Thursday, February 21, 2019


रा. प. महामंडळात
चालक तथा वाहक पदाची रविवारी परीक्षा
अफवांवर विश्वासू ठेवू नका
           नांदेड, दि. 22 :- रा. प. महामंडळात चालक तथा वाहक पदाची ऑफलाईन परिक्षा रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर  विश्वास ठेवू नका अशा प्रवृत्तीच्या लोकांकडुन उमेदवारांशी संपर्क आल्यास त्याबाबत त्वरीत रा. प. महामंडळाच्या संबंधीत विभाग नियंत्रक यांचेशी संपर्क साधावा.
        उमेदवारांना या भरती प्रक्रियेबद्दल व ऑफलाईन परीक्षेसंदर्भात अफवा पसरवून निवड करुन देण्याचे प्रलोभन दाखवून संभ्रम निर्माण करुन देण्याचा प्रयत्न होत असल्यास अशा अफवा व  प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी बळी पडु नये. तसेच स्थानिक पोलीस स्टेशन व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी व ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास राप महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन राप महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
------


No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना गती प्रत्येक ग्रामपंचायतीत दर १५ दिवसांनी रोजगार मा...