Saturday, February 23, 2019


जिल्हा परिषदेची मंगळवारी सर्वसाधारण सभा
नांदेड, दि. 23 :-  नांदेड जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा बुधवार 27 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12.30 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.
00000




अनुकंपा तत्वारील नियुक्तीसाठी
387 धारकांची यादी प्रसिद्ध
नांदेड, दि. 23 :-  अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 387 अनुकंपा धारकांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.org या वेबसाईटवर व जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
31 डिसेंबर 2018 अखेर पर्यतची प्रतिक्षा यादी प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात येत आहे. घोषित केलेल्या यादीत ज्या उमेदवाराचे प्रस्ताव अपूर्ण आहेत अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अथवा ज्येष्ठतेबाबत आक्षेप असल्यास मंगळवार 26 फेब्रुवारी 2019 पर्यंत लेखी म्हणणे पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास सादर करावे. त्यानंतर आलेल्या अक्षेपाचा विचार होणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
00000


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रविवारी शुभारंभ
नांदेड, दि. 23 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय उद्घाटन शुभारंभ रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान (PM-KISAN) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा औपचारीक शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपुर उत्तरप्रदेश येथे होणार आहे.   
            या समारंभात सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत पीएम किसान योजनेची माहिती व उपस्थित मान्यवरांचे भाषणे. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे नांदेड यांनी केले आहे.
            अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रती वर्ष 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
00000

Friday, February 22, 2019

 मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम
नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी

नांदेडदि. 22: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी उद्या दिनांक 23 व रविवार दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 
 दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापियामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 678 व 8अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील नागरी कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्याबाबत कळविले आहे.
या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहायकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंतीदेखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावीअसे आवाहनही मुख्य निवडणूक‍ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत 

नांदेड, दि. 22 :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड, लातूर, बीड या जिल्हा दौऱ्यासाठी नांदेड गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आज सकाळी आगमन झाले. यावेळी नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  याचवेळी दुसऱ्या विमानाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचेही आगमन झाले.  
आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती गुरुप्रित कौर सोडी, राजेश पवार, संतूक हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, भगवानराव पाटील आलेगावकर, संजय कोडगे आदिंनीही यावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचे स्वागत केले. 
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग, जहाजबांधणी आणि जलसंधान, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांचेसोबत हेलिकॉप्टरने अहमदपूर जि. लातूरकडे प्रयाण झाले.
000000

Thursday, February 21, 2019


रा. प. महामंडळात
चालक तथा वाहक पदाची रविवारी परीक्षा
अफवांवर विश्वासू ठेवू नका
           नांदेड, दि. 22 :- रा. . महामंडळाचालक तथा वाहक पदाची ऑफलाईन परिक्षा रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर  विश्वास ठेवू नका अशा प्रवृत्तीच्या लोकांकडुन उमेदवारांशी संपर्क आल्यास त्याबाबत त्वरीत रा. . महामंडळाच्या संबंधीत विभाग नियंत्रक यांचेशी संपर्क साधावा.
        उमेदवारांना या भरती प्रक्रियेबद्दल ऑफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून निवड करुन देण्याचे प्रलोभन दाखवून संभ्रम निर्माण करुन देण्याचा प्रयत्न होत असल्यास अशा अफवा   प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी बळी पडु नये. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास राप महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन राप महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
------



शनिवार, रविवारी
विशेष मतदार नोंदणी मोहिम
           नांदेड, दि. 21 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 विचारात घेऊन ज्‍यांनी मतदार म्‍हणून अद्याप नाव नोंदणी केली नाही अशा वंचित मतदार होण्यास पात्र व्‍यक्‍तींना नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्‍हणून नांदेड जिल्‍हयाच्‍या सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर शनिवार 23 व रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्‍यात येणार आहे.
           या विशेष मोहिमेच्‍या दिवशी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहून नागरीकांचे नाव नोंदणीबाबत अर्ज स्विकारणार आहेत. मतदार म्‍हणून नाव नोंदविणे अथवा वगळणी करणेबाबत https://www.nvsp.in/ या ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील अर्ज भरता येते.
           भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 31 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.      सर्व मतदारांनी या अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खातरजमा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर भेट देऊन अथवा जिल्‍हास्‍तरावर स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या मतदार मदत केंद्राचा टोल फ्री क्रमांक 1950 यावर संपर्क साधून करता येईल. तसेच यासाठी संबंधीत तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्‍हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊनही करता येईल.
               आगामी लोकसभा निवडणूकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हयातील सर्व मतदारांनी अंतिम मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करुन नाव नसल्‍यास नागरीकांनी शनिवार 23 व रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधीत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे आपला नाव नोंदणी अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण  डोंगरे  यांनी केले आहे.
000000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...