Saturday, February 23, 2019


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा रविवारी शुभारंभ
नांदेड, दि. 23 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय उद्घाटन शुभारंभ रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री किसान सन्मान (PM-KISAN) योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा औपचारीक शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपुर उत्तरप्रदेश येथे होणार आहे.   
            या समारंभात सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत पीएम किसान योजनेची माहिती व उपस्थित मान्यवरांचे भाषणे. सकाळी 11 ते 11.30 वाजेपर्यंत मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे नांदेड यांनी केले आहे.
            अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रती वर्ष 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...