी अहवालापैकी 48 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 25 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 5 जून रोजी 46 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...